4 उत्तरे
4
answers
समाजशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात?
1
Answer link
आधुनिक समाज शास्त्राचे जनक
आधुनिक समाज शास्त्रात ऑगस्ट कॉम्ट (August Comte) हा समाजशास्त्राचा जनक मानला जातो.आधुनिक समाज शास्त्राचे जनक
आधुनिक समाज शास्त्रात ऑगस्ट कॉम्ट (August Comte) हा समाजशास्त्राचा जनक मानला जातो. इ.स. १८३९मध्ये त्याने सामाजिक भाषणात आणि नंतर Positive philosophy या ग्रंथात "समाजशास्त्र" या शब्दाचा पहिल्यांदा पाश्चात्य जगात वापर केला होता. भारतात आणि चीन देशात हा वापर आधीपासूनच होता.
१. लेस्टर वार्डः
‘समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे’ प्रस्तुत व्याख्येत वार्ड ने समाजशास्त्राचा अभ्यास म्हणून ‘समाजाचा उल्लेख’ केलेला आहे. परंतु समाजातील कोणत्या अंगाचे आणि कोणत्या रितीने अध्ययन केले पाहिजे यासंबंधी संकेत दिलेला नाही.
२. फ्रॅन्कलीन गिडिंगजः
समाजशास्त्रात संपूर्ण समाजाचे व्यवस्थितरित्या वर्णन आणि स्पष्टीकरण करण्यात येते.
वरील परिभाषेत संपूर्ण समाजाचे व्यवस्थितरित्या अध्ययन करण्यात येते असे सुचविले आहे.
३. आगबर्न व निमकाॅकः
”समाजजीवनाचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करणाऱ्या शास्त्रास समाजशास्त्र असे म्हणतात.“
येथे समाजाचे शास्त्रीयरितीने अध्ययन केले पाहिजे. हे नमूद करताना अभ्यासासाठी वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करण्याची गरज प्रधान मानली आहे.
४. मॅक आयव्हर व पेजः
समाजशास्त्राचा अभ्यास विषय सामाजिक संबंध आहे.
५. मार्षल जोन्सः
समाजशास्त्रात मानवाचा अनेक मानवांशी असलेला संबंध अभ्यासण्यात येतो.
६. हॅरी जाॅन्सनः
समाजशास्त्रात सामाजिक समूहांचा अभ्यास करण्यात येतो.
७. मॅक्स वेबरः
समाजशास्त्र हे असे विज्ञान आहे की, ज्यात सामाजिक क्रियांच्या निर्वाचनात्मक आकलनाचा प्रयत्न करण्यात येतो.
८. अल्केष इकेल्सः
समाजशास्त्रात सामाजिक क्रिया व्यवस्थेचा आणि त्यातील पारंपारिक संबंधाचा अभ्यास केला जातो.
समाजशास्त्राचे घटक संपादन करा
वर सांगितलेल्या व्याख्येवरून समाजशास्त्राचा अध्ययनविषयाबाबत खालील घटक स्पष्ट करण्यात येतात.
अ. मानवी समाजाचे अध्ययन. ब्. सामाजिक संबंधाचे अध्ययन. क्. सामाजिक समुहाचे अध्ययन. ड्. सामाजिक क्रियांचे अध्ययन.
१. मानवी समाजाचे अध्ययनः
समाजशास्त्रा संपूर्ण मानवी समाजाचे अध्ययन केले पाहिजे. समाजशास्त्रात समाजाच्या कोणत्याही एका अंगाचे अध्ययन केले म्हणजे समाजाचे संपूर्ण आकलन होऊ शकत नाही. संस्था किंवा समूह हे घटक स्वतंत्र नसतात ते परस्पर संबंधित व परस्पर अवलंबित असतात. त्यामुळे कोणताही अभ्यास करताना सर्व घटकांचा संदर्भ विचारात घ्यावा लागतो. म्हणून समाजशास्त्राचा अभास विषय संपूर्ण मानवी समाज असला पाहिजे.
२. सामाजिक संबंधाचा अभ्यासः
काही अभ्यासकांच्या मते समाजशास्त्राचा अभ्यासविषय सामाजिक संबंध असला पाहिजे कारण त्यांच्या मते मानवी समाज व्यक्ती, व्यक्ती मिळून बनलेला असतो. सर्व व्यक्ती एकमेकांषी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या, संबंधित असतात. समाज म्हणजे सामाजिक संबंधाचे जाळे होय. त्यामुळे समाजशास्त्रात संबंधांचा अभ्यास झाला पाहिजे.
३. सामाजिक समुहांचे अध्ययनः
जाॅन्सन यांच्या व्याख्येनुसार समाजशास्त्र अभ्यासविषय सामाजिक समुहांचे अध्ययन असावे. त्यांच्यामते समाज हा एक विशाल समूह आहे. या समूहात अनेक उपसमूह असतात. हे समूह परस्परांषी संबंधित असतात. समाजातील सभासद आपल्या सर्व जीवनावष्यक गरजा एकटयाने भागवू शकत नाहीत. त्यांना एकमेकांचे सहकार्य घ्यावे लागते. यासाठी ते एकत्र येतात. आणि समुहाची निर्मिती होते. म्हणून समाजशास्त्रात सामाजिक समुहांचा अभ्यास झाला पाहिजे.
४. सामाजिक क्रियांचे अध्ययनः
मॅक्स वेबर व इतर समाज शास्त्रज्ञानानुसार समाजशास्त्राचा अभ्यासविष सामाजिक क्रिया असला पाहिजे. सामाजिक जीवनात सामाजिक क्रिया मध्यवर्ती असतात. ज्याप्रमाणे मूलद्रव्यात ‘परमाणू’ जसा लहानात लहान असून देखील अर्थपूर्ण असतो. त्याप्रमाणे सामाजिक क्रिया महत्वाच्या असतात.
वरील बाबींवर समाजशास्त्रात अभ्यास करण्यात यावा असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
समाजशास्त्राचे विभाजन संपादन करा
अल्केस इंकेलस यांनी समाजशास्त्राच्या अभ्यासाविषयीचे ठळक भागात विभाजन केले आहे.
1. समाजशास्त्रीय विष्लेषणः
मानव संस्कृती आणि समाज सामाजिक दृष्टीकोन वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन.
2. समाजातील प्राथमिक घटकः
सामाजिक क्रिया आणि सामाजिक संबंध, व्यक्तीचे व्यक्तीमत्व, समुह, समुदाय, मंडळे, आणि संघटन इ. अध्ययन.
3. मूलभूत सामाजिक संकल्पनाः
कुटूंब, आर्थिक, राजकीय, धार्मिक शैक्षणिक, न्याय इ. विषयीचे अध्ययन.
समाजशास्त्राची व्याप्ती व संप्रदाय
तत्वांचे अध्ययन
शास्त्रांचे प्रमूख दोन प्रकार
उपशाखा
लिंगभावाचे समाजशास्त्र
सामूहिक वर्तनशास्त्र
लोकसंख्याशास्त्र : लोकसंख्या वाढीचे परिणाम
मानवी परिसंस्थाशास्त्र
वैद्यकीय समाजशास्त्र
औद्योगिक समाजशास्त्र
लष्करी समाजशास्त्र
धार्मिक समाजशास्त्र
शहरी समाजशास्त्र
ग्रामीण समाजशास्त्र
शेतकरी समाजशास्त्र
सामाजिक मानसशास्त्र
सैद्धान्तिक समाजशास्त्र
न्याय समाजशास्त्र
आंतरजालीय समाजशास्त्र
माध्यमाचे समाजशास्त्र
0
Answer link
ऑगस्ट कॉम्टे यांना समाजशास्त्राचे जनक मानले जाते.
ऑगस्ट कॉम्टे हे एक फ्रेंच विचारवंत आणि समाजशास्त्रज्ञ होते. त्यांनी समाजाचा वैज्ञानिक अभ्यास करण्यावर भर दिला आणि त्यातून समाजशास्त्र या नवीन विषयाची कल्पना मांडली.
अधिक माहितीसाठी, आपण खालील दुवे पाहू शकता: