Topic icon

महाराष्ट्र भूगोल

0
महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 307,713 चौरस किलोमीटर आहे. हे भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 9.36% आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे भारतातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/9/2025
कर्म · 3060
0

महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक समुद्रकिनारा रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला सुमारे 237 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे.

यानंतर रायगड जिल्ह्याला 120 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 3060
2
भारताच्या पश्चिमेस महाराष्ट्र हे राज्य आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ ३,०७,७१३ ± १ km² आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात तिसरा (३) क्रमांक लागतो.
उत्तर लिहिले · 17/12/2021
कर्म · 1320
4
मांजरा धरण हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील धणेगाव येथे आहे. 

मांजरा धरणातील सरासरी वार्षिक पाऊस ७०० मी.मी. एवढे आहे. 

                   मांजरा धरण 

मांजरा धरण हे मांजरा या नदीवर आहे. 

मांजरा ही  नदी महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा या तीन राज्यांतून वाहते.  हिला वांजरा या नावानेही  ओळखतात. 

ही नदी महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यात, बालाघाट डोंगररांगेत उगम पावते. 

 ही गोदावरी नदीची  प्रमुख उपनदी आहे. या नदीची लांबी सुमारे ७२५ किमी एवढी आहे. 

 ही नदी सुरुवातीला पूर्ववाहिनी असून बीड-उस्मानाबाद तसेच बीड-लातूर या जिल्ह्यांची सरहद्द बनली आहे.

उत्तर लिहिले · 27/9/2021
कर्म · 25850
0
महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा गडचिरोली हा आहे.
उत्तर लिहिले · 15/9/2021
कर्म · 25850