2 उत्तरे
2
answers
थर्मामीटर वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
2
Answer link

चांगली स्वच्छताः अनेकांच्या घरात डिजिटल थर्मामीटर आहे. कुटुंबातील एखादी व्य्रती आजारी पडली आणि त्यास किरकोळ ताप असेल तर थर्मामीटरच्या मदतीने त्याचा ताप जाणून घेता येतो. थर्मामीटरचा वापर केल्यानंतर तेसॅनेटाइझ करून सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. कारण थर्मामीटरच्या टोकावर पाणी सोडणे पुरेसे नाही. त्यास चांगल्यारितीने सॅनिटाइझ करणे आवश्यक आहे. निगा न राखल्यास चांगला व्य्रतीदेखील आजारी पडू शकतो.
थर्मामीटरचे टोक थंड पाण्याने धुवाः डिजिटल थर्मामीटरच्या टोकाला थंड पाण्याने धुणे चांगले आहे. वापरानंतर थर्मामीटर थंड पाण्यात एक-दोन मिनिटे ठेवावे. त्याने त्यावरील विषाणू निघून जातील. थर्मामीटर स्वच्छ करताना डिजिटल भागात जसे की डिस्प्लेत पाणी जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. डिजिटल थर्मामीटरच्या डिस्प्लेत पाणी गेल्यास खराब होऊ शकतो.
अल्कोहोल वाइप्सने स्वच्छ कराः अल्कोहोल आधारित वाइप्स किंवा रबिंग अल्कोहोलने थर्मामीटरला स्वच्छ करावे. अल्कोहोल वाइप्सने थर्मामीटरची सर्व बाजू स्वच्छ करा. तोंडात टाकण्यात येणारे थर्मामीटरचे टोकही चांगल्या रितीने स्वच्छ करा.
पाण्याने धुवाः संपूर्ण डिजिटल थर्मामीटर पाण्यात कधीही बुडवू नये. कारण त्यामुळे नुकसान होण्याची शक्यताच अधिक असते. हवेत वाळण्यासाठी सेट करा. कारण पुसण्यासाठी टॉवेलचा वापर केल्यास थर्मामीटरच्या अनेक भागांवरविषाणू राहण्याचा धोका वाढतो.
वापरानंतर पुन्हा प्रक्रिया कराः डिजिटल थर्मामीटरला चांगल्यारितीने सॅनिटाइझ करून विषाणूमु्रत करू शकतो. अस्वच्छ थर्मामीटर हे तापेबरोबरच अन्य आजारांनाही निमंत्रण देते. त्यात पोटदुखी, तोंड येणे आदी.
0
Answer link
thermometers वापरताना लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी खालीलप्रमाणे आहेत:
थर्मामीटर वापरताना घ्यावयाची काळजी:
- योग्य थर्मामीटरचा वापर: शरीराचे तापमान मोजण्यासाठी योग्य थर्मामीटरचा वापर करणे आवश्यक आहे.
- स्वच्छता: थर्मामीटर वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतर तो स्वच्छ करणे आवश्यक आहे.
- योग्य तापमान: थर्मामीटरने योग्य तापमान दाखवणे आवश्यक आहे.
- काळजीपूर्वक हाताळा: थर्मामीटर नाजूक असल्याने तो काळजीपूर्वक हाताळणे आवश्यक आहे.
- निर्देशांचे पालन: थर्मामीटर वापरताना निर्मात्याने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे.
थर्मामीटर वापरताना खालील गोष्टी टाळाव्यात:
- थर्मामीटर उकळत्या पाण्यात किंवा थेट आगीत ठेवू नये.
- थर्मामीटर वापरण्यापूर्वी तो खूप थंड किंवा खूप गरम होऊ नये.
- तुटलेला थर्मामीटर वापरू नये.
- मुलांना थर्मामीटर वापरू देऊ नये.
थर्मामीटर वापरताना योग्य काळजी घेतल्यास अचूक तापमान मोजता येते आणि संभाव्य धोके टाळता येतात.