राजकारण ग्रामपंचायत स्थानिक प्रशासन

ग्रामसेवक आणि सरपंच यांची नेमकी कामे कोणती?

2 उत्तरे
2 answers

ग्रामसेवक आणि सरपंच यांची नेमकी कामे कोणती?

3
ऐग्रामसेवकांची कामे पुढीलप्रमाणे आहेत : 

1. कर वसुली करणे


2. वसुलीतून गावविकासाची कामे करणे,


3. पाणीपुरवठा,


4. साफ सफाई,

5. दिवा बत्ती, इत्यादी कामे करणे.


6. जन्म पंजीयन ( नोंदणी करणे) 


7. मर्त्यु पंजीयन (नोंदणी करणे) 


8. विवाह पंजीयन ( नोंदणी) 


9. घर का पट्टा बनाना।


10. ग्रामीण विकास


11. मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) 


12. ग्राम पंचायतीमध्ये सचिव ।


13. स्वच्छ भारत मिशन


14. ग्राम सभा


15. 29 विभागों के कार्य देखते हैं।

१६. ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामे पार पाडतात. 

१७. ग्रामपंचायतीची महत्त्वाची कागदपत्रे व हिशोब संभाळणे.

18. विविध योजना राबविणे.

 उदा.

1. मनरेगा

2. स्वच्छ भारत मिशन

3. 14वा वित्त आयोग.

4. प्रधान मंञी आवास योजना

5. स्मार्ट गाव


6. ग्राम सभा सचिव


सरपंजाची कामे कोणती हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

टीप : या प्रश्नाचे उत्तर 'उत्तर 'या अँपवरच 'राँयल फौजी ' यांनी दिले आहे. खालील लिंक त्याच उत्तराची आहे. 


उत्तर लिहिले · 24/8/2021
कर्म · 25850
0
ग्रामसेवक आणि सरपंच यांची कामे:
ग्रामसेवक: ग्रामसेवक हा गावातील शासकीय कर्मचारी असतो. तो पंचायत समितीचा सचिव म्हणून काम करतो. त्याची प्रमुख कामे खालीलप्रमाणे आहेत:
  • ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे कामकाज पाहणे.
  • ग्रामपंचायतीच्या सभांचे आयोजन करणे आणि इतिवृत्त लिहिणे.
  • शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचवणे.
  • ग्रामपंचायतीच्या विकास योजनांमध्ये मदत करणे.
  • ग्रामपंचायतीच्या कर वसुलीमध्ये मदत करणे.
  • जन्म-मृत्यूची नोंद ठेवणे.
  • गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता आणि आरोग्य यांसारख्या सुविधांची देखभाल करणे.
सरपंच: सरपंच हा गावाचा लोकप्रतिनिधी असतो. तो ग्रामपंचायतीचा अध्यक्ष असतो. त्याची प्रमुख कामे खालीलप्रमाणे आहेत:
  • ग्रामपंचायतीच्या सभांचे अध्यक्षस्थान भूषवणे.
  • ग्रामपंचायतीच्या विकास योजनांना मंजुरी देणे.
  • गावाचा विकास करणे.
  • गावातील लोकांना न्याय देणे.
  • ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे.
  • शासनाकडून आलेल्या विकास निधीचा योग्य वापर करणे.
  • गावामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखणे.
थोडक्यात, ग्रामसेवक हा शासकीय योजना आणि कामकाज लोकांपर्यंत पोहोचवतो, तर सरपंच हा लोकांचे नेतृत्व करतो आणि गावाच्या विकासाची धुरा सांभाळतो.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1560

Related Questions

खाजगी प्रशासन व शहरी प्रशासन?
ग्रामपंचायतमध्ये तक्रार निवारण मंच आहे का?
सरपंचाची कामे कोणती असतात?
ग्रामवसतीच्या प्रमुखाला काय म्हणतात?
नगर परिषद CO चे अधिकार व कार्य काय आहेत?
नगरपालिका क्षेत्रातील yellow, green, red झोन बद्दल माहिती?
ग्राम सेवेबद्दल भाषण द्या?