मराठी भाषा व्याकरण संधी

संधी म्हणजे काय? संधीचे प्रकार कोणते?

2 उत्तरे
2 answers

संधी म्हणजे काय? संधीचे प्रकार कोणते?

2



संधी म्हणजे काय | संधीचे प्रकार | 

: मराठी व्याकरणामध्ये ‘संधी’ हा अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आपण या लेखात संधी म्हणजे काय आणि संधीचे प्रकार मध्ये – स्वरसंधी, व्यंजनसंधी व विसर्गसंधी कश्या प्रकारे ओळखावे, हे पाहूया.

संधी म्हणजे काय | संधीचे प्रकार |
संधी म्हणजे काय
आपण बोलत असताना अनेक शब्द एकापुढे एक असे उच्चारतो. त्यावेळी एकमेकांशेजारी येणारे दोन वर्ण एकमेकांमध्ये मिसळतात व त्यांचा एक जोडशब्द तयार होतो. उदाहरणार्थ, ‘ सूर्य उदय झाला ‘ असे न म्हणता ‘ सूर्योदय ‘ झाला असे आपण सहज स्व बोलून जातो ‘ इति आदी ‘ न म्हणता आपण ‘ इत्यादी ‘ असा शब्द बनवतो. ‘ वाक् मय ‘ यांच्याऐवजी ‘ वाङ्मय ‘ असा एक शब्द तयार करून आपण बोलतो. अशा प्रकारचे जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोहोंबद्दल एक वर्ण तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात. ‘ संधी ‘ म्हणजे सांधणे, जोडणे होय.


संधींचे प्रकार
स्वरसंधी – एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर ने जोडले असतील तर त्यांना स्वरसंधी असे म्हणतात.

स्वर + स्वर असे त्यांचे स्वरूप असते. उदा . कवि + ईश्वर = (इ + ई = ई) कवीश्वर.

व्यंजनसंधी – जवळ जवळ येणाऱ्या या दोन वर्णांपैकी दोन्ही वर्ण व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला व्यंजन असे म्हणतात. व्यंजन + व्यंजन किंवा व्यंजन + स्वर असे त्याचे स्वरूप असते.


उदा. सत् + जन = (त् + ज्) = सज्जन, – चित् + आनंद = (त् + आ) = चिदानंद

विसर्गसंधी – एकत्र येणाऱ्या वर्णांतील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तेव्हा त्यास विसर्गसंधी असे म्हणतात. विसर्ग + व्यंजन किंवा विसर्ग + स्वर असे त्याचे स्वरूप असते.

उदा. तपः + धन = तपोधन = (विसर्ग + ध्) + आत्मा = दुरात्मा = (विसर्ग + आ)

आपण बघितले की बोलताना जे जोडशब्द तयार होतात, त्या वर्णांच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास ‘ संधी ‘ असे म्हणतात. संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोहोंबद्दल एक वर्ण तयार होतो. संधी म्हणजे सांधणे, जोडणे होय.



उत्तर लिहिले · 25/12/2022
कर्म · 53715
0

संधी म्हणजे काय:

संधी म्हणजे दोन वर्ण एकत्र येऊन एक नवीन वर्ण तयार होणे. जेव्हा बोलताना आपण दोन शब्द एकमेकांच्या जवळ आणतो, तेव्हा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्यातून एक नवीन वर्ण तयार होतो. याला संधी म्हणतात.

संधीचे प्रकार:

संधीचे मुख्य तीन प्रकार आहेत:

  1. स्वर संधी:

    जेव्हा दोन स्वर एकत्र येतात आणि त्यांच्यात बदल होतो, तेव्हा स्वर संधी होते.

  2. व्यंजन संधी:

    जेव्हा व्यंजन आणि स्वर किंवा व्यंजन आणि व्यंजन एकत्र येतात आणि त्यांच्यात बदल होतो, तेव्हा व्यंजन संधी होते.

  3. विसर्ग संधी:

    जेव्हा विसर्गाच्या पुढे स्वर किंवा व्यंजन येते आणि त्यांच्यात बदल होतो, तेव्हा विसर्ग संधी होते.

उदाहरण:

  • स्वर संधी: विद्या + अर्थी = विद्यार्थी (आ + अ = आ)

  • व्यंजन संधी: सत् + जन = सज्जन (त् + ज = ज्)

  • विसर्ग संधी: मनः + रम = मनोरम (ः + र = ओ)

संधी मराठी व्याकरणात शब्दांना जोडण्याचे आणि उच्चार सुलभ करण्याचे महत्त्वाचे साधन आहे.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

माझे वय २६ आहे तर मला धंदा करायचा आहे, तर मी कोणता धंदा करू शकतो?
षण्मास हा कोणत्या प्रकारचा संधी आहे?
सन्मार्ग या शब्दाचा संधीविग्रह काय आहे?
पररूप संधीचे वीस शब्द कोणते आहेत?
पूर्वरूप संधीचे वीस शब्द कोणते आहेत?
हम आरंभ, समारंभ या प्रकारातील संधीची आणखी दोन उदाहरणे कोणती येतील?
ग्रामिण व शहरी भागातील विद्यार्थ साठी?