मराठा साम्राज्य इतिहास

मराठ्यांचे आरमार प्रमुख कोण होते?

2 उत्तरे
2 answers

मराठ्यांचे आरमार प्रमुख कोण होते?

1

सरखेल कान्होजी आंग्रे. (ऑगस्ट १६६९ ते ४ जुलै १७२९). सरखेल या शब्दाचा अर्थ आरमार प्रमुख असा होतो. आंग्रे १८ व्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख होते. आपले अखंड आयुष्य त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढण्यात घालवले. त्याकाळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे, किल्ले काबीज करण्याची परकीय सत्तांमध्ये चढाओढ लागली होती. भारताच्या किनारपट्टीवरील बंदरे ताब्यात ठेवून आपला व्यापारी माल युरोपमध्ये पाठवण्यासाठी त्यांचा वापर करण्याची त्यांना आवश्यकता वाटत होती. सागरी व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी मोक्याच्या ठीकाणी सागरी किल्ले काबीज करणेही आवश्यक होते.[ संदर्भ हवा ] कान्होजींनी या गोंधळाचा उपयोग आपले आरमार स्थापन करण्यापासून ते संपूर्ण किनारपट्टीवर अनिर्बंध सत्ता गाजवेपर्यंत केला.[ संदर्भ हवा ] इंग्रज आणि पोर्तुगीज आरमाराच्या अथक प्रयत्नानंतरही, मरेपर्यंत कान्होजी आंग्रे यांचे मराठा आरमार अजिंक्य राहिले.

कान्होजी आंग्रे
Sarkhel Kanhoji Angre I.jpg
१८व्या शतकातील मराठा आरमाराध्यक्ष.
जन्म
इ.स. १६६९
हर्णे, जिल्हा - रत्नागिरी, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू
जुलै ४, इ.स. १७२९
कुलाबा किल्ला, अलिबाग, महाराष्ट्र, भारत.
टोपणनावे
सरखेल
पदवी हुद्दा
आरमार प्रमुख.   
कार्यकाळ‌‌
१६९८ - १७२९


उत्तर लिहिले · 22/8/2021
कर्म · 121765
0

मराठा आरमाराचे पहिले प्रमुख दर्यासारंग (ॲडमिरल) कान्होजी आंग्रे होते.

कान्होजी आंग्रे (इ.स. १६६९ - इ.स. १७२९) हे मराठा साम्राज्याचे सेनापती होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या मराठा आरमाराचा त्यांनी विकास केला. अधिक माहितीसाठी येथे पहा

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1080

Related Questions

शंभूराजेंच्या बलिदानाबाबत माहिती द्या?
छत्रपती संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूरवर हल्ला का केला?
शिवाजी महाराज नाशिकमध्ये कोणत्या गावात तळ ठोकून बसले होते?
छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार कधी उभारले?
बाजीराव आणि निजामांनी पराभव केलेल्या लढाया?
पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला?
पहिले ब्रह्मयुद्ध आणि वसईच्या स्वातंत्र्याची माहिती?