3 उत्तरे
3 answers

न्यायव्यवस्था म्हणजे काय?

1

कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ यानंतर शासन व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग म्हणजे न्यायव्यवस्था होय. न्यायव्यवस्था कायद्याचा अर्थ स्पष्ट करते. समाजामध्ये नियमाचे कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा देऊन न्याय देण्यासाठी योग्य कार्य पद्धती असणे गरजेचे आहे.
 
भारतीय न्यायव्यवस्था




भारतीय न्यायव्यवस्था ही एकेरी न्यायव्यवस्था आहे. ब्रिटिश कालखंडात ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या रचनेप्रमाणे भारताने न्यायव्यवस्था स्वीकारली आहे. 1935 च्या भारतीय संघराज्यांच्या कायद्याने 26 जानेवारी 1950 रोजी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली. भारतीय न्यायव्यवस्थेची रचना पुढील प्रमाणे आहे. शिरोभागी सर्वोच्च न्यायालय त्यानंतर विभागीय पातळीवर खंडपीठे त्यानंतर जिल्हा पातळीवर जिल्हा न्यायालय तर तालुका पातळीवर तालुका न्यायालय.

सर्वोच्च न्यायालय : घटना कलम क्र. 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची निर्मिती करण्यात आली आहे.

रचना :

1. न्यायाधीशांची संख्या :

सर्वोच्च न्यायालयामध्ये एक मुख्य न्यायाधिश आणि नव्याने तरतूद केल्याप्रमाणे इतर 30 न्यायाधिश असतात. न्यायाधिशांची संख्या कमी जास्त करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे.

2. न्यायाधिशांची नेमणूक :

सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधिशांची नेमणून राष्ट्रपती स्वतःच्या सहीने करतो. इतर न्यायाधिशांची नेमणूक करताना राष्ट्रपती सरन्यायाधिशांचा सल्ला घेतो.

न्यायाधीशांची पात्रता :

तो भारताचा नागरिक असावा.
त्याने कमीत कमी पाच वर्ष उच्च न्यायालयात न्यायाधिश म्हणून काम केलेले असावे.
कमीत कमीत दहा वर्षापर्यंत एक किंवा जास्त न्यायालयात वकिली केलेली असावी.
राष्ट्रपतीच्या मते तो कायदेपंडित असावा.
कार्यकाल :

वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत तो पदावर राहतो किंवा तत्पूर्वी तो आपल्या स्वाइच्छेने राष्ट्रपतीकडे राजीनामा देतो.

शपथविधी :

घटना कलम क्र. 124/6 नुसार तिसर्‍या परिशिष्टात दिलेल्या नमुन्यानुसार भारताचा राष्ट्रपती शपथ देतो.

पदमुक्ती :

कोणत्याही न्यायाधीशास गैरवर्तन व अकार्यक्षमता या कारणावरून बडतर्फ करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे परंतु असे करण्यापूर्वी संसदेच्या प्रत्येक सभागृहाणे 2/3 बहुमताने तसा ठराव पास करणे आवश्यक आहे.

निवृत्तींनंतर व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे :

सर्वोच्च न्यायालयातील कोणत्याही न्यायाधीशाला सेवानिवृत्तींनंतर भारतातील कोणत्याही न्यायालयात वकिली करता येणार नाही कारण श्रेष्ठ न्यायाधिश जर वकिली करू लागले तर संबंधित न्यायाधीशांवर दबाव येऊ शकतो.

सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी क्षेत्र :

कायदातज्ज्ञांच्या मतानुसार भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला जगातील कोणत्याही सर्वोच्च न्यायालयापेक्षा व्यापक अधिकार प्राप्त झाले आहे ते पुढीलप्रमाणे आहेत.

1. प्रारंभीक अधिकार क्षेत्र :

ज्या खटल्यांची सुरवात फक्त सर्वोच्च न्यायालयातच होते त्याला प्रारंभीक अधिकार क्षेत्र असे म्हणतात. पुढीलपैकी खटले फक्त सर्वोच्च न्यायालयातच चालतात. 1. भारत सरकार आणि घटकराज्य सरकार त्यांच्यातील वाद
2. घटकराज्यातील वाद
3. केंद्रसरकार आणि राज्यसरकारचा कायदेविषयक प्रश्न
4. मूलभूत अधिकारांचे संरक्षण इत्यदी.

