कला नाटक

नाटक म्हणजे काय? नाटक कोणी लिहिले?

2 उत्तरे
2 answers

नाटक म्हणजे काय? नाटक कोणी लिहिले?

1

नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती किंवा प्राणी यांच्या भूमिका करणाऱ्या नटांनी रंगमंचावर सादर केलेली, बहुधा संवादात्मक, अभिनयमय, नृत्यमय किंवा काव्यात्मक कलाकृती असू शकते. नाटकामध्ये शब्दसंहिता, त्याचप्रमाणे कथानक, त्यात असलेल्या विषयांचा तपशील, संवाद, पदे, वाद्यसंगीत, पार्श्वसंगीत, नृत्ये, संघर्ष, उत्कंठा, नेपथ्य, वेश-रंगभूषा, प्रकाशयोजना, अभिनय आणि कथानक असू शकते. पण यांतली एकही गोष्ट नाटकासाठी अपरिहार्य किंवा अनिवार्य नाही. सॅम्युअल बेकेट यांचे 'ब्रेथ' हे नाटक शब्दसंहिताविरहित आणि अभिनयविरहित आहे. नाटकाचा प्रयोगकाल काही सेकंदांपासून (उदा०. ब्रेथ) बारा तासांपर्यंत (उदा० पीटर ब्रुक यांचे महाभारत) असू शकतो. ‘वाडा चिरेबंदी’ सारखे नाटक सलग सादर न करता दोन दिवसही सादर होऊ शकते. नभोवाणीवरील श्रुतिका एकाहून अधिक दिवस चालू शकतात, तर दूरचित्रवाणीवर मालिका महिनोन्‌महिने चालतात. नाट्यवाचन हा त्यातील प्रमुख प्रकार आहे. नाटक हा साहित्याचा अविभाज्य घटक आहे.

नाटकाची व्याप्ती संपादन करा
नाट्य हे "सर्वकर्मांनुदर्शक आहे". कर्म हे संचित असते आणि त्याचे दर्शन कृती द्वारा होणारे असते . त्याचे अनुसंधान म्हणजे नाट्य म्हणता येईल .नाट्य हे त्रैलोक्याचे 'भावानुकीर्तन' असते. सर्व प्रकारच्या वृत्ती प्रवृत्तीचे दर्शन असते. संपूर्ण विश्वातील सर्व जीवन व्यवहारातील भावांच्या श्रनुकीर्तनातून नाट्य प्रकट होते असे म्हटले की नाट्याची ही व्याप्ती लक्षात येईल .भावकीर्तनात जे जे असेल त्याचा परस्पर अन्वय, संबंध येथे प्रकट असतो असे म्हटले तर, नाट्य हा "सर्वभावान्वयापेक्षी वेद" आहे.

संदर्भ:- (संपा) आनंद वास्कर,वाङमयप्रकार: संकल्पना व स्वरूप, अन्वय प्रकाशन, पुणे.२००४, पृ.क्र.६७-६८

महाराष्ट्र हा नाट्यवेडा प्रदेश म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राला नाटकांची प्राचीन व समृद्ध परंपरा आहे.

मराठीतील नाटकांपेक्षा हिंदीत आणि बंगालीत जास्त नाटके होतात. फरक एवढाच आहे की, एखादे मराठी नाटक दशकानुदशके रंगमंचावर येत राहते, आणि हिंदी नाटकाचे एक-दोन प्रयोग झाले की ते रंगमंचावर येणे बंद होते.

अभिव्यक्तीचे सशक्त माध्यम नाटक :- नाटकासारखे जिवंत माध्यम जेथे असते, तेथे जिवंत माणसे जिवंत माणसांशी संवाद साधत असतात. जिवंत माणसे एकाच कालखंडात जगत असतात. त्यामुळे त्या त्या काळातल्या माणसांबरोबर त्या त्या काळातले प्रश्न आदान प्रदान करणे, त्यांचे विचार, त्यांना काय वाटते हे लोकांसमोर मांडणे हा एक त्यांतला महत्त्वाचा भाग असतो. आणि त्याच्यातच खरा खूप मोठा आनंद असतो. नाटकाचा झालेला कुठलाही प्रयोग हा परत कधी होत नाही. प्रयोग नेहमी नवीनच होत असतो, म्हणून नाटकाला प्रयोग म्हणतात. प्रत्येक वेळी त्याच्यात प्रेक्षकाला काहीतरी नवीन सापडते. आता सापडणे हेच जर तत्त्व मान्य केले तर ते सापडण्यासाठी प्रेक्षकाच्या फुटपट्ट्या काय असाव्यात, हा केवळ त्याचा व्यक्तिगत मुद्दा असतो. त्याला काय आवडते, काय वाटते, त्याच्या स्वतःच्या आजच्या सामाजिक धारणा काय आहेत, संवेदना काय आहेत, त्याला समाजकारण - राजकारणाविषयी काय वाटते, माणूस म्हणून जगत असताना त्याचे अत्यंत कळीचे, अत्यंत टोकाचे प्रश्न काय आहेत, की ज्यामुळे त्याला कोंडीत पकडल्यासारखे वाटते, हे महत्त्वाचे असते. अभिव्यक्त कशातूनही होणे याला मराठीतून माध्यम असे म्हंटले जाते . म्हणूनच नाटक हे अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम आहे.

