स्वयंपाक

तिरफळ म्हणजे काय? याचा वापर स्वयंपाकात कसा होतो?

1 उत्तर
1 answers

तिरफळ म्हणजे काय? याचा वापर स्वयंपाकात कसा होतो?

2
तिरफळे ही साधारणपणे वाटण्याच्या आकाराची, तपकिरी रंगाची, टणक अशी फळे असतात आणि आत काळी बी असते. त्यांना विशिष्ठ असा एक उग्र वास असतो. त्याची चव साधारण आंबट-तिखट अशी असते.


कोंकण-गोवा-कारवार पट्ट्यात यांचा वापर स्वयंपाकघरात होतो.

काही ठराविक माशांचे प्रकार जसे की बांगडा, कर्ली इत्यादींमध्ये याचा वापर केला जातो. तसेच खतखत्यासारख्या काही शाकाहारी पदार्थांतही त्याचा वापर केला जातो.

याचे काही औषधी गुणधर्मही आहेत असे म्हटले जाते
तिरफळे ही साधारणपणे वाटण्याच्या आकाराची, तपकिरी रंगाची, टणक अशी फळे असतात आणि आत काळी बी असते. त्यांना विशिष्ठ असा एक उग्र वास असतो. त्याची चव साधारण आंबट-तिखट अशी असते. कोंकण-गोवा-कारवार पट्ट्यात यांचा वापर स्वयंपाकघरात होतो..वैदिक शास्त्रानुसार गेली 5000 वर्षे, आयुर्वेदिक औषध प्रणाली त्यांच्या औषधीय आणि आरोग्य निर्मात्या गुणधर्मांसाठी अनेक वनस्पतींचे वापर करत आहे. आयुर्वेदिक आणि लौकिक औषध प्रणाली अधिक सर्वांगीण प्रदर्शनावर अवलंबून आहे. त्रिफळा नावाच्या एक मौल्यवान वनस्पतीचे फायदे आणि वापरांवर प्रकाश टाकू या. तुम्ही वनस्पतीजन्य किंवा आयुर्वेदिक औषधे नियमितपणें घेत असल्यास, तुमचे लक्ष त्रिफळावर नक्कीचे गेलेले असेल. “शारंगधर संहिता” नावाच्या प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथामध्ये प्रसिद्ध बहुवनस्पतीय (एकापेक्षा अधिक वनस्पतीने बनलेले) मिश्रणांचे उल्लेख सापडते आणि “चरक संहिता” नावाच्या ग्रंथात विशेष करून त्रिफळाचे आरोग्य फायदे सापडतात.
त्रिफळाचे फायदे व सेवन [७] संपादन करा
अशक्तपणावर फायदेशीर
शारीरिकरित्या कमकूवत असणाऱ्या व्यक्तीसाठी त्रिफळा रामबाण ठरते. याचे सेवन केल्याने स्मरणशक्ती सुधारते. दुर्बलता कमी होते. हरडा, बेहडा, आवळा, तूप आणि साखर यांच्या सह त्रिफळाचे सेवन केल्यास अतिशय फायदेशीर ठरते.

रोगप्रतिकारकशक्ती वाढते
त्रिफळाच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. मात्र यासाठी त्रिफळाचे सेवन नियमित करणे आवश्यक आहे.

उच्च रक्तदाबावर गुणकारी
त्रिफळाचे सेवन केल्याने हृदयरोग, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यावर फायदा होतो. मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या वाढत्या स्तरामुळे हैराण असाल तर 3-4 ग्रॅम त्रिफळा चूर्ण दूधात घालून दररोज रात्री झोपण्यापूर्वी सेवन करा. नक्कीच आराम मिळेल.

बद्धकोष्ठतेवर फायदेशीर
त्रिफळा चूर्णाचे महत्त्वाचा गुण म्हणजे यामुळे बद्धकोष्ठतेवर आराम मिळतो. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत खाण्या-पिण्याच्या वेळा नियमित नसतात, ताण-तणाव तर कायम असतोच. त्यामुळे अधिकतर लोक बद्धकोष्ठतेने हैराण आहेत. हा त्रास असणाऱ्यांनी कोमट पाण्यात त्रिफळा चूर्ण घालून नियमित घ्या.

नेत्रविकारांवर आराम
त्रिफळा चूर्ण पाण्यात घालून त्याने डोळे धुतल्याने डोळ्यांचे त्रास दूर होतात. मोतीबिंदू, डोळ्यांची जळजळ, इतर दोष कमी करण्यासाठी 10 ग्रॅम गायच्या तूपात 1 चमचा त्रिफळा चूर्ण आणि 5 ग्रॅम मध घालून त्याचे सेवन करा.

त्वचारोगावर परिणामकारक
खाज, जळजळ, फोड्या यांसारख्या समस्यांवर त्रिफळा परिणामकारक ठरते. यासाठी सकाळ-संध्याकाळी 6-8 ग्रॅम त्रिफळा चूर्ण खाल्याने फायदा होतो. एक चमचा त्रिफळा चूर्ण एक ग्लास पाण्यात 2-3 तास भिजत ठेवा. त्यानंतर त्या पाण्यात गुळण्या करा. त्यामुळे तोंडाचे विकार दूर होण्यास मदत होईल.

डोकेदुखीवर
त्रिफळा, हळद, कडूलिंब यांच्या साली काढून पाण्यात उकळवा. हे पाणी गाळून सकाळ-संध्याकाळ गुळ किंवा साखरेसोबत प्या. डोकेदुखीवर आराम मिळेल.

जाडेपणावर उपयुक्त
जाडेपणामुळे त्रासलेले असाल तर त्रिफळाचे सेवन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. यासाठी त्रिफळाच्या कोमट काढ्यात मध घालून प्या. त्यामुळे चरबी कमी होते.


उत्तर लिहिले · 20/12/2021
कर्म · 121705

Related Questions

स्वयंपाक म्हणजे काय?
ओट्स म्हणजे काय, त्याचे फायदे आणि नुकसान कोणते आहे?
पोहे कशापासून तयार करतात?
आहार व पोषण या शाखेचा अभ्यास केलेली गृहिणी कोणता स्वयं रोजगार करू शकते?
पितळेच्या भांड्यात स्वयंपाक कसा करावा? कढी किंवा टोमॅटो असलेल्या भाज्या केल्याने पितळी भांडी खराब होतात का?
स्वयंपाकातील क्रियांशी संबंधित असणारे मराठीतील काही शब्दप्रयोग कोणते आहे?
स्वयंपाक करण्यासाठी कोणती भांडी वापरणे फायदेशीर आहे, स्टील का लोखंडी?