राजकारण धर्मनिरपेक्षता

धर्मनिरपेक्षता म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

धर्मनिरपेक्षता म्हणजे काय?

1
धर्मनिरपेक्षता म्हणजे राजकीय, नागरी किंवा सामाजिक व्यवहारांत धर्म, धर्मविचार, किंवा धार्मिक कल्पना यांना दूर ठेवणे. मात्र धर्मनिरपेक्षता म्हणजे अधर्म, निधर्मीपणा, नास्तिकता, किंवा धर्मविरोध नाहीधर्मनिरपेक्षता म्हणजे राजकीय, नागरी किंवा सामाजिक व्यवहारांत धर्म, धर्मविचार, किंवा धार्मिक कल्पना यांना दूर ठेवणे[१]. मात्र धर्मनिरपेक्षता म्हणजे अधर्म, निधर्मीपणा, नास्तिकता, किंवा धर्मविरोध नाही. धर्मनिरपेक्ष म्हणजे एवढेच की, ऐहिक जीवनाची व्यवस्था लावताना धर्मकल्पना अप्रस्तुत होत त्यांच्याऐवजी शास्त्रीय ज्ञान, मानवी मूल्ये आणि विवेकनिष्ठा यांचे साहाय्य घेणे. [२]धर्माने आपले स्वातंत्र्य अबाधित राखून उरलेली जी काही कक्षा आहे ती राजसत्तेची. धर्मनिरपेक्षतेची ही कल्पना जनतेला स्वातंत्र्य देत नाही, तर जनतेचे स्वातंत्र्य नियंत्रित करण्याचे स्वातंत्र्य धर्माला देते. धर्मनिरपेक्षतेची ही कल्पना प्रतिगामी कल्पना आहे. धर्मनिरपेक्षतेची दुसरी कल्पना अशी आहे की, राजसत्तेला धर्माबाबत उदासीन राहायला लावते. सगळ्याच धर्माबाबत समान आदर, समान प्रतिष्ठा आणि कोणत्याच धर्मकार्यात हस्तक्षेप न करण्याचे धोरण हे या धर्मनिरपेक्षतेचे स्वरूप आहे. ज्या राज्यात एकाच धर्माची प्रजा तिथे वरील धर्मनिरपेक्षतेचे स्वरूप आणि ज्या राज्यात भिन्नधर्मीय लोक राहतात तिथे हे दुसर्‍या प्रकारचे स्वरूप. म्हणजे पहिल्याचीच थोडीशी सुधारित आवृत्ती. धर्मनिरपेक्षतेची तिसरी कल्पना या दोहोंहून निराळी असते. राजसत्ता ही धर्म व्यवस्थेची शत्रूच असते. धर्म ही मागास संस्था असल्याने तिचा पाडाव करणे, हेच यात अपेक्षित असते. धर्माचा नाश करणे हे या कल्पनेत अंतर्भूत आहे. ही कल्पना व्यक्ती आणि विचारस्वातंत्र्याच्या विरोधी जाणारीही कल्पना आहे आणि आता धर्मनिरपेक्षतेची चौथी कल्पना. भारतीय संविधानाने स्वीकारलेली कल्पना आहे. [३]

भारतीय घटनेच्या २५व्या कलमाने धर्मनिरपेक्षतेचा अर्थ स्पष्ट केला आहे.

भारतातील कोणत्याही व्यक्तीला त्याला योग्य वाटणाऱ्या उपासनेचा, धर्मपालनाचा, पारलौकिक कल्याणाचा, आध्यात्मिक उन्नतीचा पूर्ण अधिकार आहे
वरील अधिकारात धर्माच्या नावावर सरकार हस्तक्षेप करणार नाही तसेच मदत व विरोधही करणार नाही.
सामाजिक व राजकीय जीवनात व्यक्ती-व्यक्तीमध्ये धर्माच्या नावाने भेदभाव केला जाणार नाही. 
उत्तर लिहिले · 29/7/2021
कर्म · 121765
0

धर्मनिरपेक्षता म्हणजे कोणत्याही एका धर्माला राष्ट्र धर्म मानण्याऐवजी सर्व धर्मांना समान मानणे आणि धार्मिक आधारावर कोणताही भेदभाव न करणे.

थोडक्यात, धर्मनिरपेक्षता म्हणजे:

  • धर्मांपासून राजकारण वेगळे ठेवणे: सरकार कोणत्याही एका धर्माच्या नियमांनुसार चालवले जात नाही.
  • सर्व धर्मांना समान वागणूक: कोणत्याही नागरिकांवर धर्मानुसार कोणताही अन्याय किंवा भेदभाव केला जात नाही.
  • धार्मिक स्वातंत्र्याचा आदर: प्रत्येक व्यक्तीला कोणताही धर्म निवडण्याचा, त्याचे पालन करण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा अधिकार असतो.

भारतीय संविधानात धर्मनिरपेक्षता हे एक महत्त्वाचे तत्त्व आहे. संविधानाच्या अनुसार, भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, जेथे सर्व नागरिक समान आहेत आणि त्यांना धार्मिक स्वातंत्र्य आहे.

अधिक माहितीसाठी, आपण हे दुवे पाहू शकता:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 5280

Related Questions

नरेंद्र मोदी यांचा जन्म केव्हा झाला?
दबाव गटाचे पाच प्रकार लिहा?
राज ठाकरे यांच्या रॅलींना मोठी गर्दी जमते, मग लोक त्यांना मत का देत नाहीत?
राज ठाकरे प्रत्येकाला आवडतात पण त्यांचा पक्ष निवडून का येतं नाही?
राज ठाकरे यांच्या सभेला मोठी गर्दी होते, पण लोक मनसेला मत का देत नाहीत?
काही नेत्यांच्या सभांना हजारोंची गर्दी होते, पण ते निवडणूक जिंकत नाहीत?
मराठी माणूस देशाचा पंतप्रधान का होऊ शकला नाही?