पर्यावरण महासागर उपयोग

महासागर हे आपल्यासाठी उपयोगी आहे की नाही?

3 उत्तरे
3 answers

महासागर हे आपल्यासाठी उपयोगी आहे की नाही?

3
तुमचा प्रश्न हा प्रश्न नाही तर माहिती जरी असले तरी विचारणे खूप योग्य आहे.

तुम्हांला माहिती असेलच पृथ्वीवर पाणी आहे म्हणूनच जीवसृष्टी आहे, तुम्ही आणि आम्ही आहोत. 

मानवाला पृथ्वीवर जिवंत राहण्यासाठी सूर्य जितका महत्त्वाचा व गरजेचा आहे तितकेच महासागर म्हणा किंवा मोठा समुद्र म्हणा हे आपल्याला गरजेचे आहे. समुद्री पाण्यामुळेच पाऊस पडतो. आपली धरणे, ओहळ, तलाव किंवा नदी इ. यांना काठोकाठ पाणी भरते. 

सागराचे पाणी पाऊसाच्या रूपाने सर्व भुपृष्ठावर पसरते. ज्यामुळे भुपृष्ठावरील सर्व जीवांना मुबलक पाणी मिळते व जंगले हिरवेपान होतात. पावसाळी झाडेझुडपे व वनस्पती यांना मुबलक पाणी  मिळून त्यांना पाने, फुले व फळे येतात. ज्या झाड्याझुडपांना व वनस्पतींना पुरेसे पाणी मिळत नाही ते सुुकून जाते. 

दररोज जेवण म्हणून गरजेचे असलेले भातासारखे कणीस पीक पुरेसे व मुबलक पाणी मिळाले तरच त्याचे पीक येते. असे अनेक मानवाला दररोजच्या आहारात गरजेचे असलेले पीक पावसाच्या मुबलक व पुरेसे पाण्यामुळे पीक येते. हे पुरेसे व मुबलक पाणी सहजासहजी निसर्गतः पाऊसामुळे मिळते.
मानवाला शेती करण्यासाठी पुरेसे पाणी पाऊसामुळे मिळते. 

मानवाला जगण्यासाठी गरजेचे असलेले पुरेसे आँक्सीजन कुठून मिळते व ते पाण्याविना किती दिवस मिळू शकते?

तहान लागल्यावर, जेवणासाठी व दररोजच्या उपयोगासाठी गरजेचे असलेले पाणी आपल्याला जे मिळते, त्याचा मुळ स्त्रोत हा महासागर आहे.

तसेच महासागर हा अनेक संपत्तीचा खजिना आहे.

★सांगण्यासारखे अजून बरेचकाही आहे...

सृष्टीतील प्रत्येक घटक एकमेकांवर अवलंबून आहे.

थोडक्यात, महासागर नसेल तर माणूसच नाही तर संपूर्ण जीवसृष्टी नाहीशी होईल.

महासागर किती उपयोगी आहे हे वरील सर्व गोष्टींवरून लक्षात येते.
उत्तर लिहिले · 10/10/2021
कर्म · 5250
0
होय
उत्तर लिहिले · 9/10/2021
कर्म · 5
0

महासागर आपल्याला अनेक प्रकारे उपयोगी आहेत. त्यापैकी काही उपयोग खालीलप्रमाणे आहेत:

  • हवामानाचे नियंत्रण: महासागर पृथ्वीच्या हवामानाचे नियंत्रण ठेवतात. ते सूर्यापासून येणारी उष्णता शोषून घेतात आणि हळू हळू बाहेर टाकतात, ज्यामुळे पृथ्वीचे तापमान संतुलित राहते.
  • ऑक्सिजन: महासागर आपल्याला आवश्यक असलेला ऑक्सिजन तयार करतात. समुद्रातील वनस्पती आणि प्लँक्टन प्रकाशसंश्लेषण (photosynthesis) क्रियेद्वारे ऑक्सिजन तयार करतात.
  • अन्न पुरवठा: महासागर आपल्याला अन्न पुरवतात. मासे, खेकडे, झिंगे आणि इतर अनेक प्रकारचे समुद्री जीव अन्नासाठी वापरले जातात.
  • खनिज तेल आणि नैसर्गिक वायू: महासागरांमध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे आहेत, जे ऊर्जा निर्मितीसाठी महत्त्वाचे आहेत.
  • वाहतूक: महासागर हे जलवाहतुकीसाठी महत्त्वाचे मार्ग आहेत. जहाजे आणि बोटींच्या साहाय्याने माल आणि प्रवासी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवले जातात.
  • पर्यटन: महासागर पर्यटनासाठी एक उत्तम ठिकाण आहे. अनेक लोक समुद्रकिनारी फिरायला जातात, जल क्रीडा करतात आणि समुद्राचा आनंद घेतात.

थोडक्यात, महासागर आपल्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1440

Related Questions

वंशाच्या उत्पत्ती कारणांनुसार माशांचे वर्गीकरण स्पष्ट करा?
प्रदूषणाची कारणे स्पष्ट करा?
जलसंवर्धन ही संकल्पना स्पष्ट करा?
प्रदूषण नियंत्रणाचे उपाय कोणते?
प्रदूषण नियंत्रणाचे प्रकार कोणते?
चिपको आदोलनाबाबत माहीती द्या?
जैविक विविधतेबाबत विकसित आणि विकसनशील देशांची भूमिका स्पष्ट करा?