2 उत्तरे
2
answers
गो.ग. आगरकर व लोकमान्य टिळक यांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली?
4
Answer link
आगरकर हे बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक (१८८०-१८८१) होते.
पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना लोकमान्य टिळक व आगरकर या दोघांच्याही मनात स्वदेशसेवेची प्रेरणा जागी झाली. दिनांक १ जानेवारी, १८८० रोजी विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. आगरकर १८८१ मध्ये एम. ए. झाल्यावर चिपळूणकरांना जाऊन मिळाले. आगरकर व टिळक यांनी १८८१ मध्ये इंग्रजीतून ‘मराठा’, तर मराठीतून ‘केसरी’ अशी दोन वृत्तपत्रे चालू केली. केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले.
पुढे लोकमान्य टिळक व आगरकर यांनी २४ ऑक्टोबर १८८४ ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व त्या अंतर्गत १८८५ साली फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले, पुढे ते फर्ग्युसनचे प्राचार्यही झाले.
0
Answer link
गो.ग. आगरकर व लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे:
- केसरी: हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केले. हे मराठी भाषेत होते.
- मराठा: हे वृत्तपत्रसुद्धा लोकमान्य टिळकांनी सुरू केले, जे इंग्रजी भाषेत होते.
- सुधारक: हे वृत्तपत्र गो.ग. आगरकरांनी सुरू केले.
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: