भूगोल जिल्हा धरण महाराष्ट्र भूगोल

मांजरा धरण कोणत्या राज्य व जिल्हा मध्ये आहे?

2 उत्तरे
2 answers

मांजरा धरण कोणत्या राज्य व जिल्हा मध्ये आहे?

4
मांजरा धरण हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील धणेगाव येथे आहे. 

मांजरा धरणातील सरासरी वार्षिक पाऊस ७०० मी.मी. एवढे आहे. 

                   मांजरा धरण 

मांजरा धरण हे मांजरा या नदीवर आहे. 

मांजरा ही  नदी महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा या तीन राज्यांतून वाहते.  हिला वांजरा या नावानेही  ओळखतात. 

ही नदी महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यात, बालाघाट डोंगररांगेत उगम पावते. 

 ही गोदावरी नदीची  प्रमुख उपनदी आहे. या नदीची लांबी सुमारे ७२५ किमी एवढी आहे. 

 ही नदी सुरुवातीला पूर्ववाहिनी असून बीड-उस्मानाबाद तसेच बीड-लातूर या जिल्ह्यांची सरहद्द बनली आहे.

उत्तर लिहिले · 27/9/2021
कर्म · 25850
0

मांजरा धरण हे महाराष्ट्र राज्यात आहे.

हे धरण बीड जिल्ह्यात असून मांजरा नदीवर बांधलेले आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1680

Related Questions

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे?
महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती?
महाराष्ट्रातील पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे?
आपल्या महाराष्ट्रात तालुके किती आहेत आणि महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय कुठे आहे?
महाराष्ट्रातील कोणत्या विभागात जंगले सर्वात कमी आहेत?
महाराष्ट्र राज्याची लांबी किती आहे?
महाराष्ट्राचे क्षेत्रफळ कीती?