2 उत्तरे
2
answers
बावनकशी म्हणजे काय?
3
Answer link
बावनकशी म्हणजे काय?
बावनकशी चा मराठीत अर्थ : शुध्द , खरे, असली, साफ, दर्जेदार शुद्धतेची पारख-परीक्षा करण्याचे एक साधन असा होतो. बावनकशी ला इंग्रजी समानार्थी शब्द : Genuine, Pure, Criteria, Standard.

बावन्नकशी चा सोन्याच्या पलीकडे लाक्षणिक अर्थाने- माणसाचा स्वभाव, चारित्र्य, वागणूक, व्यवहार, भावना, भक्ती व नियत अशा गुणांची शुद्धता दाखविणारे विशेषण असा ही अर्थ होतो.
कस- कसोटी याच शब्दावरून बावनकशी आणि हिणकस ही विशेषणे प्रचलित झाली.
बावन्न कस असलेले सोने म्हणजे खरे शुद्ध सोने आणि हिणकस म्हणजे सोन्याच्या दागिन्याला आवश्यक काठिण्य मिळवण्यासाठी काही अंशात्मक प्रमाणात इतर हिण मिसळावे लागते. असे धातू जर सोन्यात मिसळले नाहीत तर सोन्याच्या दागिन्यांस काही एक स्थिर आकारच राहणार नाही. कारण सोने खुप नरम मऊ असते. हिण म्हणजेच तांबे, शिसे, लोखंड इत्यादी धातू. पण काही लबाड सोनार गरजेपेक्षा जास्त प्रमाणात असे इतर कमी प्रतीचे धातू -हिण खऱ्या सोन्यात मिसळतात. आणि असे हिणकस सोने चक्क शुद्ध बावनकशी सोने म्हणून विकतात. हिणकस सोने म्हणजे हिण मिश्रीत सोने किंवा इतर हीन / हिण दर्जाचे धातू मिश्रित सोने.
जुन्याकाळी खऱ्या सोन्याला साडेपंधरी, बावन्नकशी म्हणायचे, हल्ली दशमान पद्धती आल्यावर शंभर नंबरी सोन, १००/१०० गुण असलेले सोने असे विशेषण खऱ्या सोन्यासाठी वापरतात.
कसोटी …प्रतिमेचे श्रेय : Image Link >> http://adelaidegoldbuyers.com
कसोटी हा काळ्या रंगाचा खरखरीत पृष्ठभागाचा दगड असतो. या कसोटीवर सोन्यास घासून शुद्धतेची पारख केली जाते. सोने कसोटीवर घासल्या नंतर जी ओरखडया सारखी रेघ उमटते त्यावर हैड्रोक्लोरिक आणि नायट्रिक ऍसिडचे मिश्रण लावल्याने रंगात होणारा बदल होतो. ओरखडयातील सोन्याचा असलेला अंश यावरून सोन्याच्या शुद्धतेची ची पारख होते. त्यातील सोन्याच्या प्रमाणाचा - टक्केवारीचा म्हणजे कॅरेटचा अंदाज करता येतो. याला कसोटीवर कस लावणे असे म्हणतात. असे बावन्न कस असलेले सोने म्हणजे खरे 100 % शुद्ध - सोने असते.

कसोटी = काळा दगड ज्यावर सोने घासुन सोनार सोन्याचा कस दर्जा गुणवत्ता ठरवतात. प्रतिमेचे श्रेय : alamy.com
सोने खूप लवचिक असल्यामुळे निव्वळ शुद्ध सोन्याचे अलंकार व दागिने घडवता येत नाहीत म्हणून त्यात इतर धातू काठिण्य येण्यासाठी व जोडकामासाठी /सांधण्यासाठी वापरावे लागतात. म्हणून दागिने व अलंकारातील सोने आपण समजतो तितके शुद्ध नसते. आणि म्हणूनच सोनार आपल्याकडून जुने दागिने परत घेताना घसघशीत घट कापून घेतो.
* व्यवहारात सोन्याचे व कॅरेट चे टक्केवारी प्रमाण खाली दिले आहे.
> २४ कॅरट = ९९.५० % ;
> २२ कॅरट = ९१.६० % ;
> १८ कॅरट = ७५ %
हल्ली सोन्याच्या शुद्धतेची खात्री देणारे BIS व हॉलमार्क या मानकांचे पालन करणे सोनारांना सक्तीचे केले आहे.
KDM या धातूने सोन्याचे दागिने घडवण्यात खूप कमी घट होते. KDM म्हणून खूप लोकप्रिय झालेले. KDM Kadmium धातु तांबे या धातु ऐवजी वापरल्यास सोन्याची घट नगण्य पण सोने घडवणा-या कारागीरास कँन्सर फुफ्फुस रोग होतो म्हणुन KDM बंदी आहे.
*
या परीक्षणाचे मुख्य तत्व म्हणजे दागिन्यांच्या सोन्याचा काही भाग कसोटीवर घासणे आणि त्यात हायड्रोक्लोरिक ऍसीड व नायट्रिक ऍसीडीचे मिश्रण त्यावर टाकणे होय. परिणामी सोन्याचा बदललेला रंग आणि किंवा सोन्याचे त्यातील प्रमाण अस्तित्व यावरून सोन्याची शुद्धता किंवा कॅरेट निश्चित केली जाते .
0
Answer link
बावनकशी हा शब्द विशेषत: लाकडी वस्तूंच्या नक्षीकामासाठी वापरला जातो.
अर्थ: 'बावन' म्हणजे ५२ आणि 'कशी' म्हणजे कलाकुसर किंवा नक्षीकाम. बावनकशी म्हणजे लाकडी वस्तूवर ५२ प्रकारची कलाकुसर किंवा नक्षीकाम करणे.
या नक्षीकामामध्ये विविध प्रकारची डिझाईन्स, आकार आणि नमुने वापरले जातात. हे काम अतिशयSubtle आणि Attractive असते.
उदाहरण:
- लाकडी फर्निचर (टेबल, खुर्ची, कपाट)
- मंदिरातील लाकडी खांब आणि दरवाजे
- लाकडी खेळणी
- सजावटीच्या वस्तू
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: बावनकशी म्हणजे काय? - Google Search