भारताचा इतिहास
                
                
                    बांधकाम
                
                
                    पेशवाई 
                
                
                    वास्तुकला
                
                
                    इतिहास
                
                
                    महाराष्ट्राचा इतिहास
                
            
            पुण्यातील शनिवार वाडा कोणी बांधला?
2 उत्तरे
        
            
                2
            
            answers
            
        पुण्यातील शनिवार वाडा कोणी बांधला?
            4
        
        
            Answer link
        
        पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
        
            0
        
        
            Answer link
        
        पुण्यातील शनिवार वाडा बाजीराव पेशवे यांनी बांधला.
इ.स. १७३० मध्ये या वाड्याचे बांधकाम सुरू झाले आणि इ.स. १७३२ मध्ये ते पूर्ण झाले.
शनिवार वाडा पेशवाईतील एक महत्त्वाचे केंद्र होते.