फोन आणि सिम पासवर्ड मोबाईल सुरक्षा तंत्रज्ञान

मोबाईल मध्ये लपलेले पासवर्ड कसे शोधावे?

2 उत्तरे
2 answers

मोबाईल मध्ये लपलेले पासवर्ड कसे शोधावे?

2
इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटस्चा वापर दिवसेंदिवस वाढतच आहे. परंतु, या वापरामध्ये सर्वात महत्त्वाची आणि तितकीच अवघड गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीचा पासवर्ड लक्षात ठेवणे. काही काही लोक इतके विसरभोळे असतात की त्यांना स्वत:ची जन्मतारीखही लक्षात राहत नाही. परंतु, अलीकडे अनेक उपकरणांमध्ये पासवर्ड मॅनजेर्सची सुविधा उपलब्ध असते. हा पासवर्ड मॅनेजर्स तुमच्या सर्व पासवर्डना ट्रॅक करतो. त्यामुळे आपणाला अनेकदा थेट साईन इन करता येते. जर तुमच्याकडे अँड्राईड मोबाईल असेल आणि तो तुमच्या गुगल अकाऊंटला लिंक असेल तर याचा स्वत:चा पासवर्ड मॅनेजर आहे, जो गुगल क्रोम अ‍ॅपमध्ये वापरण्यात येणार्‍या तुमच्या सर्व पासवर्डला ट्रॅक करतो; पण तुमच्या अँड्राईड फोनमध्ये कोण कोणते पासवर्ड दडलेले आहेत, ते कसे पाहायचे आणि आवश्यकता वाटल्यास कसे डिलिट करायचे ते बघुया. अँड्रॉईड फोनवर गुगल क्रोम ब्राऊजर सुरू करा. त्याच्या उजव्या बाजूला सर्वात वरील बाजूस असणार्‍या उभ्या तीन डॉटवर (काही फोनमध्ये हे तीन डॉटस् बॉटम कॉर्ननवर सुद्धा असू शकतात) क्‍लिक करा.माहिती सेवा ग्रूप पेठवडगांवची पोस्ट,त्यानंतर पॉप अप मेन्यू सेटिंग्जला टॅप करा. आता तुम्हाला नेक्ट मेन्यूमध्ये पासवर्डवर क्‍लिक करावे लागेल. येथे तुम्हाला तुमचा पासवर्ड किंवा फिंगर टच स्कॅन करावे लागेल. यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटची एक यादी दिसेल. त्यामध्ये युजरनेम आणि पासवर्ड सेव्ह असतील. ज्या साईटचा पासवर्ड तुम्हाला बघायचा आहे, त्याच्यावर टॅप करा आणि डोळ्याच्या चित्रावर टॅप करा. तुम्हाला तुमचा पासवर्ड तत्काळ दिसेल. हा पासवर्ड तुम्ही कॉपी करू शकता, अथवा डिलिटही करू शकता. डिलिट करण्यासाठी ट्रॅश आयकॉनचा वापर करावा.
हे पासवर्ड तुम्ही नक्की शोधून काढाल.
_____________________________
*_🦚 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव 🦚_*  
*✆ 9890875498*
_____________________________
*🏛 घरीच रहा, सुरक्षित रहा ....*
-----------------------------------------------

0

तुमच्या मोबाईलमध्ये लपलेले पासवर्ड शोधण्यासाठी तुम्ही खालील उपाय करू शकता:

1. गुगल पासवर्ड व्यवस्थापक (Google Password Manager):
  • तुमच्या Android फोनवर, सेटिंग्ज अॅप उघडा.
  • "गुगल" -> "तुमचे Google खाते व्यवस्थापित करा" -> "सुरक्षा" वर टॅप करा.
  • "इतर मार्गांनी तुमच्या खात्यात साइन इन करा" अंतर्गत, "पासवर्ड व्यवस्थापक" वर टॅप करा.
  • तुम्ही येथे सेव्ह केलेले पासवर्ड पाहू शकता.

अधिक माहितीसाठी हे पहा.

2. क्रोम (Chrome):
  • क्रोम उघडा.
  • वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन डॉट्सवर क्लिक करा आणि "सेटिंग्ज" निवडा.
  • "पासवर्ड" वर क्लिक करा.
  • तुम्ही सेव्ह केलेले पासवर्ड पाहू शकता.

अधिक माहितीसाठी हे पहा.

3. थर्ड-पार्टी पासवर्ड व्यवस्थापक (Third-Party Password Manager):
  • LastPass, 1Password, Bitwarden सारखे पासवर्ड व्यवस्थापक वापरा.
  • हे ॲप्स तुमच्या पासवर्ड्स सुरक्षित ठेवतात आणि तुम्हाला ते पाहण्याची सोय देतात.
4. फोन सेटिंग्ज (Phone Settings):
  • काही फोनमध्ये, तुम्ही सेटिंग्जमध्ये सेव्ह केलेले पासवर्ड पाहू शकता.
  • सेटिंग्ज -> सुरक्षा -> पासवर्ड किंवा क्रेडेन्शियल्स (Credentials) मध्ये जा.

सुरक्षिततेसाठी, अनोळखी किंवा असुरक्षित ॲप्स वापरणे टाळा.

टीप: पासवर्ड पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा फोन अनलॉक करण्याची आवश्यकता असू शकते.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 2220

Related Questions

आपला मोबाईल हॅक झाला आहे ते कसे ओळखावे?
मोबाईल ट्रॅकिंग कसे करतात?
माझ्याकडे जिओ फोन आहे. व्हॉट्सॲप कोणीतरी हॅक केले आहे, असे वाटते. कारण कोणत्यातरी ग्रुपवर मला ॲड केले आणि त्या ग्रुपचे नाव इमोजी स्वरूपात होते. मोबाईलवरील कॉन्टॅक्ट ॲड होऊन बाहेर पडत होते. ते कॉन्टॅक्ट खूपच लांबचे लोक ॲड होत होते. मला काहीच कळेना हा कोणता प्रकार आहे. तरी मला काय झाले असेल हे समजेल?
मोबाईल चोरीचा आहे हे कसे ओळखावे? IMEI नंबर कसा पडताळावा?
माझ्या मोबाईलवर काही आरोग्य विषयक कंपन्यांची जाहिरात टेक्स्ट मेसेज मध्ये येत आहे, ती कशी बंद करता येतील?
माझा फोन हरवला आहे. आधार कार्डसाठी नवीन नंबर देण्यासाठी काय करू? कारण पीएफचा ओटीपी हरवलेल्या फोनवर जाईल, तर काय करू?
एखाद्या मोबाईलला असलेला टेक्स्ट मेसेज बॉक्समधील मेसेज दुसऱ्या मोबाईलला दिसतात का? दिसत असतील तर ते बंद कसे करावे?