3 उत्तरे
3 answers

जलचक्र म्हणजे काय?

4
पृथ्वीवर दिसून येणाऱ्या पाण्याच्या चक्राला जलचक्र असे संबोधले जाते. यामध्ये सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होणे, वाफेचे ढग बनणे व पावसाद्वारे हे पाणी पुन्हा पृथ्वीवर पडून नद्यांद्वारे समुद्राला मिळणे, या क्रिया घडतात.
उत्तर लिहिले · 30/9/2021
कर्म · 3740
2

पृथ्वीवर दिसून येणाऱ्या पाण्याच्या चक्राला जलचक्र असे संबोधले जाते. यामध्ये सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होणे, वाफेचे ढग बनणे व पावसाद्वारे हे पाणी पुन्हा पृथ्वीवर पडून नद्यांद्वारे समुद्राला मिळणे, या क्रिया घडतात.

जलचक्राचे घटक 
1. महासागरातील जलसाठा पृथ्वीवरील एकुण पृष्ठभागाच्या सुमारे 71 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. हे पाण्याचे वस्तुमान बर्फाळ प्रदेश, गोड पाणी, महासागरातील खारे पाणी आणि वातावरणीय बाष्प या विविध स्वरूपात आढळते. हा पाणीसाठा सतत एकाच स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतरित होत असतो. म्हणजेच नद्यांमधून महासागरामध्ये आणि महासागरातून बाष्पीभवनाच्या प्रक्रियेने पुन्हा वातावरणामध्ये जात असतो. ही प्रक्रिया होत असताना पाणी हे द्रव आणि वायू या विविध अवस्थांतुन पुढे जात असते.

2. बाष्पीभवन


3. ऊर्ध्वपातन

4. बाष्पोत्सर्जन

5. बाष्प

6. घनीभवन

7. वृष्टी

8. हिम व बर्फ

9. बर्फाचे वितळणे

10. भूपृष्ठावरील जलप्रवाह

11. प्रवाह (नदी किंवा ओढा)

12. ताज्या पाण्याचा साठा

13. झिरपणे

14. भूजलसाठा

15. भूजल उपसा

16. झरे




उत्तर लिहिले · 10/10/2021
कर्म · 121765
0
जलचक्र: पृथ्वीवरील पाण्याचे सतत फिरणारे चक्र म्हणजे जलचक्र.

स्पष्टीकरण:

  • बाष्पीभवन (Evaporation): सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे समुद्रातील, नद्यांमधील आणि तलावांमधील पाण्याची वाफ होते.
  • संघनन (Condensation): वाफ थंड झाल्यावर तिचे लहान थेंब बनतात आणि ढग तयार होतात.
  • वृष्टी (Precipitation): ढगांमधील पाण्याचे थेंब मोठे झाल्यावर ते पाऊस, बर्फ किंवा गारांच्या रूपात खाली पडतात.
  • समुद्राकडे परत (Return to the Sea): पडलेले पाणी नद्या आणि नाल्यांद्वारे समुद्राला परत मिळते.

अशा प्रकारे जलचक्र सतत चालू असते.

अधिक माहितीसाठी: जलचक्र - विकासपीडिया

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1040

Related Questions

निसर्गामध्ये पाण्याच्या निगडित चक्राला काय म्हणतात, जलचक्र?
सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. दिलेल्या पर्यायांपैकी चुकीचे विधान कोणते?
सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते का?
जलचक्र टिपा लिहा?
पावसाचे पाणी गोड का असते?
धबधबा कुठे उगम पावतो?