तत्त्वज्ञान अस्तित्व

आपल्या अस्तित्वाची साक्ष देणारी गोष्ट कोणती आहे?

3 उत्तरे
3 answers

आपल्या अस्तित्वाची साक्ष देणारी गोष्ट कोणती आहे?

1
आपल्या अस्तित्वाची साक्ष देणारी गोष्ट म्हणजे  आपला श्वास



आनंद सगळ्यांनाच हवा असतो पण आपला आनंद कशात आहे..हे अनेकांना कळत नसतं. आनंद म्हणजे नेमकं काय हेही उलगडलेलं नसतं. कुठे असतो हा आनंद ? कुठे नसतो हा आनंद ? आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चाहिकडे! ही फक्त कविकल्पनाच नव्हे, तेच सत्य आहे, किंबहुना शाश्वत सत्य आहे!

आनंदाची गंमत अशी आहे, की तुम्ही शोधू लागलात, की तो दडून बसतो, पकडू गेलात, की होतातून निसटतो. आनंदासाठी जितका आटापिटा कराल, तितका तो हुलकावण्या देतो. जितका सहजपणे घ्याल, तितका आनंद सहज प्राप्त होतो. आनंद असतोच. तो अनुभवता मात्र यावा लागतो. 

आनंदाच्या बाबतीत कळसा काखेत असूनही आपण गावाला वळसा घालीत असतो. आणि तो मात्र आत असतो. आनंद आपल्या मनातच असतोे. आनंदाच्या झ-याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो. हे खरं आहे, की आनंद सर्वत्र असतो; पण अंतरंगात आनंद असेल, तरच तो अनुभवता येतो. आनंदाचं नातं जुळतं, ते फक्त आनंदाशी. आनंदाला आकर्षित करतो, तो फक्त आनंदच. आनंदाला प्रसवतो, तोही आनंदच. 

आनंदाचं भान जागृत ठेवणं हेच आनंदाचं रहस्य आहे. असंख्य, अगणित, पातळ्यांवर आनंद अनुभवता येतो. आपल्या आयुष्यासोबत ज्याचं अस्तित्व असतं, तो म्हणजे अस्तित्वाचा आनंद. आपलं अस्तित्व आपण नेहमीच गृहीत धरून चालतो आणि अस्तित्वाच्या आनंदाला मुकतो. आपल्या अस्तित्वाची साक्ष देत असतो, तो आपला श्वास. 

आपल्या श्वासाचंही आपल्याला भान नसतं. खरंतर श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू असतो. हा सेतू आपण जाणीवपूर्वक वापरत नाही. पोटातून खोेलवर श्वास घेणं केवळ आरोग्यासाठी चांगलं असतं, असं नव्हे, तर त्यामुळे मनही शांत होतं. मुख्य म्हणजे श्वासाचं बोट धरून मनापर्यंत पोहचता येतं, मनाशी नातं जोडता येतं. 

पण आपण श्वासाकडे लक्षच देत नाही. आयुष्यातला एकेक क्षण येतो आणि जातो. आपण क्षणांकडे लक्ष देत नाही. एकेक दिवस उजाडतो, मावळतो. आपण दिवसाकडे लक्ष देत नाही. सूर्योदय, सूर्यास्त होतो, तोही आपण नीट पाहात नाही. तो दिसतो, तेव्हा आपल्याला दृष्टी आहे, ते गृहीतच धरून चालल्यामुळे आपल्याला ना सृष्टीचं कोैतुक वाटतं, ना दृष्टीचं. आपल्या श्वासाचं, आपल्या अस्तित्वाचं, आपल्या अस्तित्वाच्या आनंदाचं भान हवं. 

आपलं अस्तित्व हीच एक कमाल गोष्ट आहे. एक अद्भुत सत्य आहे. भले सापेक्ष असेल, पण सत्य आहेच. जीवनाच्या, युगायुगाच्या खडतर तपश्चर्येनंतर हा मानवी जन्म लाभला आहे. हेच आनंदासाठी सबळ कारण आहे. आनंदासाठी आपलं 'असणं’ ही पुरेसं आहे; किंबहुना आपलं 'असणं’ हीच आनंदाची खूण आहे, अभिव्यक्ती आहे. 

























उत्तर लिहिले · 2/1/2022
कर्म · 121765
0
तुमच्या अस्तित्वाची साक्ष देणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत?
उत्तर लिहिले · 4/2/2022
कर्म · 0
0

मी एक मोठे भाषिक मॉडेल आहे, Google ने प्रशिक्षित केले आहे.

स्त्रोत:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1080

Related Questions

आपल्याला गौतम बुद्ध आणि स्वामी विवेकानंद यांच्यात काय साम्य आढळते?
आपले शरीर पंचतत्त्वांनी बनले असेल, तर आपली ओळख काय? आपण कोण आहोत?
मार्क्स प्रणित परमात्म्याची संकल्पना स्पष्ट करा?
स्पेंसरची उत्क्रांतीची संकल्पना स्पष्ट करा?
अस्तित्वात म्हणजे काय?
अस्तित्व म्हणजे काय?
'माणूस मिथ्य सोने सत्य' याचा काय अर्थ होतो?