कथा साहित्य संस्कृती देव आणि देवस्थान

कोकणातील मंगेश हे नेमके कोणते दैवत आहे व त्याच्या कथा काय आहेत?

2 उत्तरे
2 answers

कोकणातील मंगेश हे नेमके कोणते दैवत आहे व त्याच्या कथा काय आहेत?

1
"श्री मंगेश महाजनांसाठी मार्गदर्शिका", लेखक: श्री चंद्रनाथ विनायक शेणवी धुमे, प्रकाशक: © व्यवस्थापकीय समिती, श्रीमंगेश देवस्थान, प्रियोळ, फोंडा, गोवा. पिन: ४०३४०४. ह्या पुस्तकातले प्रश्नाला अनुसरुन सदर्भ, सर्व संबंधीतांची क्षमा मागुन, ज्ञानवर्धनार्थ देत आहे.

१.१) स्कंद पुराणामधे संह्याद्री खंडात गोमांतकातील अघनाशिनी नदीच्या तीरावरील कुशस्थली हे ग्राम म्हणजे श्री मंगेशाचे आद्यस्थान असा उल्लेख सापडतो. श्री मंगेश व देवी पार्वती या उभयतांची दीर्घ विरहानंतर गोमांतकात भेट झाली व तेथेच त्यानी कायमचे स्थायिक व्हायचे निश्चित केले....

गोमांतक क्षेत्र महात्म्यानुसार श्री मंगेश यांने गोमांतकात दुसरा अवतार घेतला. त्याचा पहीला अवतार बिहारमधील त्रिहोत्र परिसरातील मोंगीर इथला होय....

२.१) ....त्रिहोत्रपुरातून गोमांतकात स्थलांतर होताना या सारस्वतांनी आपल्या समवेत कुलदैवतेही आणली ती म्हणजे श्री मांगिरीष - महादेव, श्री शांतादुर्गा, श्री महालक्ष्मी, श्री नागेश, श्री महालसा, श्री सप्तकोटेश्वर इत्यादी....

२.२) सारस्वत ब्राह्मण हे मूळ सरस्वती नदीच्या काठावर राहणार्‍या सारस्वत ब्राह्मणांपैकी स्थलांतर केलेल्या समुहापैकी एक आहेत हे सत्य आहे. विंध्य पर्वतराजीतील पंच गौड प्रदेशामार्गे त्यानी स्थलांतर केले म्हणून त्यांना गौड सारस्वत ब्राह्मण संबोधिण्यात आले.

२.१३) कुलदेवाचे कुशस्थळीहून मंगेशी-प्रियोळ येथे स्थलांतर: सन १५६० साली पोर्तुगीजांनी सासष्टी महालावर आक्रमण करण्याचे ठरविले. त्या महालात कुशस्थली या गावात श्री मंगेशाचे देवालय होते..... रातोरात श्री मंगेशाचचे लिंग व इतर परिवार दैवते तिकडून उचलली......१५६० साली नवीन जागेमधे कुलदेवाची स्थापना करण्यासाठी मंदिरासारखे दिसणारे एक झोपडीवजा देवालय बांधण्यात आले....जिर्णोध्दार....

वरील सर्व विवेचनांवरुन, कथांवरुन वाचकांच्या लक्षात आले असेलच, श्री मंगेश म्हणजेच श्री महादेव, गौड सारस्वतांच्या अनेक कुलदैवतांपैकी एक.



उत्तर लिहिले · 23/12/2021
कर्म · 121765
0

मंगेश हे दैवत नेमके कोण आहे?

मंगेश हे शिव शंकराचे रूप मानले जाते. हे दैवत गोव्यातील मंगेशी या गावी स्थित आहे, परंतु कोकणातही त्यांची अनेक मंदिरे आहेत. मंगेश हे शैव परंपरेतील एक महत्त्वाचे दैवत आहे.

मंगेश देवाची कथा:

मंगेश देवाची कथा भगवान शिव आणि पार्वती यांच्याशी संबंधित आहे.

कथेनुसार, एकदा पार्वती देवी शंकरांना शोधत असताना एका घनदाट जंगलात पोहोचली. त्या ठिकाणी त्यांना वाघाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पार्वती देवी घाबरली आणि तिने 'त्राहि माम गिरीश' (हे गिरीश, माझे रक्षण कर) असे म्हटले. 'गिरीश' हे शंकराचेच नाव आहे. यानंतर, भगवान शंकर तिथे प्रगट झाले आणि त्यांनी पार्वती देवीला वाचवले.

त्यानंतर, शंकरांनी पार्वतीला मंगिरि पर्वतावर तपस्या करण्यास सांगितले, ज्यामुळे त्यांचे मन शुद्ध होईल. त्यामुळे या घटनेनंतर, भगवान शंकरांना मंगेश या नावाने ओळखले जाऊ लागले.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1440

Related Questions

महादेवाचे स्थान कैलास कुठे आहे आणि महादेव अजूनही तिथे आहेत काय? नसेल तर कुठे गेले?
विठ्ठल रुक्मिणी हे कोण आहेत आणि त्यांचे कार्य काय होते, त्यांचा इतिहास काय आहे?