अध्यात्म भक्ती

भक्ती म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

भक्ती म्हणजे काय?

2
किती साधी सोपी सरळ व्याख्या आहे पहा...

भक्ती जेव्हा "अन्नात" शिरते तेव्हा तीला "प्रसाद" म्हणतात
आणि भक्ती जेव्हा "भुकेत" शिरते तेव्हा तीला "उपवास" असे म्हणतात

भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तीला "तीर्थ" म्हणतात
आणि भक्ती जेव्हा "प्रवासाला" निघते तेव्हा तीला "यात्रा" असे म्हणतात


भक्ती जर का "संगीतात" शिरली तर तीला "भजन / कीर्तन" म्हणतात
आणि हीच भक्ती जर का लोकसंगीतात शिरली तर तीला "भारूड" असे म्हणतात

भक्ती जेव्हा "माणसात" प्रकटते तेंव्हा "माणूसकी" निर्माण होत
आणि हीच भक्ती जर "घरात" शिरली तर त्या घराचे "मंदिर" होते

भक्ती जर का शांतपणे "मनाच्या गाभाऱ्यात" शिरली तर त्याला "ध्यान" म्हणतात
आणि भक्ती जर का "कृतीत" उतरली तर तिला "सेवा" असे म्हणतात
उत्तर लिहिले · 20/7/2021
कर्म · 121765
0

भक्ती म्हणजे प्रेम, श्रद्धा आणि समर्पण. हे एक भावनिक बंधन आहे जे भक्त आणि देव यांच्यात असते. भक्तीमध्ये, भक्त देवाला पूर्णपणे समर्पित असतो आणि त्याच्यावर प्रेम करतो.

भक्तीचे प्रकार:

  • सगुण भक्ती: या भक्तीमध्ये, भक्त देवाला रूप आणि आकार देतो आणि त्याची पूजा करतो.
  • निर्गुण भक्ती: या भक्तीमध्ये, भक्त देवाला निराकार मानतो आणि त्याची उपासना करतो.

भक्तीचे महत्त्व:

  • भक्तीमुळे मनःशांती मिळते.
  • भक्तीमुळे आत्मविश्वास वाढतो.
  • भक्तीमुळे जीवनाला अर्थ प्राप्त होतो.

टीप: भक्ती ही एक अत्यंत वैयक्तिक बाब आहे आणि ती प्रत्येकासाठी वेगळी असू शकते.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1580

Related Questions

निवृत्ती नाथ दिंडी शास्र?
वारकरी संप्रदायाचा आचारधर्म स्पष्ट करा?
मोक्षावर टीप लिहा?
विभूती ही नेहमीच प्रतिमारूप असते म्हणजे काय?
भगवान शंकर यांना भोळा सांब का म्हणतात?
माळकरी माणसाने नॉनव्हेज हॉटेल मध्ये जॉब करावा का?
आपल्याला गौतम बुद्ध आणि स्वामी विवेकानंद यांच्यात काय साम्य आढळते?