Topic icon

पृथ्वीची संरचना

0
पृथ्वीचे अंतरंग अनेक थरांनी बनलेले आहे. भूकंपाच्या लाटांच्या अभ्यासानुसार पृथ्वीच्या अंतरंगाचे मुख्य तीन भाग पडतात: भूकवच (Crust), प्रावरण (Mantle) आणि गाभा (Core).
  1. भूकवच (Crust): हा पृथ्वीचा सर्वात बाहेरील थर आहे. याची जाडी सर्व ठिकाणी सारखी नसते. खंडीय भूकवचाची जाडी सुमारे 30 ते 50 किलोमीटर असते, तर महासागरीय भूकवचाची जाडी 5 ते 10 किलोमीटर असते. भूकवच सिलिका आणि ॲल्युमिनियम या खनिजांनी बनलेले आहे, त्यामुळे याला 'सियाल' (Sial) असेही म्हणतात. महासागरीय भूकवच सिलिका आणि मॅग्नेशियमने बनलेले असल्यामुळे याला 'सायमा' (Sima) म्हणतात.
  2. प्रावरण (Mantle): भूकवचाच्या खाली प्रावरणाचा थर आहे. हा थर सुमारे 2900 किलोमीटर जाड आहे. प्रावरणाचे दोन उपभाग आहेत:
    • उच्च प्रावरण (Upper Mantle): हा भाग अर्ध-द्रव स्थितीत आहे, ज्याला दुर्बलावरण (Asthenosphere) म्हणतात.
    • निम्न प्रावरण (Lower Mantle): हा भाग घन स्थितीत असून उच्च दाबाखाली आहे.
  3. गाभा (Core): पृथ्वीच्या केंद्रभागी गाभा आहे. याची जाडी सुमारे 3500 किलोमीटर आहे. गाभ्याचे दोन भाग आहेत:
    • बाह्य गाभा (Outer Core): हा भाग द्रवरूप असून लोह आणि निकेल या धातूंनी बनलेला आहे.
    • आंतर गाभा (Inner Core): हा भाग घन असून लोह आणि निकेलच्या मिश्रणाने बनलेला आहे. प्रचंड दाबामुळे तो घन स्थितीत आहे.
पृथ्वीच्या अंतरंगाची रचना:
विकिपीडिया
उत्तर लिहिले · 12/6/2025
कर्म · 1420
0
< div > पृथ्वीचे अंतरंग अनेक थरांनी बनलेले आहे. भूगर्भशास्त्रज्ञांनी भूकंपाच्या लाटांच्या अभ्यासावरून पृथ्वीच्या अंतरंगाची रचना निश्चित केली आहे. पृथ्वीच्या अंतरंगाचे मुख्य थर खालीलप्रमाणे आहेत: < br > < br > < ol > < li > भूकवच (Crust): हा पृथ्वीचा सर्वात बाहेरील थर आहे. याची जाडी सुमारे 30 ते 100 किलोमीटर असते. भूकवचाचे दोन भाग आहेत: सियाल (Silica and Aluminum) व सायमा (Silica and Magnesium). < /li > < li > प्रावरण (Mantle): हा भूकवचाच्या खाली असलेला थर असून सुमारे 2900 किलोमीटर जाड आहे. प्रावरणाचे उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण असे दोन उपभाग आहेत. हा थर शिलारसाने बनलेला आहे. < /li > < li > गाभा (Core): हा पृथ्वीचा सर्वात आतील थर आहे. याची जाडी सुमारे 3500 किलोमीटर आहे. गाभ्याचे बाह्य गाभा आणि अंतर गाभा असे दोन भाग आहेत. बाह्य गाभा द्रवरूप असून अंतर गाभा घनरूप आहे. हा थर लोह आणि निकेल या धातूंनी बनलेला आहे. < /li > < /ol > < p > हे थर एकमेकांपेक्षा घनता आणि रासायनिक गुणधर्मांमध्ये भिन्न आहेत. < /p > < /div >
उत्तर लिहिले · 12/6/2025
कर्म · 1420
1
ठदफलफ
उत्तर लिहिले · 10/8/2022
कर्म · 20
0
पृथ्वीच्या अंतरंगातील भूकवच प्रावरण आणि गावा या प्रमुख तीन थरांत भिन्नता आहे . पृथ्वीच्या अंतरंगात खंडीय कवच व महा सागरी कवच ii)भूकवच व प्रावरण iii )उच्च प्रावरण व निम्न प्रावरण iv)प्रावरण व गाभा v )बाह्यगाभा व अंतर्गाभा यांना एकमेकांपासून विलग करणारे संक्रमण थर आहेत अशाप्रकारे पृथ्वीच्या अंतरंगात विलगता आढळते .

१ ) पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागांतील पदार्थांची घनता वेगवेगळी आहे . २ ) पृथ्वीच्या अंतरंगाच्या गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे. दुरुस्त विधान - पृथ्वीच्या अंतरंगाच्या गाभा प्रामुख्याने लोह आणि काही प्रमाणात निकेल या मूलद्रव्य पासून बनलेला आहे . ३ )बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाही
उत्तर लिहिले · 21/6/2022
कर्म · 53710
0
खंडीय कवच आणि महासागरीय कवच
उत्तर लिहिले · 18/6/2022
कर्म · 0
0

पृथ्वीच्या अंतरंगाची आकृती आणि त्यातील घटक:

पृथ्वीचा अंतरंग

भूपृष्ठ (Crust): हा पृथ्वीचा सर्वात बाहेरील भाग आहे. याची जाडी सुमारे 5 ते 70 किलोमीटर असते.

