लेखक माहिती वृत्तपत्र

लेखकाच्या गावचे वर्तमानपत्र कोणते आहे?

2 उत्तरे
2 answers

लेखकाच्या गावचे वर्तमानपत्र कोणते आहे?

1
लेखकाच्या गावचे वर्तमानपत्र  ढाळज
 


लेखकाच्या वाड्याचे भरभक्कम संरक्षककवच - 
आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं आणि आजी त्याची संपादक होती. तर सगळ्या बातम्या तिथं यायच्या. त्यांची शहानिशा व्हायची न् मग त्या गावभर जायच्या. कडुसं पडायच्या आधी ही मैफिल मोडायची. माणसांची वेळ झाली, की म्हातारीची ढाळज सुटायची. माणसं ढाळजंत बसायची. रात्री आठच्या दरम्यान ढाळजंचा दरवाजा लागला आणि एकदा आतनं आगळ टाकली, की वाडा शांत व्हायचा. ही आगळ दरवाजाला लावणं किंवा ती काढणं म्हणजे आमच्यासाठी दिव्य असायचं. मुळात ही सहा फुटांची लांब आणि पाऊण फूट रुंद अशी सागवानी आगळ एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची. ती आरपार घालवून दरवाजा उघडणं किंवा तिच्या तोंडाला असणाऱ्या पितळी वाघाच्या जबड्यातील कडीला हात घालून ती बाहेर ओढणं व समोरच्या भिंतीतल्या देवळीत ढकलणं फार अवघड गणित होतं. ही आगळ म्हणजे दरवाजाचं, पर्यायाने वाड्याचं, भरभक्कम संरक्षक कवच होतं. दुपारी ही एकदा आगळ टाकली की उन्हाचं, सुट्टीचं आम्हांला बाहेर पडायला संधी नसायची, तसाच रात्री त्या आगळीचा आधारही तितकाच वाटायचा. भर उन्हात मग आजीला जास्त त्रास होऊ न देता तिथंच ढाळजंत, पडवीत सोप्यात कुठंही आम्ही बैठे खेळ खेळायचो. चिंचोके, गजगं, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, चुळूचुळू मुंगळा, भोवरा, गोट्या असले खेळ असायचे,




लेखकाच्या गावचे वर्तमानपत्र- लेखकाची ढाळज
लेखकाच्या वाड्याचे भरभक्कम संरक्षककवच - आगळ
२. उताऱ्यात आलेले बैठे खेळ-

चिंचोके
गजगं
खापराच्या भिंगऱ्या
जिबल्या
३. वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्या आजूबाजूला, जगभरात घडणाऱ्या सर्व घटना बातमीरूपाने आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात. लेखकाच्या वाड्याच्या ढाळजेमध्ये दुपारच्या वेळात बायका आपली कामे घेऊन येत. ती पूर्ण करता करता त्यांच्या गप्पा, चर्चा होत असत. त्यातून त्यांचा मनोरंजनाचा हेतू तर साध्य होईच; पण सोबतच आजूबाजूला काय चालले आहे, याबाबत त्यांना माहिती मिळे. वर्तमानपत्रात जशी बातम्यांची चर्चा केली जाते त्याचप्रमाणे ढाळजेतही विविध ठिकाणी घडलेल्या घटनांवर प्रत्यक्ष चर्चा होत असे. जसे वर्तमानपत्रात बातम्या छापण्यापूर्वी त्यांची खात्री करून घेतली जाते त्याचप्रमाणे लेखकाच्या ढाळजेत आलेल्या बातम्या गावभर जाण्यापूर्वी त्यांची शहानिशा होत असे. आजी याची संपादक असे. त्यामुळेच, 'आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं' असे लेखकाने म्हटले आहे.
उत्तर लिहिले · 25/12/2022
कर्म · 53720
0

लेखकाच्या गावचे वर्तमानपत्र 'गावकरी' आहे.

'गावकरी' हे एक प्रसिद्ध मराठी वर्तमानपत्र आहे, जे विशेषत: ग्रामीण भागातील बातम्या आणि समस्यांवर लक्ष केंद्रित करते.

अधिक माहितीसाठी, तुम्ही खालील लिंकवर क्लिक करू शकता:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

जगामध्ये आजही वर्तमानपत्राला का महत्त्व आहे?
वृत्तपत्र या व्यवसायिक क्षेत्रांमध्ये वापरले जाणारे प्रत्येकी दहा शब्द कोणते?
आधुनिक मराठी साप्ताहिक?
वृत्तपत्रांचा इतिहास लेखनासाठी कसा उपयोग होतो?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल १९२७ मध्ये कोणते वृत्तपत्र सुरू केले?
स्तंभलेखन मुख्यतः कोणत्या पानावर असते?
लेखकाच्या गावचे वर्तमानपत्राचे नाव काय आहे?