पुरातत्व इतिहास

हडप्पा संस्कृतीतील नगरांची वैशिष्ट्ये काय होती?

2 उत्तरे
2 answers

हडप्पा संस्कृतीतील नगरांची वैशिष्ट्ये काय होती?

2
हडप्पा संस्कृतीची नगररचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते. घरे, तटबंदी, सांडपाण्याची व्यवस्था, स्नानगृहे, धान्याची कोठारे,जहाजाची गोदी इत्यादी घटक पाहता हडप्पाकालीन संस्कृतीच्या प्रगत स्थापत्याची कल्पना येते.



हडप्पा संस्कृती ) ही जगातील प्राचीन ताम्र युगीन संस्कृतींपैकी एक आहे. हिचा कालखंड लिबी यांच्या कार्बन १४ या शास्त्रीय पद्धतीनुसार इ.स.पू. २७०० ते इ.स.पूर्व १५०० असा मानला जातो. इ.स. १९२० च्या सुमारास लाहोर-मुलतान रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना काही प्राचीन विटांचे अवशेष सापडले. यामुळे पुरातत्त्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू केले आणि एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली. या संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून नव्यानेच शोधलेल्या या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात. ही संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदीच्या प्रदेशात केंद्रित असल्याने तिला 'सिंधू संस्कृती' असेही म्हणतात. नागरी हडप्पा संस्कृतीची बीजे बलुचिस्तानातील मेहेरगढ येथील हडप्पापूर्व् काळातील नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये सापडतात. जॉ फ्रन्क्ववा जारीज आणि रिचर्ड् मेडो या पुरातत्वज्ञानी येथे उत्खनन केले.[१] हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुणा दर्शविणा-या ज्या संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत त्या संस्कृतीला 'टोगाओ संस्कृती' या नावाने ओळखले जाते. हडप्पापूर्व् काळातील 'रावी अथवा हाक्रा' संस्कृतीचे अवशेष हडप्पा (पन्जाब् पाकिस्तान), कुणाल, भिराणा, फर्माना (हरयाणा) इत्यादी स्थळाच्या उत्खननात मिळाले आहेत. [२]


हडप्पा संस्कृतीकालीन शिल्पकला
उत्खननात हडप्पा व मोहेंजोदडो या दोन्ही नगरांच्या ठिकाणी एकाच प्रकारच्या मुद्रा आढळून आल्या. अशाच प्रकारच्या संस्कृतीचे अवशेष पश्चिम भारतात कालीबंगन, धोळावीरा, सुरकोटडा, लोथल, दायमाबाद इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात सापडले हडप्पा संस्कृती ही जगाला लाभलेली मोठी देणगी आहे या संस्कृतीच्या उत्खननामुळे जगाला भारतीय संस्कृतीचा योग्य तो परिचय झाला.

नगररचना 
हडप्पा संस्कृतीची नगररचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते. घरे, तटबंदी, सांडपाण्याची व्यवस्था, स्नानगृहे, धान्याची कोठारे,जहाजाची गोदी इत्यादी घटक पाहता हडप्पाकालीन संस्कृतीच्या प्रगत स्थापत्याची कल्पना येते. प्राचीन इजिप्त व मेसोपोटेमिया या समकालीन संस्कृतींच्या अगदी विरुद्ध हडप्पामध्ये कोणतीही भव्य मंदिरे किंवा तत्सम बांधकामे नव्हती. असे कोणतेही पुरावे मिळाले नाही.

आर्थिक व्यवस्था 
व्यापारासाठी उपयुक्त वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन - उदाहरणार्थ,सुबक मातीची भांडी,सोने, चांदी,तांबे आणि कांसे या धातूंच्या वस्तू,सौंदर्यपूर्ण वस्तू,मूर्ती इत्यादी. उत्पादनाच्या सोईसाठी कारागिरांचे कारखाने आणि कारागीर यांच्या वस्तींचा स्वतंत्र विभाग .अंतर्गत आणि दूरवरच्या प्रदेशांशी असणारा भरभराटीचा व्यापार. शासकीय यंत्रणेच्या साहाय्याने व्यापारावर नियंत्रण असे.