2. पुनर्निर्णयाचे अधिकार क्षेत्र :

भारतीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर पुनर्निर्णय देण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला आहे.

3. परमार्षदायी अधिकार :

घटना कलम क्र. 43 नुसार भारताच्या राष्ट्रपतीला कायदेविषयक सल्ला सर्वोच्च न्यायालयाकडून घेण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.

4. अभिलेख न्यायालय :

129 व्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे. त्याला त्या न्यायालयाच्या बेअब्रुकरीत शिक्षा करण्याचे अधिकार मिळाले आहेत.

5. मूलभूत अधिकारांचे संरक्षण :

देशातील नागरिकाला मिळालेल्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेला आहे.


उत्तर लिहिले · 5/10/2021
कर्म · 121765
0
भारतीय संघराज्यात एकात्म व एकेरी स्वरूपाची न्याय व्यवस्था स्वीकारली गेली आहे. १९३५च्या कायद्यान्वये स्थापन केलेल्या फेडरल कोर्ट ऑफ इंडिया याचे नवीन रूप म्हणजे सर्वोच्च न्यायालय होय.

भारतीय न्यायव्यवस्था ही एकेरी न्यायव्यवस्था आहे. ब्रिटिश कालखंडात ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या रचनेप्रमाणे भारताने न्यायव्यवस्था स्वीकारली आहे.

 1935 च्या भारतीय संघराज्यांच्या कायद्याने 26 जानेवारी 1950 रोजी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली. भारतीय न्यायव्यवस्थेची रचना पुढील प्रमाणे आहे. 

शिरोभागी सर्वोच्च न्यायालय त्यानंतर विभागीय पातळीवर खंडपीठे त्यानंतर जिल्हा पातळीवर जिल्हा न्यायालय तर तालुका पातळीवर तालुका न्यायालय.
उत्तर लिहिले · 5/10/2021
कर्म · 25850
0

न्यायव्यवस्था:

न्यायव्यवस्था म्हणजे कायद्याचे पालन करणे आणि विवाद किंवा गुन्ह्यांचे निराकरण करण्यासाठी तयार केलेली एक प्रणाली.

न्यायव्यवस्थेची कार्ये:

  • कायद्याचे पालन करणे.
  • विवादांचे निराकरण करणे.
  • गुन्हेगारांना शिक्षा देणे.
  • व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण करणे.

न्यायव्यवस्थेचे प्रकार:

  • दिवाणी न्यायालय (Civil Court): व्यक्तींमधील विवाद सोडवते.
  • फौजदारी न्यायालय (Criminal Court): गुन्ह्यांची सुनावणी करते.
  • उच्च न्यायालय (High Court): राज्यातील सर्वात मोठे न्यायालय.
  • सर्वोच्च न्यायालय (Supreme Court): देशातील सर्वात मोठे न्यायालय.

भारतातील न्यायव्यवस्था:

भारतामध्ये स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे. न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च न्यायालय दिल्लीमध्ये आहे.
अधिक माहितीसाठी, येथे पहा: भारताचे सर्वोच्च न्यायालय

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 2220

Related Questions

नॉन ज्युडिशियल म्हणजे काय आणि ते कोणासाठी लागू आहे? आदिवासी न करता नियम
न्यायालयाचे समन्स म्हणजे काय?
कोर्ट डिग्री म्हणजे काय?
न्यायालयात अहवालावर स्वाक्षरी नसल्यास सुनावणीच्या वेळी न्यायाधीश हरकत घेऊन ताकीद देतात काय?
न्यायालयीन बातमीचा प्रत्येक तहसीलला अर्थ लागतो काय?
कोर्टात स्टे बसवणे म्हणजे काय?
एकदा कोर्टात गेलेली केस मागे घेता येते का?