3 उत्तरे
3
answers
समाजशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा?
2
Answer link
सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजशास्त्र उपयुक्त असते. हे शास्त्र आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे आहे. यामुळे याचा मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास व संख्याशास्त्र अशा अनेक शाखांशी संबंध येतो. यामध्ये लोकांच्या जीवनाचे वास्तव चित्रणाचे रुप रेखाटले जाते.
समाजशास्त्र (Sociology) म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास होय. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो.[१] सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजशास्त्र उपयुक्त असते. हे शास्त्र आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे आहे. यामुळे याचा मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास व संख्याशास्त्र अशा अनेक शाखांशी संबंध येतो.[२] यामध्ये लोकांच्या जीवनाचे वास्तव चित्रणाचे रुप रेखाटले जाते. लोकांच्या सामाजिक प्रश्नांचे निवारण येथे केले जाते.
व्यवस्थाबद्द ज्ञान सम्मुचयास शास्त्र असे म्हणतात. अभ्यास विषयाच्या आधारे शास्त्राचे दोन प्रकार केले जातात. १) नैसर्गिक २) सामाजिक शास्त्र.
नैसर्गिक विज्ञानात समाजोत्तर घटनांचे अध्ययन केले जाते. यामध्ये रासायनिक प्रक्रिया, वनस्पती, उर्जा इ. विषयांचे अध्ययन करण्यात येते. या विषयांचे अध्ययन करण्यासाठी पदार्थ विज्ञान, वनस्पती शास्त्र, रसायनशास्त्र, इ. शास्त्रांचा समावेश केला जातो.
सामाजिक शास्त्रांचा अभ्यासविषय सामाजिक घटना असतात. उदा. सामाजिक संबंध, आर्थिक प्रयत्न, मानसिक वर्तन, राजकीय वर्तन इ. अभ्यास समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, गुन्हेगारी शास्त्र, इ. शास्त्रामध्ये करण्यात येतो.
थोडक्यात म्हणजे सामाजिक घटनांच्या अभ्यासाषी निगडीत असणारे शास्त्र म्हणून समाजशास्त्राला सामाजिक शास्त्र असे म्हणतात.
शास्त्राच्या अभ्यास विषयाला केंद्रस्थानी मानले असताना शास्त्राचे आदर्षनिष्ठ शास्त्र, आणि विषुद्धशास्त्र असेही दोन प्रकार करता येतात.
आदर्श प्रमाणभूत मानुन अध्ययन करणारी शास्त्रे म्हणजे तर्कशास्त्र व नितीशास्त्र ही होय. याउलट समाजातील घटनांचा तटस्थ वृत्तीने अभ्यास करणारी शास्त्रे म्हणजे विशुद्ध शास्त्रे होय. समाजशास्त्रात तटस्थ वृत्तीने समाजातील घटनांचा अभ्यास केला जात असल्याने ते एक विशुद्ध शास्त्र आहे.
0
Answer link
समाजशास्त्राचे महत्त्व:
समाजशास्त्र हे मानवी समाजाचा आणि सामाजिक वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. हे शास्त्र सामाजिक संबंध, सामाजिक संस्था आणि सामाजिक बदलांचा अभ्यास करते.
समाजशास्त्राचे काही महत्वाचे फायदे:
- समाजाला समजून घेणे: समाजशास्त्र आपल्याला समाजाची रचना, कार्ये आणि समस्या समजून घेण्यास मदत करते.
- सामाजिक समस्यांचे निराकरण: हे सामाजिक समस्यांची कारणे आणि परिणाम समजून घेण्यास मदत करते, ज्यामुळे त्यांचे निराकरण करणे शक्य होते.
- धोरण निर्माण: समाजशास्त्राचा उपयोग सामाजिक धोरणे आणि कार्यक्रम तयार करण्यासाठी उपयुक्त ठरतो.
- Critical thinking: समाजशास्त्र आपल्याला जगाकडे अधिक Critical दृष्टिकोन ठेवून बघायला शिकवते.
- Tolerance: वेगवेगळ्या संस्कृती आणि जीवनशैलींबद्दल Tolerance वाढवते.
थोडक्यात, समाजशास्त्र हे एक महत्त्वाचे शास्त्र आहे जे आपल्याला आपले जीवन आणि जग अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते.
अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता: