समाज सामाजिक महत्त्व

आपल्या जडणघडणीत समाजाचे महत्त्व सांगा?

2 उत्तरे
2 answers

आपल्या जडणघडणीत समाजाचे महत्त्व सांगा?

1
समाजाचे अस्तित्व, सातत्य, स्वास्थ्य आणि सुरक्षितता यांच्या संवर्धनार्थ स्थापन झालेल्या सुविहित यंत्रणा. त्यांच्या प्रकारांत भिन्नता असली आणि त्यांची व्याप्ती संस्थापरत्वे लहान-मोठी असली आणि उद्देश व हेतू वेगवेगळे असले, तरी त्यांचे स्वरूप सार्वत्रिक, सार्वकालिक व परिवर्तनीय असते. सामाजिक संबंधांचे स्वरूप निश्चित व सुस्थिर राहण्यासाठी रुढी, परंपरा, लोकरीती, संकेत, लोकाचार इत्यादींचा आधार घेतला जातो. मूलभूत नेव का पाठ गिसामाजिक कार्याच्या पूर्तीसाठी व्यक्तिवर्तनाला संघटित रुप देणारी व्यवस्था कार्यान्वित करण्याचे काम सामाजिक संस्था करतात; कारण समाजाऐबरोबर व्यक्तिगत गरजांची पूर्तताही सामाजिक संस्थांमार्फत होते. समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे ठरते. उदा., विवाह व कुटुंबसंस्था यांमुळे समाजाचे वंशसातत्य व लोकसंख्या नियंत्रित ठेवली जाते, तशीच ती व्यक्तीच्या भावनिक व वैवाहिक संबंधांच्या गरजा पूर्ण करते.

या गरजा स्थलकाल व परिस्थितिसापेक्ष असतात. समाजनियंत्रणाच्या संदर्भात सामाजिक संस्थांकडे एक प्रभावी साधन म्हणून पाहिले जाते. काळाच्या बदलाबरोबर संस्थांमध्ये नवमताचा प्रवाह येणे, परिवर्तन होणे, रचनात्मक व कार्यात्मक नियम बदलणे, नवी प्रतीके व मूल्ये संपादन केली जाणे,बदलणे, नवी प्रतीके व मूल्ये संपादन केली जाणे, या गोष्टी अटळ असतात व त्या घडत राहतात; मात्र सर्व समाजाकडून त्यास सहमती मिळतेच असे घडत नाही; कारण बहुसंख्य गटांची त्याविषयी स्वतंत्र तत्त्वप्रणाली, मते व दृष्टिकोण असतात; त्यांच्या नियंत्रणपद्धतीमध्ये फरक आढळतो. संस्थांच्या जडणघडणीवर सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि भौगोलिक परिस्थितीचा प्रभाव व परिणाम होत असतो. मानवी समाजात संस्थांचे स्थान उत्कांतिवादी व सार्वत्रिक आढळते. त्यात मानवाचे मूलभूत गुण व वैशिष्ट्ये यांचे दर्शन होते.

