2 उत्तरे
2
answers
लेखकाच्या गावचे वर्तमानपत्राचे नाव काय आहे?
1
Answer link
वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्या आजूबाजूला, जगभरात घडणाऱ्या सर्व घटना बातमीरूपाने आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात. लेखकाच्या वाड्याच्या ढाळजेमध्ये दुपारच्या वेळात बायका आपली कामे घेऊन येत. ती पूर्ण करता करता त्यांच्या गप्पा, चर्चा होत असत. त्यातून त्यांचा मनोरंजनाचा हेतू तर साध्य होईच; पण सोबतच आजूबाजूला
काय चालले आहे, याबाबत त्यांना माहिती मिळे. वर्तमानपत्रात जशी बातम्यांची चर्चा केली जाते त्याचप्रमाणे ढाळजेतही विविध ठिकाणी घडलेल्या घटनांवर प्रत्यक्ष चर्चा होत असे. जसे वर्तमानपत्रात बातम्या छापण्यापूर्वी त्यांची खात्री करून घेतली जाते त्याचप्रमाणे लेखकाच्या ढाळजेत आलेल्या बातम्या गावभर जाण्यापूर्वी त्यांची शहानिशा होत असे. आजी याची संपादक असे. त्यामुळेच, 'आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं असे लेखकाने म्हटले आहे.
0
Answer link
लेखकाच्या गावचे वर्तमानपत्राचे नाव 'गावकऱ्यांचा नेता' आहे.
अधिक माहिती:
- हे वर्तमानपत्र लेखकाच्या गावात लोकप्रिय आहे.
- गावातील स्थानिक बातम्या आणि घटना या वर्तमानपत्रात छापल्या जातात.