फरक स्थानिक स्वराज्य संस्था अर्थशास्त्र

नगरपरिषद आणि नगरपंचायत यातील फरक काय?

2 उत्तरे
2 answers

नगरपरिषद आणि नगरपंचायत यातील फरक काय?

1
नगरपरिषद 

10,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागात नगर परिषदेची स्थापना केली जाते.

 नगरपरिषदेचे अ,ब,क असे तीन वर्ग करण्यात आले आहेत. 

10,000 ते 30,000 लोकसंख्येसाठी ‘क’ वर्ग नगरपरिषद.
30,000 ते 75,000 लोकसंख्येसाठी ‘ब’ वर्ग नगरपरिषद .
तर 75,000 पेक्षा जास्त लोकसंख्येसाठी ‘अ’ वर्ग नगरपरिषद असते.

 नगर परिषदेवर प्रौढ मतदान पद्धतीने उमेदवार निवडून दिले जातात. 
नगर परिषेदेवरील सदस्यास ‘नगरसेवक’ म्हणतात. नगरसेवेकातून एकाची नगराध्यक्ष व एकाची उपनगराध्यक्ष म्हणून निवड केली जाते.
 नगरपरिषदेचा कालावधी 5 वर्षाचा असतो म्हणजेच दर पाच वर्षानी नगरपरिषदेच्या निवडणुका होतात. नगराध्यक्षाचा कालावधी 2.5 वर्षाचा असतो.

नगरपंचायत 

नगरपंचायत अशा ठिकाणी निर्माण केल्या जातात की जो भाग पूर्णपणे ग्रामीण नाही व पूर्णपणे शहरीही नाही. अशा भागासाठी नगरपंचायत स्थापन करण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो. 
नगरपालिका, नगरपंचायती अधिनियम १९६५ नुसार स्थापना केली जाते.

नगरपंचायतीचा व सदस्यांचा कार्यकाळ ५ वर्षाचा असतो.
 नगरपंचायतीच्या राजकीय प्रमुखाला ‘अध्यक्ष‘ म्हणतात.
कार्यकारी अधिकारी नगरपंचायतीचे पदसिध्द सचिव असतात.
नगरपंचायतीच्या प्रशासकीय प्रमुखास ‘कार्यकारी अधिकारी‘ म्हणतात.

नगरपंचायत स्थापनेचे निकष :
१) संबंधित गावाची लोकसंख्या १० ते २५ हजार यामध्येच असावी.
२) संबंधित गावातील बिगर कृषी व्यवसाय करण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा अधिक असावे.

३) संबंधित गाव महानगर पालिका पासून किमान २० ते २५ किलोमीटर अंतरावर असावे. नगरपंचायतीच्या मतदार संघास प्रभाग असे म्हणतात.


सदस्य संख्या : 
१) नगरपंचायतीची सदस्य संख्या ९ ते २० इतकी असते.
२) दोन तज्ज्ञ सदस्य राज्य शासनाद्वारे नियुक्त केले जातात.
३) त्या क्षेत्रातील आमदार व खासदार नगरपंचायतीचे पदसिध्द सदस्य असतात.

उत्तर लिहिले · 9/10/2021
कर्म · 25850
0

नगरपरिषद आणि नगरपंचायत हे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रकार आहेत, परंतु त्यांच्यात काही महत्त्वपूर्ण फरक आहेत:

1. लोकसंख्या:
  • नगरपरिषद: मोठ्या शहरांमध्ये असते, जिथे लोकसंख्या साधारणतः 40,000 पेक्षा जास्त असते.
  • नगरपंचायत: लहान शहरांमध्ये असते, जिथे लोकसंख्या 15,000 ते 40,000 पर्यंत असते. हे ग्रामीण भागातून शहरी भागात रूपांतरित होणारे क्षेत्र आहे.
2. अधिकार आणि कार्ये:
  • नगरपरिषद: यांच्याकडे जास्त अधिकार असतात आणि ते जास्त कार्ये करू शकतात, जसे की पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते बांधणी, आणि सार्वजनिक आरोग्य सेवा.
  • नगरपंचायत: यांच्याकडे कमी अधिकार असतात आणि त्यांची कार्ये मर्यादित असतात, जसे की मूलभूत सुविधा पुरवणे.
3. निधी:
  • नगरपरिषद: यांना सरकारकडून जास्त निधी मिळतो, तसेच ते स्वतःचे कर (tax) देखील जमा करू शकतात.
  • नगरपंचायत: यांना कमी निधी मिळतो, त्यामुळे ते सरकारी अनुदानावर अधिक अवलंबून असतात.
4. रचना:
  • नगरपरिषद: यात जास्त सदस्य असतात, जे निवडणुकीद्वारे निवडले जातात.
  • नगरपंचायत: यात कमी सदस्य असतात.

अधिक माहितीसाठी:

  1. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 2800

Related Questions

क वर्ग नगरसेवकांचे मानधन किती असते?
नगराध्यक्ष निवड कशी होते?
एका जिल्हा परिषदेत सदस्यांची संख्या किती असते?
महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीचा कार्यकाल किती वर्षांचा असतो?
ग्रामीण प्रशासन की शहरी प्रशासन?
नगरपालिका व नगरपंचायत मध्ये काय फरक आहे?
सरपंच पद गेल्यावर किती दिवस ते पद रिक्त राहते?