2 उत्तरे
        
            
                2
            
            answers
            
        थर्मामीटर कसे वापरतात?
            1
        
        
            Answer link
        
        बऱ्याचशा आजारांमध्ये ताप येणे हे एक महत्त्वाचे लक्षण असते. ताप येण्याची अनेक कारणे आहेत. सर्दी- पडशापासून ते क्षयरोगासारख्या जुनाट रोगांपर्यंत अनेक रोगांमध्ये ताप येतो. आपल्या शरीराचे तापमा सामान्यतः ९८.७ डिग्री फॅरनहाइट किंवा ३७ डिग्री सेल्सीअस इतके असते. बाळंतरोग, सर्दी-पडसे, फ्लू, यकृतदाह, जंतूदोष, मेंदूसूज, सांधे, काळीज ताप, विषमज्वर, टॉन्सीलसूज, न्यूमोनिया, श्वासनलिका दाह, हिवताप, हत्तीरोग, क्षयरोग अशा विविध रोगांत ताप येतो. तापाच्या विशिष्ट प्रकारामुळे व सोबतच्या इतर लक्षणांमुळे रोगाचे निदान व्हायला मदत होते.
प्रत्येक घरामध्ये ताप मोजण्यासाठी थर्मामीटर किंवा तापमापक नळी असणे आवश्यक आहे. या नळीच्या एका बाजूच्या गोलसर फुग्यासारख्या भागात पारा असतो. थर्मामीटरचा हा भाग जिभेखाली, काखेत किंवा गुदाशयात एक मिनीटभर ठेवल्यास तापमानानुसार फुग्यातील पारा प्रसरण पावून काचेच्या नळीत वरवर जाऊ लागतो. या नळीवर फॅरनहाईटमध्ये आकडे लिहिलेले असतात; त्यावरून ताप किती आहे ते कळते. थर्मामीटर तोंडात एक मिनीट ठेवले असता निरोगी व्यक्तीचे तापमान ९७ ते ९८ अंश फॅरनहाईट इतके भरते. काखेत ते यापेक्षा एक अंश कमी तर गुदाशयात धरले असता एक अंश जास्त असते. थर्मामीटरचा वापर करण्यापूर्वी नळी झटकून पारा नळीच्या टोकाच्या फुगवट्यात नेणे आवश्यक असते. ताप पाहून झाल्यावर पुन्हा नळी झटकावी व पारा जागेवर आणावा. थर्मामीटर डेटॉलमध्ये बुडवून स्वच्छ करावा. थर्मामीटरचा वापर केल्याने आपण डॉक्टरांना तापाविषयी खूप जास्त', 'जास्त', 'कमी' असे व्यक्तीसापेक्ष बदलणारे शब्द न वापरता अमुक अंश फॅरनहाईट असे तंतोतंत तापमान सांगू शकतो व त्यामुळे डॉक्टरांना रोगनिदान करायला मदत होते. थर्मामीटरऐवजी तापमापक पट्टीचा वापर करता येतो. ही पट्टी कपाळावर लावून १५ सेकंद ठेवली असत तिचा रंग बदलून तापमान समजते.
            0
        
        
            Answer link
        
        थर्मामीटर वापरण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे:
   1. तयारी:
   
  
  - थर्मामीटर स्वच्छ असल्याची खात्री करा.
 - जर तुम्ही तोंडी थर्मामीटर वापरत असाल, तर ते वापरण्यापूर्वी अल्कोहोलने स्वच्छ करा.
 
   2. तापमान मोजण्याची जागा:
   
  
  - तोंडी (Oral): जीभेखाली थर्मामीटर ठेवा आणि तोंड बंद करा.
 - बगल (Axillary): थर्मामीटर बगलमध्ये ठेवा आणि हात खाली ठेवा.
 - गुदद्वारासंबंधी (Rectal): हे लहान मुलांसाठी किंवा जेव्हा तोंडी तापमान घेणे शक्य नसेल तेव्हा वापरले जाते.
 - कपाळ (Temporal Artery): कपाळावर थर्मामीटर फिरवून तापमान मोजा.
 
   3. तापमान मोजणे:
   
  
  - थर्मामीटरला योग्य वेळेसाठी जागेवर ठेवा. डिजिटल थर्मामीटर वापरत असल्यास, बीप वाजेपर्यंत थांबा.
 - analog थर्मामीटर वापरत असल्यास, थर्मामीटरवर तापमान स्थिर होईपर्यंत थांबा.
 
   4. वाचन आणि नोंद:
   
  
  - थर्मामीटरवरील तापमान वाचा आणि नोंद करा.
 
   5. स्वच्छता:
   
  
  - थर्मामीटर वापरल्यानंतर ते स्वच्छ करा.
 - डिजिटल थर्मामीटर असल्यास, ते बंद करा.
 
टीप: प्रत्येक थर्मामीटरच्या मॉडेलनुसार वापरण्याची पद्धत वेगळी असू शकते, त्यामुळे वापरण्यापूर्वी सूचना पुस्तिका तपासा.