2 उत्तरे
2
answers
वृक्षतोड एक समस्या विषयाचे महत्त्व काय आहे?
2
Answer link
स्वच्छ, सुंदर, सुरक्षित, प्रदूषणविरहित, रमणीय पर्यावरणाची निर्मिती करणे. · झाडे हवेतील कार्बनडायऑक्साईड शोषून घेतात आणि प्राणवायु हवेत सोडतात. · अनेक झाडे ओझोनचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात. · दुर्मिळ प्राणी, वनौषधी वनस्पती यांचे जतन जंगलांमुळेच होत असते.
फार पूर्वीच कळली आहे. म्हणूनच एका संस्कृत श्लोकात सांगितले आहे की, जे त्यागाच्या भावनेने स्वत: उन्हात उभे राहतात, पण इतरांना सावली देतात; ज्यांची फळे-फुलेही दुसर्यांसाठीच असतात, असे त्यागमय जीवन जगणारे वृक्ष एखाद्या सत्पुरुषासारखेच भासतात. या वृक्षरूपी सत्पुरुषाचे सानिध्य अबाल्वृद्धाना, सामान्य जनांना व त्याचबरोबर सत्पुरुषांना लाभावे असे वाटते. म्हणूनच ऋषीमुनी रानावनात वस्ती करून निसर्गाच्या सान्निध्यात अध्ययन आणि तपश्चर्या करत असत.
संत तुकाराम म्हणतात, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे |’ इंदिरा संत म्हणतात, ‘जरी वेधिले चार भिंतींनी, या वृक्षांची मजला सांगत .’ सामान्य माणूसही नेहमीच्या दगदगीपासून दूर जाण्यासाठी, हवापालटासाठी थंड हवेच्या ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यातच जातो.
अशा या उपकारकर्त्या वृक्षांचा आज ऱ्हास होत आहे. मानवाने बेसुमार जंगलतोड करून वैराण वाळवंटे निर्माण केली आहेत. ‘After man the desert’, ‘मानवाचे पाऊल नि वाळवंटाची चाहुल’ अशी म्हण आहे. जळणासाठी आणि घरे बांधण्यासाठी बेसुमार वृक्षतोड केली गेली. त्यामुळे उष्णता वाढली. पावसाचे प्रमाण कमी झाले जमिनीची धूप होऊन ती नापीक झाली. दुष्काळाचे प्रमाण वाढले. परिणामी हवेच्या प्रदूषणासारख्या समस्यांना मानवाला तोंड द्यावे लागत आहे.
आपल्या पूर्वजांनी मानवी जीवनात वृक्षांना महत्त्व दिले होते . तुळस, वड, पिंपळ यांची पूजा ते करत असत. त्यांनी तुळस, बेल, दुर्वा, धोतरा या आणि अन्य वनस्पतींना देवतांच्या पूजेत स्थान दिले होते. वने ही राष्ट्रीय संपत्ती आहे ते खनिज संपत्तीप्रमाणे ओहोटीस लागणारे धन नाही. म्हणूनच सरकारने वनमहोत्सव हा राष्ट्रीय सण मानलेला आहे. सामाजिक वनीकरणाच्या मोहिमेखाली वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व वृक्षसंरक्षणासाठी कसोशीने प्रयत्न होत आहेत.
आज पृथ्वीची अवस्था वृक्षतोडीमुळे दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पृथ्वीवरील वातावरणाचा तोल ढळत आहे. झाडे जंगले कमी झाली. ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले. काही शतकांपूर्वी पृथ्वीचा सुमारे ६० % भाग वनांनी व्यापलेला होता, सध्या पृथ्वीचा केवळ २१ % भागातच वने आहेत. निसर्गाच्या साखळीत इतकी गुंतागुंतीची चक्रे आहेत, की माणसाला ती चक्रे निर्माण करणे तर सोडाच, पण ती चक्रे मोडली तर दुरूस्त करणेही जमण्यासारखे नाही. म्हणून प्रचंड प्रमाणात वाढलेल्या वृक्षतोडीमुळे एक दिवस ही पृथ्वी रसातळाला जाईल अशी भीती निर्माण झाली आहे. आज जंगलतोडीचे दुष्परिणाम निर्माण झाले आहेत. बेसुमार जंगलतोडीमुळे प्राणीही बेघर झाले आहेत आणि ते मानवी वस्त्यांमध्ये आसरा शोधात आहेत. त्यामुळे आज अनेक ठिकाणी मानवी वस्त्यांत बिबट्या घुसल्याच्या घटना नेहमीच घडत आहेत. गोष्टींच्या विचार करून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि सर्व लोकांना जंगलाचे महत्त्व समजावे .