हडप्पाकालीन नगराची विभागणी प्रशासकीय इमारती व लोकवस्ती अशा दोन घटकांत करण्यात आलेली होती. शहरचा लोकवस्तीचा भाग बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे किंवा जाळीप्रमाणे विविध प्रभागांमध्ये विभागला होता. नगर बांधणीसाठीच्या विटा ४:२:१(लांबी:रुंदी:उंची) या प्रमाणातच असत.[३]

घरे 
हडप्पा संस्कृतीत प्रत्येक प्रभागात २० ते ३० घरे असत. ती पक्क्या विटांची असून प्रशस्त होती. प्रत्येक घरामध्ये स्नानगृह(बाथरूम) असे. काही घरांच्या परसात विहिरी आढळल्या आहेत. घरांच्या मध्यभागी, जसे आजही वाड्यांच्या व इतर भारतातील पारंपरिक घरांमध्ये असते, तसे.अंगण असे. [४] घरे एक किंवा दोन मजली असत. फारच क्वचित याहून अधिक मजले असत. मोहेंजोदडो व हडप्पा या दोन्ही शहरात दगडांचे बांधकाम आढळले नाही. कोणत्याही घराच्या रस्त्याच्या बाजूला खिडक्या व प्रवेशद्वारे नाहीत. रस्त्यावरील धुळीपासून व चोराचिलटांपासून बचाव व्हावा, हा हेतू त्यामागे दिसतो. प्रत्येक घर शेजारच्या घरापासून अलग असे. रस्त्याच्या बाजूला मोरी व तिला लागून स्नानगृह बांधीत. मोरी व स्नानगृहात कोठे पाणी मुरणार नाही याची काळजी घेत. [५] आणि पाणी बदलण्याची सोय केेलेेली होती

तटबंदी 
हडप्पाकालीन नगरांना संरक्षक तटबंदी असे. तटबंदी रुंद असून तिचे बांधकाम पक्क्या विटांचे असे. तटबंदीला बुरूज होते. यावरून हडप्पा संस्कृतीने नगराच्या संरक्षणाकडे लक्ष दिल्याचे दिसते.



उत्तर लिहिले · 22/8/2021
कर्म · 121765
0
हडप्पा संस्कृतीतील नगरांची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:
  • नियोजनबद्ध रचना: हडप्पा संस्कृतीतील नगरे नियोजनबद्ध होती. शहरांची रचना करताना काटकोनात छेदणारे रस्ते आणि आयताकृती भूखंडांचा वापर केला गेला होता.
  • मोठ्या इमारती: शहरांमध्ये धान्याची कोठारे, सभागृह, आणि स्नानगृहे यांसारख्या मोठ्या इमारती होत्या. मोहेंजोदडो येथील विशाल स्नानगृह प्रसिद्ध आहे.
  • स्वच्छता आणि पाणीपुरवठा: शहरांमध्ये सांडपाण्याची उत्तम व्यवस्था होती. प्रत्येक घराला स्वतःची विहीर होती आणि सार्वजनिक पाणीपुरवठ्याची व्यवस्था देखील होती.
  • संरक्षण भिंती: प्रत्येक शहराला संरक्षणासाठी तटबंदी (Protection wall) होती.
  • व्यापार आणि वाणिज्य: हडप्पा संस्कृतीतील नगरे व्यापार आणि वाणिज्य यांचे केंद्र होती.
  • कला आणि कारागिरी: या शहरांमधील लोक कला आणि कारागिरीमध्ये कुशल होते. त्यांनी मातीची भांडी, खेळणी, आणि विविध वस्तू बनवल्या.
हडप्पा संस्कृतीतील नगरे ही तत्कालीन जगातील उत्कृष्ट शहरांपैकी एक होती.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 2200

Related Questions

सोनं गुंफा कोठे आहे?
पुरातत्वीय सर्वेक्षण आणि उत्खनन कार्य सांगा?
लोथल येथील वस्तुसंग्रहालय कोणत्या प्रकारचे आहे?
रोमन बनावटीच्या वस्तू सापडलेली ठिकाणे कोणती?
सिंधु संस्कृती / हडप्पा संस्कृतीचा शोध कसा लागला?
हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी स्थलांतर केले का?
प्राचीन भारताच्या इतिहासाची पुरातत्वीय साधने कोणती?