शब्दाचा अर्थ भूगोल शब्द हवामान

आपल्याकडील मुख्य ऋतूंची नावे काय?

3 उत्तरे
3 answers

आपल्याकडील मुख्य ऋतूंची नावे काय?

4
संकल्पना

ऋतू या शब्दाची व्याख्या- सौरं मासद्वयं राम ऋतुरित्यभिधीयते | हे रामा,सौर मासद्वयाला ऋतू असे म्हणतात असे पुरुषार्थ चिन्तामणि ग्रंथात सांगिले आहे. ऋतू हे सूर्याच्या गतीवर अवलंबून असतात .सध्या आपण चैत्र-वैशाख=वसंत ऋतू अशी गणना करीत असलो तरी ऋतू हे चंद्रमासावर अवलंबून नसून ते सौरमासावर म्हणजे सूर्य संक्रांतीवर अवलंबून असतात.





प्राचीन साहित्यात

मुखं वा एतत् ऋतूनां यद् वसन्त:-वसंत हे ऋतूंचे मुख होय असे तैत्तिरीय ब्राह्मण या ग्रंथात सांगितले आहे.गीतेमध्ये ऋत्तूनां कुसुमाकर:(ऋतूंमध्ये मी वसंत आहे) असे श्रीकृष्ण म्हणतात.


तैत्तिरीय ब्राह्मण या ग्रंथात सांगितले आहे की तस्य ते वसन्त: शिर:| ग्रीष्मो दक्षिण: पक्ष:| वर्षा: पुच्छम्|शरद उत्तर: पक्ष:| हेमन्तो मध्यम्| म्हणजे वसंत हे संवत्सररूपी पक्ष्याचे मस्तक, ग्रीष्म उजवा पंख, वर्षा हे शेपूट, शरद डावा पंख, व हेमंत मध्य होय.


वर्षातल्या तीन ऋतूंच्या प्रारंभी तीन यज्ञ करण्याची बुद्धपूर्व भारतीयांची चाल होती. पुढे बुद्धाने थोडासा फरक करून तीच कल्पना स्वीकारली. वर्षाचे विविध हंगाम अशा अर्थी ऋतू हा शब्द ऋग्वेदात आला आहे पण तिथे तीनच ऋतूंचा उल्लेख आढळतो. चार महिन्यांचा एक ऋतू अशी त्यांची योजना आहे. वसंत, ग्रीष्म, शरद हे ते तीन ऋतू होत. [२] महाकवी कालिदासाचे ऋतुसंहार हे संस्कृत काव्य प्रसिद्ध आहे.
सहा ऋतू व त्यांचे प्रचलित मान्यता असलेले चांद्र महिनेसंपादन करा


सहा ऋतूचीं माहिती :-

- वसंत : चैत्र, वैशाख. (उन्हाळा)

- ग्रीष्म : ज्येष्ठ, आषाढ. (उन्हाळा)

- वर्षा : श्रावण, भाद्रपद. (पावसाळा)

- शरद : आश्विन, कार्तिक. (पावसाळा)

- हेमंत : मार्गशीर्ष, पौष. (हिवाळा)

- शिशिर : माघ, फाल्गुन. (हिवाळा)


महिने आणि ऋतू यांच्या समीकरणातून विविध सण आणि व्रते भारतीय परंपरेत साजरी केली जातात.

वसंत ऋतूत गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, बुद्ध पौर्णिमा ,वसंत पंचमी ही व्रते साजरी होतात.

ग्रीष्म ऋतूत वटपौर्णिमा, आषाढी एकादशी अशी व्रते येतात.

वर्षा ऋतूत नारळी पौर्णमा, रक्षाबंधन, हरितालिका, गणेश चतुर्थी अशी व्रते केली जातात.

शरद ऋतूत देवीचे शारदीय नवरात्र, कोजागिरी पौर्णिमा, दीपावली असे सण येतात.

हेमंत ऋतूत मार्गशीर्ष गुरुवार व्रत, दत्त जयंती ,मकर संक्रांती अशी व्रते केली जातात.

शिशिर ऋतूत माघी गणेश जयंती, होळी, रंगपंचमी असे सण व व्रते केली जातात.


ऋतू हा हवामानावर आधारलेला असलेला वर्षाचा ढोबळपणे बनवलेला भाग आहे.

प्रदेशागणिक हवामानबदलामुळे ऋतूंची नेमकी संख्या बदलते. ही विभागणी मुख्यतः तापमान आणि पाऊस या घटकांवर आधारित आहे. परंतु प्रदेशागणिक हे घटकदेखील बदलतात. उदा. उष्ण कटिबंधातील लोक फक्त तापमानाच्या आधारावर ऋतू ठरवतात, कारण तेथे पाऊस वर्षभर पडत असतो. समशीतोष्ण कटिबंध दोन किंवा तीन ऋतू मानतो तर शीत कटिबंध प्रदेशांमध्ये केवळ दोनच ऋतू असतात. मात्र भारतामधील वर्ष तीन मुख्य ऋतूंमध्ये विभागले गेले आहे: उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा, तर उपऋतू सहा - वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर.

उत्तर लिहिले · 12/7/2021
कर्म · 44255
1
आपल्याकडे मुख्य ऋतूंची नावे पुढीलप्रमाणे: उन्हाळा, पावसाळा, हिवाळा
उत्तर लिहिले · 12/7/2021
कर्म · 30
0

भारतात मुख्यत्वे करून खालील ऋतू आढळतात:

  • उन्हाळा (Summer): हा साधारणपणे मार्च ते मे या काळात असतो.
  • पावसाळा (Monsoon/Rainy): हा जून ते सप्टेंबर या काळात असतो.
  • हिवाळा (Winter): हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात असतो.
  • शरद ऋतू (Autumn): हा ऑक्टोबर महिन्यात असतो, जो पावसाळ्यानंतर आणि हिवाळ्याच्या आधी येतो.
  • वसंत ऋतू (Spring): हा फेब्रुवारीच्या उत्तरार्धात सुरू होतो आणि मार्चपर्यंत असतो.

प्रत्येक ऋतूचे নিজস্ব महत्व आहे आणि त्यानुसार वातावरणात बदल जाणवतात.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1040

Related Questions

पाणलोट क्षेत्र कोणत्या विभागात येते?
खरेदी प्रमाणे माझी जागा पण उत्तर ते दक्षिण?
महाराष्ट्रातील घाट व त्यांची माहिती?
गाव हे समुद्राचा भाग आहे का?
पूर्व युरोपातील अनेक देश सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली होते का?
कोकणाचा कुठला भाग शेतीसाठी उत्तम आहे?
शहर अजिंक्यताराच्या पायथ्याशी वसलेले आहे?