3 उत्तरे
3
answers
टोलेजंग म्हणजे काय?
1
Answer link
मराठीत टोलेजंग म्हणजे प्रशस्त, मोठे, प्रचंड, महाकाय असा अर्थ होतो.
उदा. टोलेजंग वाडा किंवा इमारत.
0
Answer link
टोलेजंग शब्दाची फोड "टोल-ए-जंग" अशी होते. या पैकी 'ए' हा शब्द म्हणजे मराठीमध्ये 'चा'. उदा. रुस्तुम-ए- हिन्द , निशान-ए-पाकिस्तान इत्यादी शब्द पहा.
उर्दूमध्ये 'टोल' शब्दाचा अर्थ घेऊन जाणे.)तर 'जंग' या शब्दाचे दोन अर्थ होतात,पैकी एक म्हणजे मराठीत 'गंज' (लोखंड गंजते तो गंज) तर दुसरा अर्थ आहे 'युद्धाच्या काळात दोन शत्रुपक्षात होणाऱ्या चर्चा'. हा अर्थ अधिक संयुक्तिक असावा. अशा चर्चेतून एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाने ताब्यात घेतलेली मालमत्ता किंवा संपत्ती म्हणजे टोलेजंग!(युद्ध म्हणजे प्राणहानी तसेच वित्तहानी त्यामुळे ते टाळण्यासाठी प्रबळ शत्रूला भरभक्कम खंडणी देणे हा याचा अर्थ दिसतो.)
माझा अंदाज बरोबर आहे असे वाटत असल्यास अपव्होट करावे हि विनंती.
टोलेजंग—वि. मजबूत; दांडगी; बळकट; खंबीर; धक्के खाऊन टिकलेली (इमारत, खांब इ॰). २ अजस्त्र; भव्य; अत्यंत मोठें; प्रचंड. [टोला + जंग]

टोलेजंग शब्दाचा अर्थ गगनचुंबी, अजस्त्र, विशाल असा अर्थ आहे..
0
Answer link
टोलेजंग या शब्दाचा अर्थ उंच आणि भव्य असा होतो. विशेषत: इमारती, पर्वत किंवा इतर मोठ्या वस्तूंचे वर्णन करण्यासाठी हा शब्द वापरला जातो.
उदाहरणार्थ:
- "मुंबईमध्ये अनेक टोलेजंग इमारती आहेत."
- "हिमालय पर्वतातील टोलेजंग शिखरे नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतात."
हा शब्द एखाद्या व्यक्तीच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करण्यासाठीही वापरला जाऊ शकतो.