2 उत्तरे
2 answers

आपल्या मूलभूत गरजा काय आहेत?

6
अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन माणसाच्या मूलभूत गरजा आहेत.

याव्यतिरिक्त माझ्यामते, शिक्षण ही सुद्धा माणसाची मूलभूत गरज आहे. परंतु शिक्षणासाठी द्रव्य (पैसा) आणि पैशांसाठी रोजगार ही महत्त्वाची बाब आहे. एकंदरीत मला एवढेच म्हणायचे आहे की रोजगार आहे म्हणून पैसा आहे आणि पैसा आहे म्हणून अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण आहे. म्हणून पैसा आणि रोजगार या दोन गोष्टी सुद्धा माझ्यामते आधुनिक युगात माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. बरेचजण म्हणतील इंटरनेट हे सुद्धा माणसाची मूलभूत गरज आहे. परंतु इंटरनेट, मोबाईल आणि कम्प्युटर या गोष्टी सुद्धा कुठेना कुठे पैशांची जोडल्या गेल्या आहेत. म्हणून माणसाच्या मुलभूत गरजांमध्ये  पैशाला (द्रव्य) मी वर ठेवले आहे. मी फक्त या आधुनिक युगाची गोष्ट करत आहे. तुम्हाला काय वाटते कृपया उत्तर लिहा किंवा कमेंट करा.



उत्तर लिहिले · 12/7/2021
कर्म · 44255
0

माणसाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा (Food, clothing, and shelter) ह्या आहेत.

अन्न:

अन्नामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीर निरोगी राहते.

Reference: आहाराचे महत्त्व

वस्त्र:

वस्त्र आपल्याला थंडी, वारा आणि ऊन यांपासून वाचवते.

निवारा:

निवारा म्हणजे राहण्यासाठी सुरक्षित जागा. हे आपल्याला धोकादायक हवामानापासून आणि इतर धोक्यांपासून वाचवते.

Reference: Shelter Definition

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1760

Related Questions

एक लाख रुपये कशामध्ये गुंतवणूक केल्यास फायदेशीर ठरेल?
विश्वकर्मा योजनेच्या परीक्षेत्रात येणारे प्रश्न उत्तर कोणते व कशा प्रकारे विचारले जातात?
जल जीवन मिशनच्या इस्टिमेटनुसार कामे कशी असतात?
गाय, म्हैस, शेळी, बकरी जर खूप कमी झाले तर भारत देशाला फरक पडेल का?
६ लाख रुपये bhetle आहेत FD kru ki काय करू?
पैमास काय असतो?
सोने घेणे किती फायद्याचे असते?