राजकारण निवडणूक लोकसभा निवडणूक प्रक्रिया

लोकसभेचे सदस्य कसे निवडले जातात?

2 उत्तरे
2 answers

लोकसभेचे सदस्य कसे निवडले जातात?

3
लोकसभेचे सदस्य हे जनतेने थेट निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, अर्थात त्यांची भारताच्या पात्र प्रौढ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघांतून थेट निवडणूक केली जाते. ... प्रत्येक लोकसभेचा कालावधी जास्तीत जास्त ५ वर्षे असतो, त्यानंतर लोकसभेचे आपणहून विसर्जन होते व नव्या लोकसभेसाठी निवडणुका होतात.
सदस्य: ५५२ (५५० निर्वाचित + २ नियुक्त)
प्रकार: कनिष्ठ सभागृह
सार्वत्रिक निवडणुकाद्वारे लोकसभेच्या सदस्यांची निवड केली जाते. लोकसभेच्या निवडणुका या दर पाच वर्षांनी होतात. लोकसभा निवडणुकीसाठी भौगोलिक मतदारसंघाची आखणी करण्यात येते.काहीवेळा पाच वर्षांची मुदत संपण्यापूर्वीच निवडणुका घेण्याची वेळ येऊ शकते. पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याआधी ज्या निवडणुका घ्याव्या लागतात त्यांना मध्यावधी निवडणुका म्हणून संबोधले जाते. अनेक वेळा अनेक कारणांनी मुदतीच्या आधी लोकसभा विसर्जित झाल्याची बरीच उदाहरणे आहेत. मात्र असे अपवादात्मकच आहे.
उत्तर लिहिले · 9/12/2021
कर्म · 121765
0

लोकसभेचे सदस्य खालीलप्रमाणे निवडले जातात:

  1. प्रादेशिक मतदारसंघ:
  2. लोकसभा निवडणुकीसाठी, प्रत्येक राज्य भौगोलिक क्षेत्रांमध्ये विभागले जाते, ज्याला प्रादेशिक मतदारसंघ म्हणतात. प्रत्येक मतदारसंघातून एक सदस्य निवडला जातो.

  3. वय आणि नागरिकत्व:
  4. १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचा कोणताही भारतीय नागरिक मतदार म्हणून नोंदणी करू शकतो.

  5. निवडणूक प्रक्रिया:
  6. निवडणूक प्रक्रियेत गुप्त मतदानाद्वारे मतदान होते. ज्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळतात, तो विजयी घोषित केला जातो.

  7. आरक्षण:
  8. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांच्यासाठी काही जागा राखीव असतात.

  9. निवडणूक आयोग:
  10. भारताचा निवडणूक आयोग निवडणुकांचे व्यवस्थापन करतो.

अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:
भारतीय निवडणूक आयोग

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 3600

Related Questions

एखाद्या व्यक्तीला 3 मुले आणि दोन पत्नी असल्यास त्याला निवडणूक लढवण्यासाठी तिकीट मिळेल का?
आज पर्यंत किती पंतप्रधान भारतात होऊन गेलेत?
जर एखाद्या व्यक्तीला तीन मुले असतील आणि त्याला नगरसेवक बनायचे असेल, तर त्यासाठी काय पर्याय आहे का?
निवडणूक घेणारी यंत्रणा कोणती?
उपराष्ट्रपतीची निवड कोणत्या कलमानुसार होते?
उपराष्ट्रपती कलम ७०?
उपराष्ट्रपतीला शपथ कोण देतात?