
देव आणि देवस्थान
1
Answer link
"श्री मंगेश महाजनांसाठी मार्गदर्शिका", लेखक: श्री चंद्रनाथ विनायक शेणवी धुमे, प्रकाशक: © व्यवस्थापकीय समिती, श्रीमंगेश देवस्थान, प्रियोळ, फोंडा, गोवा. पिन: ४०३४०४. ह्या पुस्तकातले प्रश्नाला अनुसरुन सदर्भ, सर्व संबंधीतांची क्षमा मागुन, ज्ञानवर्धनार्थ देत आहे.
१.१) स्कंद पुराणामधे संह्याद्री खंडात गोमांतकातील अघनाशिनी नदीच्या तीरावरील कुशस्थली हे ग्राम म्हणजे श्री मंगेशाचे आद्यस्थान असा उल्लेख सापडतो. श्री मंगेश व देवी पार्वती या उभयतांची दीर्घ विरहानंतर गोमांतकात भेट झाली व तेथेच त्यानी कायमचे स्थायिक व्हायचे निश्चित केले....
गोमांतक क्षेत्र महात्म्यानुसार श्री मंगेश यांने गोमांतकात दुसरा अवतार घेतला. त्याचा पहीला अवतार बिहारमधील त्रिहोत्र परिसरातील मोंगीर इथला होय....
२.१) ....त्रिहोत्रपुरातून गोमांतकात स्थलांतर होताना या सारस्वतांनी आपल्या समवेत कुलदैवतेही आणली ती म्हणजे श्री मांगिरीष - महादेव, श्री शांतादुर्गा, श्री महालक्ष्मी, श्री नागेश, श्री महालसा, श्री सप्तकोटेश्वर इत्यादी....
२.२) सारस्वत ब्राह्मण हे मूळ सरस्वती नदीच्या काठावर राहणार्या सारस्वत ब्राह्मणांपैकी स्थलांतर केलेल्या समुहापैकी एक आहेत हे सत्य आहे. विंध्य पर्वतराजीतील पंच गौड प्रदेशामार्गे त्यानी स्थलांतर केले म्हणून त्यांना गौड सारस्वत ब्राह्मण संबोधिण्यात आले.
२.१३) कुलदेवाचे कुशस्थळीहून मंगेशी-प्रियोळ येथे स्थलांतर: सन १५६० साली पोर्तुगीजांनी सासष्टी महालावर आक्रमण करण्याचे ठरविले. त्या महालात कुशस्थली या गावात श्री मंगेशाचे देवालय होते..... रातोरात श्री मंगेशाचचे लिंग व इतर परिवार दैवते तिकडून उचलली......१५६० साली नवीन जागेमधे कुलदेवाची स्थापना करण्यासाठी मंदिरासारखे दिसणारे एक झोपडीवजा देवालय बांधण्यात आले....जिर्णोध्दार....
वरील सर्व विवेचनांवरुन, कथांवरुन वाचकांच्या लक्षात आले असेलच, श्री मंगेश म्हणजेच श्री महादेव, गौड सारस्वतांच्या अनेक कुलदैवतांपैकी एक.

7
Answer link
ऍक्च्युली शिव तत्व is everywhere.. शिव तत्व प्रत्येकामध्ये आहे.. पुराणांनुसार शिव कैलाSpecificवर राहतात जो हिमालयाचाच एक भाग आहे.. आणि माउंट एव्हरेस्ट वर गेल्याचे अनेक रेकॉर्ड्स आहेत पण कैलाश पर्वतावर कोणीही गेल्याचा एकही ऑफिशियल रेकॉर्ड नाहीये..
8
Answer link
विठोबा, विठू, विठ्ठल, पांडुरंग, वा पंढरीनाथ ही हिंदू देवता मुख्यतः भारताच्या महाराष्ट्र व कर्नाटक ह्या राज्यात वंदिली जाते. विठोबा हा श्रीहरी चा द्वापार युगातील दुसरा आणि दशावतारातील नववा अवतार आहे. परंतु शास्त्र-पुराणांमध्ये विठठलाला बौध्य वा बोधराज म्हटले आहे. गरुड पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे बौध्य हा विशाल भाल असलेला, तेजस्वी नेत्रांचा, मौन धारण केलेला, कटि-कर ठेवून उभा असा आहे. हे वर्णन पूर्णपणे विठ्ठ्लाला लागू पडते.. विठोबाच्या प्रतिमा ह्या कटीवर हात ठेऊन, भक्त पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर उभ्या राहिलेल्या सावळ्या पुरुषाच्या वेषात दर्शवितात. त्याच्या संगे काही वेळा पत्नी रखुमाई उर्फ रुक्मिणी उभी असते.
विठोबा हा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे व कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे आराध्य दैवत आहे. त्याचे प्रमुख मंदिर महाराष्ट्रात कर्नाटक सीमेजवळ पंढरपूर येथे आहे. जरी हे मंदिर कधी बांधले गेले हे निश्चित माहित नसले तरी ते तेराव्या शतकापासून उभे आहे ह्याचे पुरावे आढळतात. पंढरपूरमध्ये वर्षातून चार यात्रा भरतात. त्यातील आषाढी एकादशीला भरणार्या यात्रेत लाखो भाविक सहभागी होतात. आलेले भाविक भीमा नदीमध्ये स्नान करतात. या नदीला येथे चंद्रभागा म्हणतात. विठोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत होय.[१]
विठोबा हा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे व कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे आराध्य दैवत आहे. त्याचे प्रमुख मंदिर महाराष्ट्रात कर्नाटक सीमेजवळ पंढरपूर येथे आहे. जरी हे मंदिर कधी बांधले गेले हे निश्चित माहित नसले तरी ते तेराव्या शतकापासून उभे आहे ह्याचे पुरावे आढळतात. पंढरपूरमध्ये वर्षातून चार यात्रा भरतात. त्यातील आषाढी एकादशीला भरणार्या यात्रेत लाखो भाविक सहभागी होतात. आलेले भाविक भीमा नदीमध्ये स्नान करतात. या नदीला येथे चंद्रभागा म्हणतात. विठोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत होय.[१]