Topic icon

मूलभूत गरजा

0


जगण्यासाठी काय लागते

अतिशय सोपा वाटणारा प्रश्न असला तरीही खरंच जगण्यासाठी काय लागते प्रश्न सारखा असला तरी प्रत्येकाचे उत्तर वेगळे असू शकते.
काही जणांच्या मते मुबलक पैसा जगण्यासाठी पुरेसा आहे तर काही जणांसाठी प्रेम हे अतिशय वर आहे.
अर्थातच पैशामुळे भरपूर असाध्य गोष्टी साध्य करून घेता येतात पण लोक विसरतात पैसा म्हणजे सर्वस्व नाही. पैशाने फक्त सुखसुविधा विकत घेता येतात, आनंद तर आपल्या आतच असावा लागतो.
लहानपणी आपण शाळेत शिकलेले आहोत की, माणसाला जगण्यासाठी हवा म्हणजेच ऑक्सिजन वायू लागतो. पुढे जाऊन कळते की फक्त ऑक्सिजन वायू पुरेसा नाही पाणी तर आवश्यक आहे. त्याच्यावर म्हणजे अन्न वस्त्र निवारा मानवाच्या मूलभूत गरजा.
काही जणांना वाटू शकते की स्वाभिमान हाही तितकाच गरजेचा आहे जगण्यासाठी .स्वाभिमानाने विना जगणे म्हणजे मेल्याहून कठीण आहे.
पण मला वाटते की जगण्यासाठी आवश्यक आहे तीव्र इच्छाशक्ती तिच्या जोरावर आपण वर दिलेले सर्व काही मिळवू शकतो.
जर जगण्याची इच्छाच नसेल तर सोन्याच्या ताटातला घास सुद्धा कडू लागू शकतो.
आपली इच्छा असेल तर कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेता येतं,आणि आहे त्यात समाधान मानून उज्वल भविष्यासाठी तयारी करता येते. रस्त्याच्या कडेला झोपडीत राहणारे‌ सुद्धा आनंदात दिसतात त्याउलट कार मधला एसी बंद पडला म्हणून चेहऱ्यावर चित्रविचित्र भाव आणणारे लोक आहेत या जगात.
"जीत हो या हार, हमें खेलने में मजा आना चाहीए."
तसंच आहे या जीवनाचं भले तुम्ही झोपडीत राहा की बंगल्यामध्ये काय फरक पडतो. पंचतंत्र मध्यली एक छोटीशी गोष्ट आठवते.
'दोन बेडूक ताकाच्या भांड्यांमध्ये पडतात, दोघेही बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न करतात, थोड्या वेळानंतर एक बेडूक जगण्याची आशा सोडून देतो आणि त्या भांड्यात तो उड्या मारणे सोडून देतो त्याउलट दुसरा बेडूक न थांबता उड्या मारत राहतो काही वेळाने भांड्यांमध्ये लोणी जमा होते त्यावर बसून आरामात बाहेर येतो तर दुसरा बेडूक त्यात बुडून मरतो.
मला त्या लोकांबद्दल खूप आदर वाटतो जे सकाळी उठून जगण्यासाठी संघर्ष करतात ते संघर्षाला कधीही घाबरत नाहीत. कारण इथली रीत आहे जो घाबरला तो संपला.
शेवटी काय मला एवढेच म्हणायचे जगण्यासाठी तीव्र इच्छाशक्ती लागते तिला कधीही मरू देऊ नका म्हणजे तुम्ही जिवंत रहाल, तुमचा संघर्ष जिवंत राहिलं.

उत्तर लिहिले · 26/12/2022
कर्म · 53750
0
गरजांचे वर्गीकरण 
गरजांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येते.

आर्थिक आणि अर्थिकेत्तर गरजा 
ज्या गरजांची पूर्तता पैशांच्या साहाय्याने केली जाते त्यांना आर्थिक गरजा असे म्हणतात.वेयक्तिकरित्या त्यांचा मोबदला पैशांच्या स्वरूपात दिला जातो.उदा. अन्न,औषध इत्यादी.
ज्या गरजा पैशाशिवाय पूर्ण करता येतात त्या म्हणजे आर्थिकेत्तर गरजा होय.उदा.हवा,सूर्यप्रकाश इत्यादी.
वैयक्तिक गरजा आणि सामुहिक गरजा संपादन करा
ज्या गरजा वेयक्तिक पातळीवर पूर्ण केल्या जातात त्यांना वैयक्तिक गरजा असे म्हणतात.
 गरजा


- (१) गरजा अमर्यादित असतात :

गरजा कधीही न संपणाऱ्या असतात. एका गरजेची पूर्तता करीत असतानाच दुसरी गरज

निर्माण होते. (३) गरजा वयानुसार बदलतात :

गरजा व्यक्तीच्या वयोमानानुसार बदलतात. उद खेळणी, गोष्टींची पुस्तके इत्यादी लहान मुलाच्य गरजा असतात; तर संगणक, संदर्भपुस्तके इत्यादी मोठ्या वयाच्या व्यक्तीच्या गरजा असतात..