नाटक आणि प्रयोगानुभव :-

माणूस जेव्हा एखादे नाटक पाहायला जातो, तेव्हा तो अनुभव कसा असतो ?

एकतर त्याने आधी त्या नाटकाची जाहिरात पाहिलेली असते, किंवा कोणीतरी त्याला नाटकाविषयी सांगितलेले असते. मग तो नाटक पाहायला जायचे ठरवतो, कोणासोबत किंवा एकटेच. कदाचित त्या नाटकाचा भाग असलेल्या कोणीतरी त्याला नाटक पाहायचे आमंत्रण दिलेले असते, नाहीतर मग तो तिकिट काढतो.

प्रयोगाच्या दिवशी ठरलेल्या वेळेला माणूस नाटकघरात पोचतो. त्याच्याप्रमाणेच इतरही लोक नाटक पाहायला आलेले असतात. नाटकघराच्या आवारात त्या दिवशी सादर होणाऱ्या तसेच काही आगामी नाटकांची माहिती लावलेली असते. या माहितीमध्ये प्रामुख्याने नाटक कधी, किती वाजता आणि कुठे सादर होणार आहे, नाटकाचे नाव काय आहे, नाटकाचे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकार कोण आहेत हे लिहिलेले असते. क्वचित प्रसंगी नाटकाचा प्रकार (संगीत, कौटुंबिक, सामाजिक, वगनाट्य, विनोदी, फार्स, इत्यादी) किंवा नाटकाचा विषय (महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडणारे, भ्रष्टाचारावर भाष्य करणारे, इत्यादी) देखील नोंदविलेले असते. कधीकधी नाटकातील कलावंतांची किंवा नाट्यप्रसंगांची छायाचित्रे असतात. ते वाचत, बघत असतानाच माणसाच्या नाट्यानुभवाला सुरुवात झालेली असते.

त्यानंतर माणूस तिकिट दाखवून प्रेक्षागृहात प्रवेश करतो. बंद पडद्यासमोर अनेक खुर्च्यांच्या रांगा ओळीने लावलेल्या दिसतात. तो त्याच्या आसनावर जाऊन बसतो. त्याच्या आजूबाजूलाही लोक येऊन बसलेले असतात. मग तो पण ह्या प्रेक्षकसमूहाचा एक भाग होतो. थोड्या थोड्या कालावधीने तीन घंटा होतात, प्रेक्षागृहातील दिवे मंद होऊ लागतात. आता, सादर होणाऱ्या नाटकाविषयी सांगितले जाऊ लागते. समोरचा पडदा हळूहळू उघडू लागतो. नाटकाच्या प्रयोगाला सुरुवात होते.

रंगमंचावर हळूहळू प्रकाश येऊ लागतो आणि प्रेक्षक नाटकाच्या विश्वात प्रवेश करतो. कधी कधी मंचावर काही वस्तू मांडलेल्या असतात, त्यावरुन त्याला हे नाटक कुठे घडते आहे याची कल्पना येऊ शकते. एखादे घर किंवा कार्यालय, महाल, रस्ता किंवा जंगल असे काहीही. मंचावर असलेले किंवा प्रवेश केलेले नट-नट्या त्याला व्यक्तिरेखांची प्रचिती देतात. या व्यक्तिरेखा त्याच्याच समाजातील आपल्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांसारख्या असू शकतात किंवा परक्या देशातल्या, इतिहासातल्या किंवा काल्पनिकदेखील असू शकतात. त्यांनी घातलेले कपडे, त्यांचे चालणे बोलणे असे काही असते की, ते ज्या जगात राहतात त्याची प्रेक्षकाला कल्पना येऊ शकते.

हळूहळू नाटक पुढे सरकते. प्रेक्षकाला नाटकातील व्यक्तिरेखांमधील नातेसंबंध लक्षात यायला लागतात. कोणकोणत्या व्यक्तिरेखा एकमेकांच्या जवळ येता आहेत, कोणकोणत्या एकमेकांशी फटकून वागताहेत. हळूहळू आपल्याला त्यांचा परिचय होऊ लागतो. काही व्यक्तिरेखा त्याला आपल्या अगदी जवळच्या वाटतात, तर काहींचा त्याला राग येतो. मंचावर जे काही घडते आहे त्यामुळे कधी त्याला गंमत वाटते तर कधी तो गंभीर होतो. व्यक्तिरेखा जेव्हा स्वतःचीच चेष्टा करतात, तेव्हा तो पण त्यांच्यावर हसतो. जेव्हा त्यांच्यावर संकटे कोसळतात, तेव्हा त्याला त्यांची काळजी वाटायला लागते. त्यांच्या वेदनेने तो ही दुःखी होतो. कधी नाटकातील थरार आणि रहस्य वाढत जाते, प्रेक्षक श्वास रोखून पहात राहतो. नाटक त्याच्या अत्युच्च बिंदुपाशी पोचते. हळूहळू प्रसंगांची उकल होते, आणि शेवटी त्याला हायसे वाटते.

पडदा पडतो. नाटक संपते. प्रेक्षाघरातील दिवे उजळतात.नाटक बघायला आलेली माणस टाळ्या वाजवतात. लोक हळूहळू प्रेक्षाघराबाहेर पडून काल्पनिका विश्वातून वस्तुनिष्ठ विश्वात प्रवेश करतात. नाटकातले काही विचार, काही ठसे, काही भावना मात्र त्या प्रेक्षाकाच्या मनात नंतर बराच काळ रेंगाळत राहतात. हा अनुभव केवळ एखाद्यालाच नाही तर अनेकांना येतो. शेकडो वर्षांपासून लक्षावधी-कोट्यवधी प्रेक्षक हा अनुभव घेत आलेत. अर्थात प्रत्येक वेळी हा अनुभव असाच असेल असे मात्र नाही; कधी ते जास्त हसले असतील तर कधी जास्त दुःखी झाले असतील. नाटकाचा हाच अनुभव अनेक वेगवेगळ्या पद्धतींनी अनुभवता येऊ शकतो. कधी एका मोठ्या प्रेक्षाघरात हजारो लोकांसोबत हा अनुभव घेता येतो, तर कधी समीपमंच घरात अगदी साठ-सत्तर प्रेक्षकांसोबत हा अनुभव घेता येतो. कधी नाटकातल्या गोष्टीत प्रेक्षक गुंगून जातो, तर कधी नाटकातील गोष्टीमुळे त्याला सभोवतालची जाणीव होते. कधी त्याला स्वतःसारख्याच व्यक्तिरेखा दिसतात, तर कधी आदर्श व्यक्तिरेखा दिसतात. काही नाटकांमधून त्याच्या भोतालच्या समाजातील समस्या मांडल्या जातात, तर काही नाटके त्याला त्रिकालबाधित सत्याची जाणीव करून देतात; काही विचार करायला लावतात, तर काही केवळ केवळ अनुभव देतात. असे जरी असले, तरी एखाद्या नाट्यप्रयोगाचा एकदा जो अनुभव येतो, तो एकदाच येतो. कारण नाटकाचा प्रत्येक प्रयोग हा जरी एकसारखा असला तरी त्याचा अनुभव मात्र प्रयोगागणिक वेगळा असतो, कारण नाटक ही प्रयोगकला आहे.

नाटकाचा इतिहास संपादन करा
भारतीय रंगभूमीचा इतिहास बराच प्राचीन आहे.

भारतात काही रंगभूमीपूर्व कलांचा आढळ होता, असे प्राचीन भारतीय साहित्यांमधील संदर्भांवरून लक्षात येते. गोष्टी सांगण्याच्या कलेतून आख्यानकाव्यांचा जन्म झाला, आणि आख्यानकाव्यांमधून महाकाव्यांची निर्मिती झाली. ही महाकाव्ये मौखिक परंपरेतून पिढ्यानपिढ्या जतन करण्यात आली. महाकाव्यांमधील आख्याने लोकसमुदायासमोर सादर करण्यात येत असत. त्यात वाचिक अभिनयासह संगीताचाही समावेश असे. त्याचप्रमाणे. प्राचीन भारतामधील आर्य संस्कृतीमध्ये यज्ञयाग केंद्रस्थानी होते. त्यांच्या अनुष्ठानामध्ये अनेक गोष्टी अभिनय केल्यासारख्या करावयाच्या असत. वेदवाङ्मयामध्ये काही संवादसुक्ते आढळतात. या सुक्तांचे पठन करताना वाचिक अभिनय आणि हावभावांची जोड मिळून छोटे नाट्यप्रसंग सादर होत असावेत.

इ.स.पू. दोनशे ते इ.स.दोनशे या चारशे वर्षांच्या दरम्यान केव्हातरी संस्कृत नाट्यलेखनापासून ते नाट्यप्रयोगाची इत्यंभूत माहिती देणारा नाट्यशास्त्र हा ग्रंथ रचला गेला. भरत हा नाट्यशास्त्राचा कर्ता समजला जातो.

संस्कृत नाटकांमध्ये सर्वांत प्राचीन अशी नाटके अश्वघोष या नाटककाराची मानता येतील. त्याची नाटके बौद्ध धर्मातील शिकवणी संदर्भातील होती. परंतु ती त्रुटित स्वरूपात मिळालेली असल्याने कथानकाची पूर्ण कल्पना करता येत नाही. सन १९१२मध्ये केरळात ताडपत्रांवर लिहिलेली भास या नाटककाराची तेरा नाटके सापडली. त्याने रचलेले स्वप्नवासवदत्ता हे संस्कृत भाषेतील एक महत्त्वाचे नाटक मानले जाते. कर्णभार आणि ऊरुभंग या एकांकी नाटकांमध्ये महाभारतातील खलपात्रांचे उदात्तीकरण असून ती नाटके करुणरसप्रधान आहेत. गुप्तकाळातील कालिदास या नाटककाराची मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय आणि अभिज्ञान शाकुंतल ही नाटके प्रसिद्ध आहेत. ती शृंगाररसप्रधान आहेत. शूद्रकाने रचलेले मृच्छकटिक हे एक लोकप्रिय संस्कृत नाटक होते. यात चारुदत्त आणि वसंतसंनेच्या प्रणयकथेला समांतर अशी राज्यक्रांतीची कथा आहे. इतर संस्कृत नाटककारांमध्ये भवभूती (नाटक - उत्तररामचरित), विशाखादत्त (नाटक - मुद्राराक्षस), इत्यादींचा समावेश होतो.

भास हा एक प्राचीन भारतीय नाटककार होता. तसेच कालिदास हा कवीही नाटककार होता. ही नाटके बहुधा संस्कृत भाषेत असली तरी त्यांतली काही पात्रे प्राकृत भाषेत बोलत असत.


उत्तर लिहिले · 23/8/2021
कर्म · 121765
0
उत्तर:

नाटक म्हणजे काय:

नाटक हे साहित्य आणि कला यांचे एकत्रीकरण आहे. हे एक कथात्मक माध्यम आहे जे संवाद, अभिनय, आणि दृश्यांच्या माध्यमातून सादर केले जाते. नाटकांमध्ये, कलाकार (actor) भूमिका साकारतात आणि एका विशिष्ट कथानकाला रंगमंचावर (stage) जिवंत करतात.

नाटक कोणी लिहिले:

नाटक लेखकाला नाटककार म्हणतात. प्राचीन काळापासून अनेक नाटककारांनी नाटके लिहिली आहेत. उदाहरणार्थ:

  • विल्यम शेक्सपियर: ते एक प्रसिद्ध इंग्लिश नाटककार होते.
  • कालिदास: ते संस्कृत भाषेतील महान नाटककार आणि कवी होते.
  • वि. वा. शिरवाडकर: ते मराठीतील प्रसिद्ध नाटककार होते.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 5060

Related Questions

अजिंठा येथील लेणी यावर सविस्तर निबंध लिहा?
कविता लिहिण्यासाठी कवीकडे काय असायला पाहिजे?
ग्रामीण कलेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
अभिनेत्री म्हणून सुलभा देशपांडे यांच्या नाटकातील भूमिकांबद्दल थोडक्यात माहिती?
अभिनेत्रीची म्हणून सुलभा देशपांड नाटकातील भूमिकेशी तन्मयता in few words?
अभिनेत्रीची म्हणून सुलभा देशपांड नाटकातील भूमिकेशी तन्मयता?
अभिनेत्री म्हणून सुलभा देशपांड े यांना जाणवलेले नाटकाच े आशयसूत्र in few words?