2 उत्तरे
2
answers
जगण्यासाठी काय लागते?
0
Answer link
जगण्यासाठी काय लागते
अतिशय सोपा वाटणारा प्रश्न असला तरीही खरंच जगण्यासाठी काय लागते प्रश्न सारखा असला तरी प्रत्येकाचे उत्तर वेगळे असू शकते.
काही जणांच्या मते मुबलक पैसा जगण्यासाठी पुरेसा आहे तर काही जणांसाठी प्रेम हे अतिशय वर आहे.
अर्थातच पैशामुळे भरपूर असाध्य गोष्टी साध्य करून घेता येतात पण लोक विसरतात पैसा म्हणजे सर्वस्व नाही. पैशाने फक्त सुखसुविधा विकत घेता येतात, आनंद तर आपल्या आतच असावा लागतो.
लहानपणी आपण शाळेत शिकलेले आहोत की, माणसाला जगण्यासाठी हवा म्हणजेच ऑक्सिजन वायू लागतो. पुढे जाऊन कळते की फक्त ऑक्सिजन वायू पुरेसा नाही पाणी तर आवश्यक आहे. त्याच्यावर म्हणजे अन्न वस्त्र निवारा मानवाच्या मूलभूत गरजा.
काही जणांना वाटू शकते की स्वाभिमान हाही तितकाच गरजेचा आहे जगण्यासाठी .स्वाभिमानाने विना जगणे म्हणजे मेल्याहून कठीण आहे.
पण मला वाटते की जगण्यासाठी आवश्यक आहे तीव्र इच्छाशक्ती तिच्या जोरावर आपण वर दिलेले सर्व काही मिळवू शकतो.
जर जगण्याची इच्छाच नसेल तर सोन्याच्या ताटातला घास सुद्धा कडू लागू शकतो.
आपली इच्छा असेल तर कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेता येतं,आणि आहे त्यात समाधान मानून उज्वल भविष्यासाठी तयारी करता येते. रस्त्याच्या कडेला झोपडीत राहणारे सुद्धा आनंदात दिसतात त्याउलट कार मधला एसी बंद पडला म्हणून चेहऱ्यावर चित्रविचित्र भाव आणणारे लोक आहेत या जगात.
"जीत हो या हार, हमें खेलने में मजा आना चाहीए."
तसंच आहे या जीवनाचं भले तुम्ही झोपडीत राहा की बंगल्यामध्ये काय फरक पडतो. पंचतंत्र मध्यली एक छोटीशी गोष्ट आठवते.
'दोन बेडूक ताकाच्या भांड्यांमध्ये पडतात, दोघेही बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न करतात, थोड्या वेळानंतर एक बेडूक जगण्याची आशा सोडून देतो आणि त्या भांड्यात तो उड्या मारणे सोडून देतो त्याउलट दुसरा बेडूक न थांबता उड्या मारत राहतो काही वेळाने भांड्यांमध्ये लोणी जमा होते त्यावर बसून आरामात बाहेर येतो तर दुसरा बेडूक त्यात बुडून मरतो.
मला त्या लोकांबद्दल खूप आदर वाटतो जे सकाळी उठून जगण्यासाठी संघर्ष करतात ते संघर्षाला कधीही घाबरत नाहीत. कारण इथली रीत आहे जो घाबरला तो संपला.
शेवटी काय मला एवढेच म्हणायचे जगण्यासाठी तीव्र इच्छाशक्ती लागते तिला कधीही मरू देऊ नका म्हणजे तुम्ही जिवंत रहाल, तुमचा संघर्ष जिवंत राहिलं.
0
Answer link
जगण्यासाठी अनेक गोष्टी आवश्यक आहेत, त्यापैकी काही मूलभूत गोष्टी खालीलप्रमाणे आहेत:
-
पाणी:
शरीराच्या कार्यांसाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे.
-
अन्न:
शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी आणि वाढीसाठी पौष्टिक अन्न आवश्यक आहे.
-
हवा:
श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा आवश्यक आहे.
-
निवारा:
unfavorable हवामानापासून आणि धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी सुरक्षित निवारा आवश्यक आहे.
-
वस्त्र:
शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आणि संरक्षणासाठी वस्त्र आवश्यक आहे.
-
आरोग्य सेवा:
आजारी पडल्यास उपचार आणि आरोग्य सेवा मिळणे आवश्यक आहे.
-
शिक्षण:
ज्ञान आणि कौशल्ये मिळवण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे.
-
सामाजिक संबंध:
मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी मित्र आणि कुटुंबासोबत चांगले संबंध असणे आवश्यक आहे.
-
सुरक्षितता:
धोक्यांपासून संरक्षण आणि सुरक्षित वातावरण आवश्यक आहे.