(४) गरजा लिंगभेदानुसार बदलतात:

स्त्रिया व पुरुष यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. उदा., साडी, पर्सेस इत्यादी स्त्रियांच्या गरजा असतात. शर्ट, बॅग्ज् इत्यादी पुरुषांच्या

गरजा असतात.

(५) गरजा पसंतीक्रमानुसार बदलतात : प्रत्येक व्यक्तीच्या सवयी व आवडीनिवडी

वेगवेगळे असतात. म्हणजेच व्यक्तीच्या पसंतीनुसार गरजा बदलत जातात.(५) गरजा पसंतीक्रमानुसार बदलतात :

प्रत्येक व्यक्तीच्या सवयी व आवडीनिवडी वेगवेगळे असतात. म्हणजेच व्यक्तीच्या पसंतीनुसार गरजा बदलत जातात.

(६) गरजा हवामानानुसार बदलतात :

हवामानानुसार, ऋतूनुसार देखील गरजा बदलत जातात. उदा. उन्हाळ्यात सुती कपड्यांची गरज निर्माण होते, तर हिवाळ्यात लोकरी कपड्यांची गरज निर्माण होते.

(७) गरजा संस्कृतीनुसार बदलतात :

गरजांवर संस्कृतीचाही प्रभाव पडतो. उदा., खाद्यपदार्थं, कपड्यांच्या गरजा संस्कृतीनुसार



१) सर्वच गरजा एकाच वेळी पूर्ण होत असतात.

कारणे: (१) मानवी गरजा अमर्याद असतात व गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असणारी साधने मर्यादित असतात. (२) गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असणारी साधने मर्यादित असल्यामुळे काही गरजा पूर्ण होतात, तर काही गरजा पूर्ण होत नाहीत. (३) उदा. उपलब्ध उत्पन्नातून विजयने दूरदर्शन संच विकत घेतला व त्याच्याजवळील क्रयशक्ती (पैसे) संपली असता, त्याच वेळी त्याला दुचाकी वाहन विकत घेता येत नाही. त्यामुळे सर्वच गरजा एकाच वेळी पूर्ण होत नाहीत.नाहीत.

२) मानवी गरजा ह्या हवामान व पसंतीक्रमानुसार बदलत असतात. उत्तर:- या विधानाशी मी सहमत आहे.

कारणे : (१) गरजांवर हवामान, ऋतू, सवयी, आवडीनिवडी, पसंती इत्यादी घटकांचा मोठा प्रभाव पडतो. (२) हवामानातील बदलांनुसार गरजा बदलतात. उदा. उन्हा सुती कपड्यांची गरज निर्माण होते, तर हिवाळ्यात लोकरी कपड्यांची गरज निर्माण होते. (३) आवडीनिवडी, पसंती यांनुसार गरजांच्या बाबतीत व्यक्तींमध्ये भिन्नता आढळते. उदा., कार्यालयात नोकरी करणाऱ्या व्यक्तीस शर्ट-पँट इत्यादी औपचारिक पोशाखाची गरज असते; पाउलट, महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीस टी-शर्ट, जीन्स इत्यादी अनौपचारिक/ प्रासंगिक पोशाखाची गरज असते. मानवी गरजा या हवामानानुसार व पसंतीक्रमानुसार बदलत असतात. म्हणुन,
उत्तर लिहिले · 8/12/2022
कर्म · 53750
0

नाही, माणसाच्या सर्व गरजा एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाहीत. ह्याची काही कारणे:

  • गरजांची सापेक्षता: माणसाच्या गरजा या सापेक्ष असतात. एका व्यक्तीची गरज दुसऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळी असू शकते.
  • गरजांची तीव्रता: काही गरजा तीव्र स्वरूपाच्या असतात, ज्या त्वरित पूर्ण करणे आवश्यक असते, तर काही गरजा दुय्यम स्वरूपाच्या असतात.
  • साधनांची उपलब्धता: गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारी साधने मर्यादित असू शकतात. त्यामुळे, सर्व गरजा एकाच वेळी पूर्ण करणे शक्य होत नाही.
  • गरजांमधील बदल: माणसाच्या गरजा वेळेनुसार बदलत असतात. त्यामुळे, एका क्षणी पूर्ण झालेल्या गरजा दुसऱ्या क्षणी पुन्हा निर्माण होऊ शकतात.
  • आर्थिक आणि सामाजिक घटक: आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक संदर्भानुसार गरजा बदलतात. त्यामुळे, गरजा पूर्ण करण्याची प्राथमिकता बदलते.

उदाहरणार्थ, Maslow's hierarchy of needs नुसार, माणसाच्या गरजा श्रेणीबद्ध असतात. शारीरिक गरजा (physiological needs) प्रथम पूर्ण झाल्यावर सुरक्षा (safety), सामाजिक गरजा (social needs), आदर (esteem) आणि आत्म-साक्षात्कार (self-actualization) या गरजा निर्माण होतात. त्यामुळे, एकाच वेळी सर्व गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत.
अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: Maslow's Hierarchy of Needs

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 3480
0

माणसाच्या मूलभूत गरजा खालीलप्रमाणे:

  1. अन्न: जगण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळवण्यासाठी अन्न आवश्यक आहे.
  2. वस्त्र: हवामानापासून आणि सामाजिक गरजेनुसार संरक्षण करण्यासाठी वस्त्र आवश्यक आहे.
  3. निवारा: राहण्यासाठी सुरक्षित जागा, जी हवामान आणि इतर धोक्यांपासून बचाव करते.
  4. पाणी: पिण्यासाठी आणि इतर कामांसाठी शुद्ध पाणी आवश्यक आहे.
  5. शिक्षण: ज्ञान आणि कौशल्ये प्राप्त करण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे.
  6. आरोग्य: निरोगी जीवन जगण्यासाठी चांगली आरोग्य सेवा आवश्यक आहे.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 3480
0

माणसाला त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक लोकांची मदत घ्यावी लागते. त्यापैकी काही प्रमुख लोकांची माहिती खालीलप्रमाणे आहे:

  • कुटुंब (Family):

    आई-वडील, भाऊ-बहीण हे आपल्या अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण यांसारख्या गरजा पूर्ण करतात.

  • शिक्षक (Teachers):

    शिक्षक आपल्याला ज्ञान देतात आणि चांगले भविष्य घडवण्यासाठी मार्गदर्शन करतात.

  • डॉक्टर (Doctors):

    डॉक्टर आपल्याला आरोग्य सेवा पुरवतात आणि आजारांपासून वाचवतात.

  • शेतकरी (Farmers):

    शेतकरी आपल्यासाठी अन्न पिकवतात, त्यामुळे आपली अन्नाची गरज पूर्ण होते.

    शेतकरी - ब्रिटानिका

  • दुकानदार (Shopkeepers):

    दुकानदार आपल्याला गरजेच्या वस्तू पुरवतात.

  • व्यावसायिक आणि कामगार (Professionals and Workers):

    विविध व्यावसायिक आणि कामगार त्यांच्या कामातून आपल्याला सेवा पुरवतात, जसे की वीज पुरवणारे, पाणी पुरवणारे, वाहतूक करणारे इत्यादी.

  • सरकार (Government):

    सरकार आपल्याला शिक्षण, आरोग्य, सुरक्षा आणि इतर आवश्यक सेवा पुरवते.

    भारत सरकार

या व्यतिरिक्त, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक लोक अप्रत्यक्षपणे मदत करतात. त्यामुळे आपण सर्वांचे आभारी असले पाहिजे.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 3480
0

माणसाला त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक लोकांची मदत घ्यावी लागते. या गरजांमध्ये अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य यांचा समावेश होतो.

अन्न:
  • शेतकरी: शेतकरी अन्नधान्य पिकवतात.
  • व्यापारी: व्यापारी शेतमालाची खरेदी-विक्री करतात.
  • दुकानदार: दुकानदार आपल्याला किराणा सामान पुरवतात.
वस्त्र:
  • कापूस उत्पादक: कापूस उत्पादक कापूस पिकवतात.
  • textile industry: textile industry मध्ये कापड तयार होते.
  • शिंपी: शिंपी कपडे शिवतात.
  • दुकानदार: दुकानदार आपल्याला कपडे पुरवतात.
निवारा:
  • बांधकाम कामगार: बांधकाम कामगार घरे बांधतात.
  • इंजिनियर: इंजिनियर घराचा नकाशा बनवतात.
  • मिस्त्री: मिस्त्री बांधकाम करतात.
  • गवंडी: गवंडी विटांचे बांधकाम करतात.
शिक्षण:
  • शिक्षक: शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान देतात.
  • शाळा: शाळा शिक्षणासाठी महत्त्वाची आहे.
  • पुस्तक विक्रेते: पुस्तक विक्रेते आपल्याला पुस्तके पुरवतात.
आरोग्य:
  • डॉक्टर: डॉक्टर आपल्याला तपासतात आणि औषधोपचार करतात.
  • नर्स: नर्स डॉक्टरांना मदत करतात.
  • मेडिकल स्टोअर: मेडिकल स्टोअर आपल्याला औषधे पुरवतात.

या व्यतिरिक्त, पाणीपुरवठा करणारे, वीजपुरवठा करणारे, स्वच्छता कर्मचारी, वाहतूक कर्मचारी आणि इतर अनेक लोक आपल्याला अप्रत्यक्षपणे मदत करतात.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 3480
0
शुद्ध हवा, पिण्यासाठी स्वच्छ वाहणारे पाणी, आणि खाण्यासाठी झाडावर पिकलेली ताजी फळे.
उत्तर लिहिले · 20/4/2022
कर्म · 810