  • Continental Crust: हा भाग खंडीय भूपृष्ठाचा आहे जो सिलिका आणि ॲल्युमिनियमने बनलेला आहे.
  • Oceanic Crust: हा भाग महासागरीय भूपृष्ठाचा आहे जो सिलिका आणि मॅग्नेशियमने बनलेला आहे.

mantle: हा पृथ्वीचा सर्वात मोठा भाग आहे जो सुमारे 2900 किलोमीटर जाड आहे. हा भाग सिलिकेट खनिजांनी बनलेला आहे.

  • Upper Mantle: या भागातPartial Melting Zone असतो.
  • Lower Mantle: हा भाग घन स्वरूपात असतो.

Core: हा पृथ्वीचा सर्वात आतील भाग आहे.

  • Outer Core: हा भाग द्रवरूप (liquid) लोखंड आणि निकेलने बनलेला आहे.
  • Inner Core: हा भाग घन (solid) लोखंड आणि निकेलने बनलेला आहे.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1420
1
पृथ्वीचे अंतरंग.
            भूपृष्टापासून पृथ्वीच्या केंद्राचे अंतर ६३७१ कि.मी. आहे




                          पृथ्वीच्या अंतरंगाचे तीन भाग आहेत
१. शिलावरण :
२.प्रावरण :
३.गाभा :

शिलावरण 
 
 @ यालाच भूकवच असे म्हणतात
@ जाडी ४२ कि.मी.
@ २९ % जमीन व ७१ % पाणी





@ शीलावरणाचे दोन थर आहेत
१.वरण
२.भात 

१.सियाल
२.सायमा.
                  भूपृष्ठापासून २९ कि मी खोलीवर सियाल थर असतो तर त्याच्यापासून खाली ४२ कि मी पर्यंत सायमा थर असतो . दोन्ही थरांचा तुलनात्मक अभ्यास खालील तक्त्याच्या सहाय्याने लक्षात ठेवता येईल.



सियाल सायमा
जाडी (कि मी मध्ये ) २९ १३
घनता (ग्राम /घन सेमी ) २.६५ ते २.७७ २.८५ ते ३.३
'p' भूकंप लहरींचा वेग (कि मी /सेकंद) ५.६ ६ ते ७.२
's' भूकंप लहरींचा वेग (कि मी /सेकंद) ३.२ ३ ते 4

प्रावरण /मध्यावरण 
             
             पृथ्वीच्या एकूण घनफळ पैकी ८३ % घनफळ व वस्तुमानापैकी ६८ % वस्तुमान प्रावरणाने व्यापले आहे. या थराची जाडी २८६५ कि मी आहे

           प्रावरणाचे दोन भाग आहेत
१. बाह्य प्रावरण
२.आंत प्रावरण


#बाह्य प्रावरण
    -जाडी : भूपृष्ठापासून ४२ कि मी ते ७०० कि मी दरम्यान
    -या आवरणाला मंद्गामी तरंगाचे शंकू म्हणतात
    -शिलारसच्या उत्पत्तीशी हे आवरण संबंधित
    - पृथ्वीवर समस्थायी उपयोजन घडवून येण्यास कारणीभूत


#आंत प्रावरण
  -जाडी : भूपृष्ठापासून ७००कि मी ते २८९० कि मी दरम्यान
 - सिलिका द्रव्ये व विविध ऑक्साइड सापडतात

गाभा 
 

 -भूपृष्ठापासून अंतरंगात २८९० किमी पासून ते ६३७१ कि मी पर्यंत पृथ्वीचा गाभा आहे
-गाभ्यात निकेल आणि लोह असते
-निकेल व लोह यांचे प्रमाण ८०:२०आहे
-पृथ्वीच्या एकून घनफळ पैकी १६ % घनफळ व एकूण वस्तुमानापैकी ३२ % वस्तुमान गाभ्याने व्यापले आहे
-गाभ्याची सरासरी घनता प्रावरणा च्या सरासरी घनतेच्या दुप्पट आहे.
-पृथ्वीच्या केंद्रावर तापमान २००० अंश सेल्सिअस असते तर दाब ३५ लाख वातावरणाच्या दाबा इतका असतो
-पृथ्वीच्या अंतर्भागात दर१०० मीटर खोलीवर तापमान ३ अंश सेल्सिअस ने वाढते


गाभ्याचे दोन भाग आहेत
१.बाह्य गाभा
२.आंतरिक गाभा


#बाह्य गाभा
@ अंतरंगात २८९० कि मी ते ५१५०कि मी पर्यंत
@ द्रवरूप
@ 's' भूकंप लहरी जावू शकत नाही
@घनता : १० ग्राम /घन से मी


#आंतरिक गाभा
@अंतरंगात ५१५० किमी ते ६३७१ कि मी पर्यंत
@घन अवस्थेत
@घनता : १३.३ ते १३.६ ग्राम /घन से मी







विलगता



विलगता ज्या दोन थरांच्या दरम्यान आहेत ते थर इतर
कॉनरॉड विलगता सियाल व सायमा 
मोहो विलगता भूकवच व प्रावरण 'p'भूकंप लहरींची गती एकदम कमी होते
गटेमबर्ग विलगता प्रावरण व गाभा 
संक्रमण विभाग बाह्य गाभा व आंतरिक गाभा जाडी ४५० कि मी





सरावासाठी प्रश्न 


१.पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो
अ.सियाल
ब.निफे
क.सायमा
ड.शिलावरण


२.पृथ्वीचे भूकवच आणि मध्यावरण यांच्या दरम्यान -------- हि विलगता आढळते
अ.मोहो
ब.गटेनबर्ग
क.भू भौतिक
ड.संक्रमण विभाग

उत्तर लिहिले · 17/7/2021
कर्म · 121765