जंगलतोड रोखणे, जंगलतोडीमुळे मानवी व पर्यावरणावर होणारा परिणाम या समस्यांपासून सुटका कशी करावी? हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जेणेकरून, जंगलतोड रोखली जाईल.
निसर्गाच्या या साखळीत इतकी गुंतागुंतीची चक्रे आहेत, की माणसाला ती चक्रे निर्माण करणे तर सोडाच, पण ती चक्रे दुरूस्त करणेही जमन्यासारखे नाही.
अशा मोडलेल्या बिघडलेल्या चक्रांपैकी एक म्हणजे जंगल. गेल्या कित्येक शतकांपासून जंगल तोडले एवढाच उद्योग माणसाने केला आहे. शेतीसाठी, शहरांच्या वाढीसाठी, कारखान्यांना कच्चा माल पुरवण्यासाठी, इंधनासाठी, खाणींसाठी, रेल्वे आणि रस्त्यांसाठी अशा नानाविध कारणांसाठी आपण जंगल तोडत राहिलो. त्याचे दुष्परिणाम झोंबू लागले आहेत.
जंगलतोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे , आज सर्व डोंगर, जंगल हे वृक्षतोडीमुळे ओसाड झाले आहेत. औषधीयुक्त वनस्पतींची दुर्मिळता झाली आहे. त्यामुळे पाऊससुद्धा पडत नाही. ज्या प्रमाणात जंगलतोड होते त्या प्रमाणात लागवड न झाल्याने निसर्गाच्या या मौल्यवान संपत्तीचा फार मोठा ऱ्हास होत आहे,
जंगलात माणूस जितकी कमीत कमी लुडबुड करेल तितके आपले चक्र दुरुस्त करण्याची निसर्गाला संधी मिळते, यासाठी खालील उपाय करता येतील.
जंगलतोड तर थांबलीच पाहिजे पण त्याचबरोबर नवीन झाडेही लावली गेली पाहिजेत पण निरीक्षणातून असे लक्षात येते की वृक्षरोपण केलेली ७०-८० टक्के झाडे मरतात. म्हणून त्यांची योग्य निगा राखून ती योग्य प्रकारे वाढतील याची काळजी घेतली पाहिजे. वृक्षरोपण करा तसेच वृक्षांचे रक्षण करा.
0
Answer link
वृक्षतोड एक समस्या: विषयाचे महत्त्व
वृक्षतोड ही एक गंभीर समस्या आहे आणि तिचे महत्त्व अनेक कारणांमुळे आहे:
पर्यावरणावर परिणाम:
- हवामान बदल: वृक्ष कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात, ज्यामुळे हवामान बदलाला आळा बसतो. वृक्षतोडीमुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते आणि ग्रीनहाऊस वायूंचा साठा वाढतो.
- जैवविविधता नष्ट: वृक्षतोडीमुळे अनेक वनस्पती आणि प्राणी यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होतात, ज्यामुळे जैवविविधतेचे नुकसान होते.
- मातीची धूप: झाडे मातीला घट्ट धरून ठेवतात, ज्यामुळे मातीची धूप कमी होते. वृक्षतोडीमुळे मातीची धूप वाढते आणि जमिनीची सुपीकता कमी होते.
- पाण्याचे व्यवस्थापन: झाडे पाणी शोषून घेतात आणि ते हळू हळू जमिनीत सोडतात, ज्यामुळे पाण्याची पातळी टिकून राहते. वृक्षतोडीमुळे पाण्याची पातळी घटते आणि दुष्काळ पडण्याची शक्यता वाढते.
आर्थिक आणि सामाजिक परिणाम:
- उपजीविकेचे साधन: अनेक लोकांची उपजीविका जंगलांवर अवलंबून असते. वृक्षतोडीमुळे त्यांचे उपजीविकेचे साधन नष्ट होते.
- नैसर्गिक आपत्ती: वृक्षतोडीमुळे पूर आणि भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढतो.
- आरोग्यावर परिणाम: वृक्षतोडीमुळे प्रदूषण वाढते, ज्यामुळे श्वसन आणि इतर आरोग्य समस्या वाढतात.
उपाययोजना:
- वृक्षतोड कमी करण्यासाठी कठोर नियम आणि कायद्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
- जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
- शाश्वत वन व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
- लोकांमध्ये वृक्षतोडीच्या गंभीर परिणामांबद्दल जागरूकता वाढवणे आवश्यक आहे.
वृक्षतोड ही एक जागतिक समस्या आहे, ज्यावर तातडीने उपाय करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी: