Topic icon

समाजशास्त्राचा इतिहास

0
ऑगस्टे कॉम्टे (१७९८-१८५७):

समाजशास्त्राचे जनक

फ्रेंच तत्ववेत्ता ऑगस्टे कॉम्टे (१७९८-१८५७) यांनी सामान्यतः "समाजशास्त्राचे जनक" म्हणून ओळखले जाणारे "समाजशास्त्र" हा शब्द सर्वप्रथम 1838 मध्ये समाजाच्या वैज्ञानिक अभ्यासासाठी वापरला.

त्यांचा असा विश्वास होता की सर्व समाज पुढील टप्प्यांतून विकसित होतात आणि प्रगती करतात जसे की धार्मिक, आधिभौतिक आणि वैज्ञानिक.

कॉम्टे यांनी असा युक्तिवाद केला की समाजाला त्याच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तथ्ये आणि पुराव्यांवर आधारित वैज्ञानिक ज्ञानाची आवश्यकता आहे - अटकळ आणि अंधश्रद्धा नव्हे, जे सामाजिक विकासाच्या धार्मिक आणि आधिभौतिक अवस्थांचे वैशिष्ट्य आहेत. कॉमटे यांनी समाजशास्त्राच्या विज्ञानाकडे दोन शाखा आहेत असे मानले

1. गतिशीलता, किंवा प्रक्रियांचा अभ्यास ज्याद्वारे समाज बदलतात

2. स्टॅटिक्स, किंवा प्रक्रियांचा अभ्यास ज्याद्वारे समाज टिकतो

त्यांनी समाजशास्त्रज्ञांना वैज्ञानिक सामाजिक ज्ञानाचा आधार विकसित करण्याची कल्पना देखील केली जी समाजाला सकारात्मक दिशानिर्देश देईल.
उत्तर लिहिले · 20/2/2023
कर्म · 9415
0
ऑगस्ट कॉम्त -- समाजशास्त्राचे जनक
उत्तर लिहिले · 23/7/2022
कर्म · 7460
0

समाजशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात 19 व्या शतकात झाली.

ऑगस्ट कॉम्टे (Auguste Comte) या फ्रेंच विचारवंताने 1838 मध्ये 'समाजशास्त्र' (Sociology) ही संज्ञा प्रथम वापरली आणि म्हणूनच त्यांना समाजशास्त्राचा जनक मानले जाते.

त्यानंतर, इमाईल दुर्खीम (Émile Durkheim), कार्ल मार्क्स (Karl Marx), आणि मॅक्स वेबर (Max Weber) यांसारख्या समाजशास्त्रज्ञांनी ह्या विषयालाSystematically पुढे नेले.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980
0
उत्तर:

ऑगस्ट कॉम्टे यांना समाजशास्त्राचे जनक मानले जाते.

ऑगस्ट कॉम्टे हे एक फ्रेंच विचारवंत आणि समाजशास्त्रज्ञ होते. त्यांनी 1838 मध्ये 'समाजशास्त्र' ही संज्ञा प्रथम वापरली आणि या विषयाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करण्याचा दृष्टिकोन मांडला.

कॉम्टे यांच्या योगदानाला आदराने गौरवण्यासाठी त्यांना समाजशास्त्राचे जनक म्हटले जाते.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980
0

ऑगस्ट कॉम्टे (Auguste Comte) यांना समाजशास्त्राचा जनक मानले जाते.

त्यांनी समाजाचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न केला आणि 'सामाजिक भौतिकशास्त्र' (Social Physics) नावाचा एक नवीन विषय प्रस्तावित केला, ज्याला नंतर समाजशास्त्र म्हणून ओळख मिळाली.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980
2
आधुनिक समाज शास्त्राचे जनक
आधुनिक समाज शास्त्रात ऑगस्ट कॉम्ट (August Comte) हा समाजशास्त्राचा जनक मानला जातो.

समाजशास्त्र (Sociology) म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास होय. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो.[१] सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजशास्त्र उपयुक्त असते. हे शास्त्र आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे आहे. यामुळे याचा मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास व संख्याशास्त्र अशा अनेक शाखांशी संबंध येतो.[२] यामध्ये लोकांच्या जीवनाचे वास्तव चित्रणाचे रुप रेखाटले जाते. लोकांच्या सामाजिक प्रश्नांचे निवारण येथे केले जाते.

व्यवस्थाबद्द ज्ञान सम्मुचयास शास्त्र असे म्हणतात. अभ्यास विषयाच्या आधारे शास्त्राचे दोन प्रकार केले जातात. १) नैसर्गिक २) सामाजिक शास्त्र.

नैसर्गिक विज्ञानात समाजोत्तर घटनांचे अध्ययन केले जाते. यामध्ये रासायनिक प्रक्रिया, वनस्पती, उर्जा इ. विषयांचे अध्ययन करण्यात येते. या विषयांचे अध्ययन करण्यासाठी पदार्थ विज्ञान, वनस्पती शास्त्र, रसायनशास्त्र, इ. शास्त्रांचा समावेश केला जातो.

सामाजिक शास्त्रांचा अभ्यासविषय सामाजिक घटना असतात. उदा. सामाजिक संबंध, आर्थिक प्रयत्न, मानसिक वर्तन, राजकीय वर्तन इ. अभ्यास समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, गुन्हेगारी शास्त्र, इ. शास्त्रामध्ये करण्यात येतो.

थोडक्यात म्हणजे सामाजिक घटनांच्या अभ्यासाषी निगडीत असणारे शास्त्र म्हणून समाजशास्त्राला सामाजिक शास्त्र असे म्हणतात.

शास्त्राच्या अभ्यास विषयाला केंद्रस्थानी मानले असताना शास्त्राचे आदर्षनिष्ठ शास्त्र, आणि विषुद्धशास्त्र असेही दोन प्रकार करता येतात.

आदर्श प्रमाणभूत मानुन अध्ययन करणारी शास्त्रे म्हणजे तर्कशास्त्र व नितीशास्त्र ही होय. याउलट समाजातील घटनांचा तटस्थ वृत्तीने अभ्यास करणारी शास्त्रे म्हणजे विशुद्ध शास्त्रे होय. समाजशास्त्रात तटस्थ वृत्तीने समाजातील घटनांचा अभ्यास केला जात असल्याने ते एक विशुद्ध शास्त्र आहे.

समाजशास्त्र एक आधुनिक शास्त्र संपादन करा
समाजशास्त्राचा आरंभाचा काळ लक्षात घेता असे स्पष्ट होते की ते एक आधुनिक शास्त्र असे इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इ. शास्त्रांना जसा दीर्घ इतिहास आहे. तसा दीर्घ इतिहास समाजशास्त्राला नाही. समाजशास्त्राची वाटचाल 150-175 वर्षांची आहे. परंतु, या शास्त्राचा अभ्यासविषय मानवी समाजाइतकाच प्राचीन आहे.

समाजाचे अध्यन प्राचीन काळापासून पाश्चिमात्य व इतर देषात करण्यात येत होते. यासंबंधी अनेक पुरावे उपलब्ध आहेत.

1.    ग्रीक देषात प्लेटो व ॲरीस्टाॅटल यांनी रिपब्लिक व पाॅलिटिक्स हे ग्रंथ लिहीले. या ग्रंथात समाज, राज्य व कायदा याविषयी सविस्तर विश्लेषण आहे.

2.    रोमन तत्वज्ञा सिसेरी यांनी हा ग्रंथ व मॅकवेलचा या ग्रंथात समाज जीवनावर प्रकाश टाकला आहे.

3.    भारतात देखील वेद, उपनिषदे, पुराणे, स्मृती, रामायण इ. समावेश होतो. यामध्ये समाज जीवन लोक व्यवहार संकेत, संस्कार आणि आचार संहिता यांचे स्पष्टीकरण आढळते. कौटिल्याचा ‘अर्थशास्त्र’ व शुक्राचार्यांनी लिहिलेला ‘नितीसार’ या गंथात राज्यसंस्था, धर्मसंस्था, अर्थव्यवस्था व समाजजीवनाचे चित्रण केलेले आहे. तसेच जैन व बौद्ध धर्मीयांच्या साहित्यात तत्कालीन समाज वर्तनाचे दर्शन घडते.  

4. भारतात देखील वेद, उपनिषदे, पुराणे, स्मृती, रामायण इ. समावेश होतो. यामध्ये समाज जीवन लोक व्यवहार संकेत, संस्कार आणि आचार संहिता यांचे स्पष्टीकरण आढळते. कौटिल्याचा ‘अर्थशास्त्र’ व शुक्राचार्यांनी लिहिलेला ‘नितीसार’ या ग्रंथात राज्यसंस्था, धर्मसंस्था, अर्थव्यवस्था व समाजजीवनाचे चित्रण केलेले आहे. तसेच जैन व बौद्ध धर्मीयांच्या साहित्यात तत्कालीन समाज वर्तनाचे दर्शन घडते.

समाजशास्त्राचा आरंभ

   बहुतांश देशात प्राचीन काळात समाजाचे अध्ययन करण्यात येत होते असे प्रतिपादन केले असले तरी खऱ्या अर्थाने समाजाच्या अध्ययनाची शास्त्रीय दृष्टीने सुरूवात मागील शतकापासून झाली.

   इ.स. 1839 मध्ये फ्रेंच समाजशास्त्रज्ञ आगस्तकाँन याने ही संज्ञा सर्व प्रथम उपयोगात आणली.ही संज्ञा (सोसिअस) या लॅटिन आणि ष्स्वहवेष् (लोगाॅस) या ग्रीक शब्दापासून बनलेली आहे. यातील या शब्दाचा अर्थसोबती व स्वहवे या शब्दाचा अर्थ शास्त्र असा होता. एकूण म्हणजे संगतीचे किंवा सोबतीचे पर्यायाने समाजाचे शास्त्र होय. आगस्ट कौन ने  ही संज्ञा उपयोगात आणण्यापूर्वी समाजाचे अध्ययन करणारे शास्त्र हे भौतिक शास्त्राप्रमाणे स्वतंत्र शास्त्र असावे या हेतूने  सामाजिक भौतिक ही संज्ञा वापरली. परंतु पुढे घटनांच्या अध्ययनासाठी कितपत तंतोतंत उपयोगात आणता येतील असा प्रश्न निर्माण झाल्याकारणाने त्यांच्या ऐवजी ही संज्ञा वापरली. आणि तेव्हापासून समाजाचे शास्त्र म्हणून  असा शब्द उपयोगात आणला गेला.

आधुनिक समाज शास्त्राचे जनक संपादन करा
आधुनिक समाज शास्त्रात ऑगस्ट कॉम्ट (August Comte) हा समाजशास्त्राचा जनक मानला जातो. इ.स. १८३९मध्ये त्याने सामाजिक भाषणात आणि नंतर Positive philosophy या ग्रंथात "समाजशास्त्र" या शब्दाचा पहिल्यांदा पाश्चात्य जगात वापर केला होता. भारतात आणि चीन देशात हा वापर आधीपासूनच होता.

१. लेस्टर वार्डः

‘समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे’ प्रस्तुत व्याख्येत वार्ड ने समाजशास्त्राचा अभ्यास म्हणून ‘समाजाचा उल्लेख’ केलेला आहे. परंतु समाजातील कोणत्या अंगाचे आणि कोणत्या रितीने अध्ययन केले पाहिजे यासंबंधी संकेत दिलेला नाही.

२.    फ्रॅन्कलीन गिडिंगजः

समाजशास्त्रात संपूर्ण समाजाचे व्यवस्थितरित्या वर्णन आणि स्पष्टीकरण करण्यात येते.

वरील परिभाषेत संपूर्ण समाजाचे व्यवस्थितरित्या अध्ययन करण्यात येते असे सुचविले आहे.

३.    आगबर्न व निमकाॅकः

”समाजजीवनाचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करणाऱ्या शास्त्रास समाजशास्त्र असे म्हणतात.“

येथे समाजाचे शास्त्रीयरितीने अध्ययन केले पाहिजे. हे नमूद करताना अभ्यासासाठी वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करण्याची गरज प्रधान मानली आहे.

४.    मॅक आयव्हर व पेजः

समाजशास्त्राचा अभ्यास विषय सामाजिक संबंध आहे.

५.    मार्षल जोन्सः

समाजशास्त्रात मानवाचा अनेक मानवांशी असलेला संबंध अभ्यासण्यात येतो.

६.    हॅरी जाॅन्सनः

समाजशास्त्रात सामाजिक समूहांचा अभ्यास करण्यात येतो.

७. मॅक्स वेबरः

समाजशास्त्र हे असे विज्ञान आहे की, ज्यात सामाजिक क्रियांच्या निर्वाचनात्मक आकलनाचा प्रयत्न करण्यात येतो.

८.    अल्केष इकेल्सः

समाजशास्त्रात सामाजिक क्रिया व्यवस्थेचा आणि त्यातील पारंपारिक संबंधाचा अभ्यास केला जातो.



समाजशास्त्राचे घटक संपादन करा
वर सांगितलेल्या व्याख्येवरून समाजशास्त्राचा अध्ययनविषयाबाबत खालील घटक स्पष्ट करण्यात येतात.

अ.    मानवी समाजाचे अध्ययन. ब्.    सामाजिक संबंधाचे अध्ययन. क्.    सामाजिक समुहाचे अध्ययन. ड्.    सामाजिक क्रियांचे अध्ययन.

१.    मानवी समाजाचे अध्ययनः

समाजशास्त्रा संपूर्ण मानवी समाजाचे अध्ययन केले पाहिजे. समाजशास्त्रात समाजाच्या कोणत्याही एका अंगाचे अध्ययन केले म्हणजे समाजाचे संपूर्ण आकलन होऊ शकत नाही. संस्था किंवा समूह हे घटक स्वतंत्र नसतात ते परस्पर संबंधित व परस्पर अवलंबित असतात. त्यामुळे कोणताही अभ्यास करताना सर्व घटकांचा संदर्भ विचारात घ्यावा लागतो. म्हणून समाजशास्त्राचा अभास विषय संपूर्ण मानवी समाज असला पाहिजे.

२.    सामाजिक संबंधाचा अभ्यासः

काही अभ्यासकांच्या मते समाजशास्त्राचा अभ्यासविषय सामाजिक संबंध असला पाहिजे कारण त्यांच्या मते मानवी समाज व्यक्ती, व्यक्ती मिळून बनलेला असतो. सर्व व्यक्ती एकमेकांषी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या, संबंधित असतात. समाज म्हणजे सामाजिक संबंधाचे जाळे होय. त्यामुळे समाजशास्त्रात संबंधांचा अभ्यास झाला पाहिजे.

३. सामाजिक समुहांचे अध्ययनः

जाॅन्सन यांच्या व्याख्येनुसार समाजशास्त्र अभ्यासविषय सामाजिक समुहांचे अध्ययन असावे. त्यांच्यामते समाज हा एक विशाल समूह आहे. या समूहात अनेक उपसमूह असतात. हे समूह परस्परांषी संबंधित असतात. समाजातील सभासद आपल्या सर्व जीवनावष्यक गरजा एकटयाने भागवू शकत नाहीत. त्यांना एकमेकांचे सहकार्य घ्यावे लागते. यासाठी ते एकत्र येतात. आणि समुहाची निर्मिती होते. म्हणून समाजशास्त्रात सामाजिक समुहांचा अभ्यास झाला पाहिजे.


४.    सामाजिक क्रियांचे अध्ययनः

मॅक्स वेबर व इतर समाज शास्त्रज्ञानानुसार समाजशास्त्राचा अभ्यासविष सामाजिक क्रिया असला पाहिजे. सामाजिक जीवनात सामाजिक क्रिया मध्यवर्ती असतात. ज्याप्रमाणे मूलद्रव्यात ‘परमाणू’ जसा लहानात लहान असून देखील अर्थपूर्ण असतो. त्याप्रमाणे सामाजिक क्रिया महत्वाच्या असतात.

वरील बाबींवर समाजशास्त्रात अभ्यास करण्यात यावा असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

समाजशास्त्राचे विभाजन संपादन करा
अल्केस इंकेलस यांनी समाजशास्त्राच्या अभ्यासाविषयीचे ठळक भागात विभाजन केले आहे.

1.    समाजशास्त्रीय विष्लेषणः

मानव संस्कृती आणि समाज सामाजिक दृष्टीकोन वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन.

2.    समाजातील प्राथमिक घटकः

सामाजिक क्रिया आणि सामाजिक संबंध, व्यक्तीचे व्यक्तीमत्व, समुह, समुदाय, मंडळे, आणि संघटन इ. अध्ययन.

3.    मूलभूत सामाजिक संकल्पनाः

कुटूंब, आर्थिक, राजकीय, धार्मिक शैक्षणिक, न्याय इ. विषयीचे अध्ययन.

समाजशास्त्राची व्याप्ती व संप्रदाय 
तत्वांचे अध्ययन 
शास्त्रांचे प्रमूख दोन प्रकार 
उपशाखा 
लिंगभावाचे समाजशास्त्र 
सामूहिक वर्तनशास्त्र 
लोकसंख्याशास्त्र : लोकसंख्या वाढीचे परिणाम 
मानवी परिसंस्थाशास्त्र 
वैद्यकीय समाजशास्त्र 
औद्योगिक समाजशास्त्र 
लष्करी समाजशास्त्र 
धार्मिक समाजशास्त्र 
शहरी समाजशास्त्र 
ग्रामीण समाजशास्त्र 
शेतकरी समाजशास्त्र 
सामाजिक मानसशास्त्र 
सैद्धान्तिक समाजशास्त्र 
न्याय समाजशास्त्र 
आंतरजालीय समाजशास्त्र 
माध्यमाचे समाजशास्त्र 
वर्गांचे आणि जातींचे समाजशास्त्र Marathi project 11 
विज्ञानाचे समाजशास्त्र 
ज्ञानाचे समाजशास्त्र 
भारतीय समाजशास्त्रज्ञ 
सामाजिक संघटना 

उत्तर लिहिले · 4/9/2021
कर्म · 121765