संधी अर्थशास्त्र

संधी म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

संधी म्हणजे काय?

2
संधी:
जवळ जवळ आलेले दोन ध्वनी जोडण्यालासंधी म्हणतात. संधी होत असतांना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि शेवटच्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळून त्या दोहोबद्दल एकच वर्ण तयार होतो याला 'संधी' असे म्हणतात. संधी म्हणजे एक प्रकारची जोडखरेच होय.

उदा.

ईश्र्वरेच्छा = ईश्र्वर + इच्छा
सूर्यास्त = सूर्य + अस्त
सज्जन = सत् + जन
चिदानंद = चित् + आनंद
संधीचे मुख्य तीन प्रकार आहेत.

स्वरसंधी
व्यंजन संधी
विसर्गसंधी
1. स्वर संधी –

एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर त्यांना ‘स्वरसंधी’ असे म्हणतात किंवा एक पाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला स्वरसंधीअसे म्हणतात.

2. व्यंजनसंधी –

दोन व्यंजने किंवा यापैकी दूसरा वर्ण स्वर असेल तर त्याला मिळून तयार होणार्‍या संधीला व्यंजनसंधी असे म्हणतात.

3. विसर्ग संधी –

विसर्गाच्या पुढे कोणतेही मृदु व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो व तो मागील अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो. याला विसर्ग उकार संधी असे म्हणतात.
उत्तर लिहिले · 1/11/2021
कर्म · 121765
0

संधी म्हणजे विशिष्ट परिस्थितीत काहीतरी करण्याची किंवा साध्य करण्याची शक्यता किंवा योग्य वेळ.

संधीचे काही प्रकार:

  • नोकरीची संधी: नवीन नोकरी मिळण्याची शक्यता.
  • शिक्षणाची संधी: शिक्षण घेण्याची शक्यता.
  • व्यवसायाची संधी: नवीन व्यवसाय सुरू करण्याची किंवा वाढवण्याची शक्यता.

संधीचा फायदा घेण्यासाठी तयार असणे महत्त्वाचे आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 5220

Related Questions

संपत्ती शब्दाचा संधी विग्रह काय होईल?
माझे वय २६ आहे तर मला धंदा करायचा आहे, तर मी कोणता धंदा करू शकतो?
षण्मास हा कोणत्या प्रकारचा संधी आहे?
सन्मार्ग या शब्दाचा संधीविग्रह काय आहे?
संधी म्हणजे काय? संधीचे प्रकार कोणते?
पररूप संधीचे वीस शब्द कोणते आहेत?
पूर्वरूप संधीचे वीस शब्द कोणते आहेत?