2 उत्तरे
2
answers
तारतम्य म्हणजे काय?
2
Answer link
तारतम्य म्हणजे स्थळ, काळ, प्रसंग, समोरील व्यक्ती आणि आपण जे बोलू त्याचे परिणाम हे सर्व लक्षात घेऊन वागणे वा बोलणे.
उदा. प्रत्येक माणसाचा मृत्यू हे अटळ सत्य आहे. जर तुमच्या ओळखीतली एक व्यक्ती मृत्यू पावली तर तुम्ही तिथे जाऊन आपण सगळेच मरणार आहोत त्यामुळे तुम्ही रडायचे काही कारण नाही असे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना सांगणार का? आपण त्यांचे सांत्वन करतो, त्यात दैवगती पुढे आपले काही चालत नाही वगैरे वाक्ये असतात. ज्यांचा अर्थ मृत्यू अटळ आहे हाच होतो पण आपण डायरेक्ट सांगत नाही.
एखाद्या अवघड प्रसंगी किंवा आपण जे बोलू त्याने आपले किंवा इतर कोणाचे नुकसान होईल हे माहीत असेल तर आपण उत्तर देण्याचे टाळतो किंवा 'नरो वा कुंजरो वा' प्रकारचे उत्तर देतो. याला सुद्धा तारतम्य म्हणतात.
0
Answer link
तारतम्य म्हणजे दोन गोष्टींमधील किंवा अनेक गोष्टींमधील फरक, भिन्नता किंवा वेगळेपणा समजून घेण्याची क्षमता.
उदाहरणार्थ:
- दोन रंगांमधील सूक्ष्म फरक ओळखणे.
- दोन व्यक्तींच्या बोलण्यातला Tone (आवाज) ओळखणे.
- परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेणे.
थोडक्यात, तारतम्य म्हणजे नेमकेपणाने आणि सूक्ष्मपणे फरक ओळखण्याची বুদ্ধী.