गणित शब्दाचा अर्थ भूमिती

गणपूर्ती म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

गणपूर्ती म्हणजे काय?

0
संघांच्या व संस्थांच्या सभा व त्यांत घेतलेले निर्णय वैध होण्यासाठी संघांच्या व संस्थांच्या घटनांमध्ये किंवा संस्थापन नियमावलींमध्ये उपस्थित सदस्यांची जी किमान संख्या विहित केलेली असते, तिला गणपूर्ती म्हणतात. सभा प्रातिनिधिक असाव्यात व कामकाज जबाबदारीने व्हावे म्हणून ही तरतूद केली जाते.


गणपूर्ति



गणपूर्ति
संघांच्या व संस्थांच्या सभा व त्यांत घेतलेले निर्णय वैध होण्यासाठी संघांच्या व संस्थांच्या घटनांमध्ये किंवा संस्थापन नियमावलींमध्ये उपस्थित सदस्यांची जी किमान संख्या विहित केलेली असते, तिला गणपूर्ती म्हणतात. सभा प्रातिनिधिक असाव्यात व कामकाज जबाबदारीने व्हावे म्हणून ही तरतूद केली जाते. गणपूर्ती सामान्यतः एकूण सदस्यांच्या संख्येवरून ठरवितात. केव्हाकेव्हा सभांमध्ये चर्चा योग्य रीतीने व्हाव्यात हाही दृष्टिकोन असतो. शेअर्स घेणाऱ्या अथवा वर्गणी देणाऱ्या आणि संस्थेचे ध्येय संमत असणाऱ्या कोणत्याही सज्ञान व्यक्तीला संस्थेचे सभासद होता येते. अशा संस्थांमध्ये साधारणतः हा दृष्टिकोन ठेवण्यात येतो. काही ठिकाणी सभा सुरू करण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी व घटना बदलणे किंवा खर्च मंजूर करणे अशा प्रयोजनांसाठी गणपूर्तीची वेगवेगळी संख्या ठरविण्यात येते.सर्वसाधारणपणे गणपूर्तीस्थानिक स्वराज्य संस्थांत एकूण सदस्यांच्या १/३ असते. भारतीय लोकसभेमध्ये ती एकूण सदस्यसंख्येच्या १/१० व महाराष्ट्र विधानसभेमध्ये १० किंवा एकूण सदस्यसंख्येच्या १/१० यांपैकी जी मोठी असेल. त्या संख्येएवढी आहे.गणपूर्ती नसल्यास सभा सुरू करता येत नाही. अध्यक्षांनी उपस्थित सदस्यांची मोजणी करून स्थानापन्न व्हायचे असते व त्यानंतर सभा सुरू झाल्याचे समजण्यात येते. गणपूर्ती असूनही अधिक उपस्थिती नाही, या कारणाकरिता सभा तहकूब करण्याचा अधिकार अध्यक्षांचा नसून सभेचाच असतो. सभा सुरू झाल्यावरही उपस्थितांची संख्या गणपूर्तीपेक्षा कमी झाल्यास सभा चालू राहू शकत नाही. सभेचे निर्णय सर्व अनुपस्थित सभासदांवरही बंधनकारक असल्यामुळे गणपूर्ती ठरवणे न्यायाचे असते.कोणत्याही कारणाने तहकूब होऊन पुन्हा भरलेली सभा मूळ सभाच चालू असल्याचे समजतात, तिला गणपूर्तीची आवश्यकता नसते.


उत्तर लिहिले · 10/8/2021
कर्म · 121765
0

गणपूर्ती (कोरम) म्हणजे संस्थेची सभा (meeting) घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सदस्यांची किमान संख्या होय.

  • कायद्यानुसार आवश्यकता: काही संस्था कायद्यानुसार किंवा नियमांनुसार कामकाज सुरू ठेवण्यासाठी किमान सदस्यांची संख्या निश्चित करतात. या संख्येलाच गणपूर्ती म्हणतात.
  • उद्देश: गणपूर्तीचा उद्देश हा आहे की महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी पुरेसे सदस्य उपस्थित असणे आवश्यक आहे, जेणेकरून निर्णय योग्य आणि वैध ठरतील.
  • उदाहरण: कंपनी कायद्यानुसार, सार्वजनिक कंपनीच्या (public company) सभेत किमान ५ सदस्य आणि खाजगी कंपनीच्या (private company) सभेत किमान २ सदस्य उपस्थित असणे आवश्यक आहे. यालाच गणपूर्ती म्हणतात.

अधिक माहितीसाठी खालील दुवे तपासा:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980

Related Questions

एका खेड्याची लोकसंख्या दरवर्षी ५% ने वाढते. २००९ साली ती लोकसंख्या ८८२०० आहे, तर २००७ साली किती होती?
27 चा घन सांगा?
29 चा वर्ग किती आहे?
15 अधिक 13 बरोबर किती?
64009 या संख्येचे वर्गमूळ काढण्याची पद्धत काय आहे?
468.3251 या संख्येमध्ये पाच या अंकाची स्थानिक किंमत किती आहे?
15, 17, 16, 8 आणि के यांची सरासरी 13 येत असेल, तर के बरोबर किती?