लैंगिक आरोग्य शीघ्रपतन

मी सेक्स करत असताना माझं वीर्य लवकर गळत आहे. ते लवकर गळू नये यासाठी काय करावे?

फार पूर्वीपासून लैंगिक इच्छा व शक्ती वाढवणारी औषधे निरनिराळया शास्त्रात सांगितली जातात. अनेक उपाय प्रचलितही आहेत. आजही अनेक पुरुष यासाठी लाखो रुपये खर्च करतात असे आढळते. यातली काही सोडता बरीच औषधे व्यर्थ जातात.'वियाग्रा' नावाचे एक औषध आहे, याचे दुष्परिणामही दिसून आले आहेत. एकूणच अशा उपायांपेक्षा योग्य मनोभूमिका, आहार-विहार-व्यायाम यातून योग्य लैंगिक समाधान मिळू शकते. यातूनही उपयोग न झाल्यास योग्य तज्ज्ञांकडे जावे.

🔖मास्टर पध्दत वापरा

(अ) स्त्रीने शिश्नाचे हस्तमैथुन करावे, मात्र वीर्यपतनापर्यंत वेळ येऊ न देता थांबावे.
(ब) ताबडतोब तीन बोटांनी शिश्नाचे पुढचे बोंड दाबून धरावे- यामुळे इंद्रिय सैल व लहान होते.
(क) वरील अ व ब क्रिया परत परत कराव्यात, मात्र प्रत्यक्ष मैथुन टाळावे. शेवटी वीर्यपतन होऊ द्यावे. यामुळे वीर्यपतनाचा काळ वाढू शकतो असा विश्वास निर्माण होतो.
(ड) काही दिवस असेच करून पुरेसा आत्मविश्वास आल्यावर 'पुरुष खाली स्त्री वरती' अशा स्थितीत मैथुन करावे. यातही मधून मधून सैलावून थांबावे व वाटल्यास शिश्नाचे टोक दाबून नंतर सोडावे व मैथुनक्रिया परत करावी.
(इ) याप्रमाणे 'वरती स्त्री'स्थितीत काही दिवस मैथुन करावे.
(फ) यानंतर दोघांनी कुशीवर राहून मैथुन करावे व काही दिवस या पध्दतीने सवय करावी.
(ग) नंतर स्त्री खाली, पुरुष वरती अशा अवस्थेत मैथुन करावे. याप्रमाणे शीघ्रपतनाची भीती नष्ट करता येते.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

मी सेक्स करत असताना माझं वीर्य लवकर गळत आहे. ते लवकर गळू नये यासाठी काय करावे?

Related Questions

कंडोम वापरूनही वीर्य लवकर बाहेर पडते? काय करावे?
जास्त हस्तमैथुनामुळे माझ्या penis ची नस कमजोर झाली आहे आणि शीघ्रपतन पण होते कृपया घरगुती उपाय सांगा?
मी सध्या 25 वर्षांचा आहे आणि 9वीत असल्यापासून मी हस्तमैथुन करतो, तर माझी समस्या आज अशी आहे की लिंग खूपच वक्र आणि गुळगुळीत झाले आहे आणि मला शीघ्रपतनाची समस्या आहे, कृपया उपाय सांगा?
सेक्स करते वेळी वीर्य लगेच बाहेर येते असे का होते आणि उपाय काय करू?