प्रत्येक संस्थेचे कार्य, स्वरुप, हेतू व क्षेत्र ठरलेले असते. कुटुंब व नातेव्यवस्था या संस्था समाजातील व्यक्तीचे जैविक संबंध व प्रजनन यांवर नियंत्रण ठेवतात. शैक्षणिक संस्था व्यापक व विस्तारितस्वरूपात कार्य करतात आणि लहान बालकापासून प्रौढ व्यक्तीपर्यंतच्या सर्वांना ज्ञानदान करतात. व्यक्तिमत्त्व विकासात त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. या संस्थांद्वारे समाजाचा सांस्कृतिक वारसा व आदर्श मूल्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द केली जातात. अर्थकारण व अर्थशास्त्र या क्षेत्रांशी निगडित संस्था उत्पादन, विभाजन, सेवा व वस्तुविनिमय, त्यांचा उपभोग यांबाबत दक्ष असतात. समाजात त्यांना महत्त्वाचे स्थान असते. राजकीय संस्था सर्व नियमनांद्वारे समाजात शांतता, सुव्यवस्था राखून अराजकी शक्तींवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. सांस्कृतिक संस्था ह्या मुख्यत्वे धार्मिक, वैज्ञानिक व कलात्मक क्षेत्रांना योगदान देऊन सांस्कृतिक ठेव्याचे संरक्षण-संवर्धन करतात; तसेच संस्कृतीचे काटेकोरपणे संरक्षण करतात.या सर्व संस्थांमध्ये स्तरीकरणनामक संस्था समाजात मूलभूत भूमिका बजावते. समाजातील प्रत्येक व्यक्तीला मिळणारा दर्जा अथवा स्थान, पुरस्कार, पारितोषिके, चरितार्थाची साधने व त्यांची प्राप्ती इत्यादींची तपशिलवार नोंद ठेवून यांतील विविधता आणि विभाजनाचे कमी-अधिक प्रमाण यांबाबतच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न ती करते. ही सर्व कार्ये समाजातील ज्येष्ठ, प्रतिष्ठित व प्रभावी व्यक्ती आणि गट करीत असतात. प्रसिद्ध अमेरिकन समाजशास्त्रज्ञ • टॅलकॉट एडवर्ड पार्सन्झ हे संस्थांच्या विविधतेचे विश्लेषण करताना म्हणतात, 'सामाजिक संस्थांत आढळणारे भेद हे अर्थातच समाजाच्या स्वरूपावर, त्यांतील लोकांच्या व गटांच्या जीवनपद्धतीवर आणि समाजातील प्रस्थापित व्यवस्था यांवर अवलंबून असतात. या कारणामुळे हे वेगवेगळेपण आढळते. अश्मयुगीन मानवापासून आधुनिक मानवापर्यंतच्या अवस्थांत होत गेलेल्या क्रमविकासामुळे सामाजिक संस्थांतही उत्कांती झालेली दिसते.
उत्तर लिहिले · 21/11/2021
कर्म · 121765
0

माणसाच्या जडणघडणीत समाजाचे महत्व अनमोल आहे. व्यक्ती म्हणून आपण कसे आहोत, हे बऱ्याच अंशी समाज ठरवतो. खाली काही मुद्दे दिले आहेत:

1. सामाजिक संवाद आणि भाषा:

माणूस हा समाजशील प्राणी आहे. तो समाजाच्या माध्यमातून संवाद साधायला शिकतो. भाषा हे संवादाचे महत्त्वाचे साधन आहे. लहान मुले समाजात लोकांबरोबर बोलून, त्यांचे अनुकरण करून भाषा शिकतात.

2. संस्कृती आणि परंपरा:

प्रत्येक समाजाची स्वतःची अशी संस्कृती आणि परंपरा असते. ह्या परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या असतात. व्यक्ती आपल्या समाजाच्या चालीरिती, सण-उत्सव, आणि मूल्यांचे शिक्षण समाजातच घेते.

3. सामाजिक भूमिका आणि जबाबदाऱ्या:

समाजात प्रत्येक व्यक्तीची एक विशिष्ट भूमिका असते. उदाहरणार्थ, कुटुंबात आई, वडील, मुलगा, मुलगी अशा भूमिका असतात. शाळेत शिक्षक आणि विद्यार्थी असतात. समाजात वावरताना व्यक्तीला ह्या भूमिका आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.

4. नैतिक आणि सामाजिक मूल्ये:

समाज आपल्याला चांगले-वाईट, ন্যায়-अन्याय यांमधील फरक शिकवतो. प्रामाणिकपणा,tolerance (सहिष्णुता), respect (आदर), love (प्रेम) आणि compassion (दया) यांसारखी नैतिक मूल्ये समाजात रुजलेली असतात.

5. शिक्षण आणि ज्ञान:

समाज शिक्षणाचे महत्त्व जाणतो आणि ज्ञानार्जनासाठी विविध संधी उपलब्ध करून देतो. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि इतर शिक्षण संस्था समाजात ज्ञानाचा प्रसार करतात.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1040

Related Questions

राष्ट्रीय उद्यानाचे सामाजिक महत्त्व कोणते आहे?
आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र या वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ कोणता आहे?
समाजशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा?
आपल्या जडणघडणीत समाजाचे महत्त्व तुमच्या शब्दांत सांगा?
भारतामध्ये 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' हा पुतळा उभारून काय फायदे झाले? का बरे एवढे पैसे खर्च केले असतील?