भूगोल
पृथ्वी
पृथ्वीची संरचना
पृथ्वीचे अतरंग किती व कोणत्या थरांपासून बनलेले असते त्याविषयी सविस्तर माहिती लिहा?
3 उत्तरे
3
answers
पृथ्वीचे अतरंग किती व कोणत्या थरांपासून बनलेले असते त्याविषयी सविस्तर माहिती लिहा?
1
Answer link
पृथ्वीचे अंतरंग
.


भूपृष्टापासून पृथ्वीच्या केंद्राचे अंतर ६३७१ कि.मी. आहे
पृथ्वीच्या अंतरंगाचे तीन भाग आहेत
१. शिलावरण :
२.प्रावरण :
३.गाभा :
शिलावरण
@ यालाच भूकवच असे म्हणतात
@ जाडी ४२ कि.मी.
@ २९ % जमीन व ७१ % पाणी
@ शीलावरणाचे दोन थर आहेत
१.वरण
२.भात
१.सियाल
२.सायमा.
भूपृष्ठापासून २९ कि मी खोलीवर सियाल थर असतो तर त्याच्यापासून खाली ४२ कि मी पर्यंत सायमा थर असतो . दोन्ही थरांचा तुलनात्मक अभ्यास खालील तक्त्याच्या सहाय्याने लक्षात ठेवता येईल.
सियाल सायमा
जाडी (कि मी मध्ये ) २९ १३
घनता (ग्राम /घन सेमी ) २.६५ ते २.७७ २.८५ ते ३.३
'p' भूकंप लहरींचा वेग (कि मी /सेकंद) ५.६ ६ ते ७.२
's' भूकंप लहरींचा वेग (कि मी /सेकंद) ३.२ ३ ते 4
प्रावरण /मध्यावरण
पृथ्वीच्या एकूण घनफळ पैकी ८३ % घनफळ व वस्तुमानापैकी ६८ % वस्तुमान प्रावरणाने व्यापले आहे. या थराची जाडी २८६५ कि मी आहे
प्रावरणाचे दोन भाग आहेत
१. बाह्य प्रावरण
२.आंत प्रावरण
#बाह्य प्रावरण
-जाडी : भूपृष्ठापासून ४२ कि मी ते ७०० कि मी दरम्यान
-या आवरणाला मंद्गामी तरंगाचे शंकू म्हणतात
-शिलारसच्या उत्पत्तीशी हे आवरण संबंधित
- पृथ्वीवर समस्थायी उपयोजन घडवून येण्यास कारणीभूत
#आंत प्रावरण
-जाडी : भूपृष्ठापासून ७००कि मी ते २८९० कि मी दरम्यान
- सिलिका द्रव्ये व विविध ऑक्साइड सापडतात
गाभा
-भूपृष्ठापासून अंतरंगात २८९० किमी पासून ते ६३७१ कि मी पर्यंत पृथ्वीचा गाभा आहे
-गाभ्यात निकेल आणि लोह असते
-निकेल व लोह यांचे प्रमाण ८०:२०आहे
-पृथ्वीच्या एकून घनफळ पैकी १६ % घनफळ व एकूण वस्तुमानापैकी ३२ % वस्तुमान गाभ्याने व्यापले आहे
-गाभ्याची सरासरी घनता प्रावरणा च्या सरासरी घनतेच्या दुप्पट आहे.
-पृथ्वीच्या केंद्रावर तापमान २००० अंश सेल्सिअस असते तर दाब ३५ लाख वातावरणाच्या दाबा इतका असतो
-पृथ्वीच्या अंतर्भागात दर१०० मीटर खोलीवर तापमान ३ अंश सेल्सिअस ने वाढते
गाभ्याचे दोन भाग आहेत
१.बाह्य गाभा
२.आंतरिक गाभा
#बाह्य गाभा
@ अंतरंगात २८९० कि मी ते ५१५०कि मी पर्यंत
@ द्रवरूप
@ 's' भूकंप लहरी जावू शकत नाही
@घनता : १० ग्राम /घन से मी
#आंतरिक गाभा
@अंतरंगात ५१५० किमी ते ६३७१ कि मी पर्यंत
@घन अवस्थेत
@घनता : १३.३ ते १३.६ ग्राम /घन से मी
विलगता
विलगता ज्या दोन थरांच्या दरम्यान आहेत ते थर इतर
कॉनरॉड विलगता सियाल व सायमा
मोहो विलगता भूकवच व प्रावरण 'p'भूकंप लहरींची गती एकदम कमी होते
गटेमबर्ग विलगता प्रावरण व गाभा
संक्रमण विभाग बाह्य गाभा व आंतरिक गाभा जाडी ४५० कि मी
सरावासाठी प्रश्न
१.पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो
अ.सियाल
ब.निफे
क.सायमा
ड.शिलावरण
२.पृथ्वीचे भूकवच आणि मध्यावरण यांच्या दरम्यान -------- हि विलगता आढळते
अ.मोहो
ब.गटेनबर्ग
क.भू भौतिक
ड.संक्रमण विभाग
0
Answer link
पृथ्वीचे अंतरंग अनेक थरांनी बनलेले आहे, जे खालीलप्रमाणे आहेत:
- भूपृष्ठ (Crust):
- हा पृथ्वीचा सर्वात बाहेरील थर आहे.
- भूपृष्ठाची जाडी सुमारे 5 ते 70 किलोमीटर असते.
- continental crust खंडीय भूपृष्ठ (30-70km जाड) आणि oceanic crust महासागरीय भूपृष्ठ (5-10km जाड) असे दोन प्रकार आहेत.
- हा थर सिलिका आणि ॲल्युमिनियमने बनलेला आहे, त्यामुळे याला सियाल (Sial) असेही म्हणतात.
- प्रावरण (Mantle):
- हा पृथ्वीचा सर्वात मोठा थर आहे, जो सुमारे 2900 किलोमीटर जाड आहे.
- हा थर मुख्यतः सिलिकॉन, ऑक्सिजन, मॅग्नेशियम आणि लोह यांपासून बनलेला आहे.
- प्रावरणाचे दोन भाग आहेत: उच्च प्रावरण (upper mantle) आणि निम्न प्रावरण (lower mantle).
- उच्च प्रावरणाचा भाग अर्ध-द्रव स्थितीत असतो, ज्याला ॲस्थेनोस्फियर (Asthenosphere) म्हणतात. याच भागावर भूखंड तरंगतात.
- गाभा (Core):
- हा पृथ्वीचा सर्वात आतील थर आहे.
- गाभ्याची जाडी सुमारे 3500 किलोमीटर आहे.
- हा थर लोह आणि निकेल या धातूंनी बनलेला आहे, त्यामुळे याला निफे (Nife) असेही म्हणतात.
- गाभ्याचे दोन भाग आहेत: बाह्य गाभा (outer core) आणि अंतरिक गाभा (inner core).
- बाह्य गाभा द्रव स्थितीत आहे, तर अंतरिक गाभा घन स्थितीत आहे.
पृथ्वीच्या अंतरंगाची रचना समजून घेण्यासाठी भूकंपाच्या लहरींचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: