2 उत्तरे
2
answers
अक्षवृत्त कशाला म्हणतात?
1
Answer link
पृथ्वीवरील समान अक्षांश असणाऱ्या सर्व ठिकाणांना जोडणाऱ्या पूर्व-पश्चिम काल्पनिक रेषेस अक्षवृत्त असे म्हणतात. एखाद्या ठिकाणाचे त्याच्या अक्षवृत्तावरील स्थान त्याच्या रेखांशाने दर्शविले जाते. अक्षवृत्तांच्या रेषा एकमेकांना समांतर असतात. जसजसे विषुवृत्तापासून उत्तर अथवा दक्षिण धृवाकडे जावे तशी अक्षवृत्ते लहान होत जातात. World map longlat.svg
अक्षांश असणाऱ्या सर्व ठिकाणांना जोडणाऱ्या पूर्व-पश्चिम काल्पनिक रेषेस अक्षवृत्त असे म्हणतात. एखाद्या ठिकाणाचे त्याच्या अक्षवृत्तावरील स्थान त्याच्या रेखांशाने दर्शविले जाते.
पृथ्वीचा नकाशा

रेखांश (λ)
ह्या आकृतीत रेखांशांच्या रेषा वक्र आणि उभ्या भासत असल्या तरी प्रत्यक्षात त्या अर्धवर्तुळे आहेत.
अक्षांश (φ)
ह्या आकृतीत अक्षांशांच्या रेषा सरळ आणि आडव्या भासत असल्या तरी प्रत्यक्षात त्या वर्तुळाकार आहेत. समान अक्षांशांच्या सर्व स्थानांना जोडणार्या काल्पनिक वर्तुळास अक्षवृत्त असे म्हणतात.
विषुववृत्ताचे अक्षांश 0° असून ते पृथ्वीच्या गोलाला दक्षिण आणि उत्तर गोलार्धात विभागते.

अक्षवृत्तांच्या रेषा एकमेकांना समांतर असतात. जसजसे विषुवृत्तापासून उत्तर अथवा दक्षिण धृवाकडे जावे तशी अक्षवृत्ते लहान होत जातात. विषुववृत्त हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे.
0
Answer link
अक्षवृत्त:
अक्षवृत्त म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील समान अक्षांश (latitude) असणाऱ्या ठिकाणांना जोडणारी काल्पनिक रेषा. पृथ्वीवर पूर्व-पश्चिम दिशेत, विषुववृत्ताला (equator) समांतर असणाऱ्या या वर्तुळाकार रेषा आहेत.
महत्वाची अक्षवृत्ते:
- विषुववृत्त (0°): पृथ्वीला उत्तर आणि दक्षिण गोलार्धात विभागणारी सर्वात मोठी अक्षवृत्तीय रेषा.
- कर्कवृत्त (23.5° उत्तर): उत्तर गोलार्धातील महत्त्वाचे अक्षवृत्त.
- मकरवृत्त (23.5° दक्षिण): दक्षिण गोलार्धातील महत्त्वाचे अक्षवृत्त.
- आर्क्टिक वृत्त (66.5° उत्तर): उत्तर ध्रुवाजवळचे अक्षवृत्त.
- अंटार्क्टिक वृत्त (66.5° दक्षिण): दक्षिण ध्रुवाजवळचे अक्षवृत्त.
अक्षवृत्तांचा वापर पृथ्वीवरील ठिकाणांचे स्थान निश्चित करण्यासाठी होतो.