फोन आणि सिम मोबाईल सुरक्षा तंत्रज्ञान

मोबाईल चोरीचा आहे हे कसे ओळखावे? IMEI नंबर कसा पडताळावा?

2 उत्तरे
2 answers

मोबाईल चोरीचा आहे हे कसे ओळखावे? IMEI नंबर कसा पडताळावा?

1
मोबाईल चोरी हा जसा गुन्हा आहे तसा चोरीचा फोन खरेदी करणे हा सुद्धा गुन्हा आहे. त्यामुळे तुम्ही खरेदी करणार असाल तो फोन चोरीचा नाही याची खात्री करून घ्यायला हवी. फोन चोरीचा नाही किंवा त्यांच्या आयएमईआय नंबर मध्ये काही गडबड केली गेलेली नाही हे तपासण्यासाठी एक ट्रिक वापरता येते.

💁‍♀️ *अशी करा खात्री:*

▪️तुम्ही खरेदी करणार असलेल्या फोनचा आयएमईआय नंबर प्रथम माहिती करून घेतला पाहिजे.
▪️त्यासाठी *#06# असे डायल करावे.
▪️त्यानंतर स्क्रीनवर नंबर दिसेल, ड्युअल सीम असेल तर दोन नंबर दिसतील.
▪️त्यातील कुठलाही एक नंबर लिहून घ्या आणि आता टेक्स्ट मेसेज पाठविण्यासाठी मेसेज आयकॉन क्लिक करून KYM टाईप करा आणि हा मेसेज 14422 या नंबरवर पाठवून द्या.
▪️त्यानंतर तुम्हाला एक उलट मेसेज येईल त्यात फोनचे डीटेल्स असतील.
▪️आयएमईआय नंबर असेल तसेच उत्पादकाचे नाव, ब्रांड नाव, फोन मॉडेल नंबर असेल.
▪️हे सर्व डीटेल्स मॅच होत असतील तर आयएमईआय नंबर बरोबर आहे असे समजावे आणि असा फोन खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा.
▪️या ऐवजी मेसेज मध्ये invalid/black-listed/already in use/duplicate असे दिसत असेल तर फोन खरेदी करण्याचा धोका स्वीकारू नये.

जर मोबाईल कोणत्याही प्रकारची फसवणूक नसेल तर
उदा;
IMEI: 868130032211118
Manufacturer: Xiaomi Communications Co Ltd
Bands: LTE FDD BAND 1,LTE FDD BAND 3,LTE FDD BAND 5,LTE TDD BAND 40,LTE TDD BAND 41,GSM850 (GSM800),GSM 900,GSM 1800,GSM 1900,2.4-2.5 GHz,WCDMA FDD Band 1,WCMI
Brand: MI
Model: M1804D2SI

असा मेसेज प्राप्त होईल.

____________________________________
*🤳🌐आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_

https://bit.ly/34kRwdy
उत्तर लिहिले · 6/10/2020
कर्म · 569245
0

मोबाईल चोरीचा आहे हे ओळखण्यासाठी काही गोष्टी तपासणे आवश्यक आहे:

  1. IMEI नंबर तपासा: प्रत्येक मोबाईल फोनला एक युनिक IMEI (International Mobile Equipment Identity) नंबर असतो. हा नंबर वापरून तुम्ही तो फोन चोरीचा आहे की नाही हे तपासू शकता.
  2. बिल तपासा: मोबाईल खरेदी करताना तुम्हाला बिल देण्यात येते. ते बिल व्यवस्थित तपासा.
  3. किंमत तपासा: जर मोबाईलची किंमत बाजारात असलेल्या किंमतीपेक्षा खूपच कमी असेल, तर तो चोरीचा असण्याची शक्यता आहे.
  4. विक्रेत्याची माहिती: विक्रेत्याची माहिती घ्या आणि तो खात्रीशीर आहे का ते तपासा.

IMEI नंबर कसा पडताळावा:

  1. IMEI नंबर मिळवा:
    • तुमच्या फोनवर *#06# डायल करा.
    • फोनच्या सेटिंग्जमध्ये 'अबाउट फोन' (About Phone) मध्ये IMEI नंबर शोधा.
    • फोनच्या बॉक्सवर किंवा बिलवर IMEI नंबर असतो.
  2. IMEI नंबर पडताळण्यासाठी वेबसाइट्स:
    • CEIR (Central Equipment Identity Register): भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications) हे पोर्टल सुरू केले आहे. यावर तुम्ही IMEI नंबर टाकून मोबाईल हरवलेला आहे की नाही हे तपासू शकता. CEIR
    • IMEI.info: या वेबसाइटवर तुम्ही IMEI नंबर टाकून तुमच्या फोनची माहिती मिळवू शकता. IMEI.info

याव्यतिरिक्त, तुम्ही सायबर क्राईम सेलमध्ये (Cyber Crime Cell) तक्रार दाखल करू शकता आणि त्यांना IMEI नंबर देऊ शकता. ते तुम्हाला अधिक माहिती देऊ शकतील.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 2220

Related Questions

आपला मोबाईल हॅक झाला आहे ते कसे ओळखावे?
मोबाईल मध्ये लपलेले पासवर्ड कसे शोधावे?
मोबाईल ट्रॅकिंग कसे करतात?
माझ्याकडे जिओ फोन आहे. व्हॉट्सॲप कोणीतरी हॅक केले आहे, असे वाटते. कारण कोणत्यातरी ग्रुपवर मला ॲड केले आणि त्या ग्रुपचे नाव इमोजी स्वरूपात होते. मोबाईलवरील कॉन्टॅक्ट ॲड होऊन बाहेर पडत होते. ते कॉन्टॅक्ट खूपच लांबचे लोक ॲड होत होते. मला काहीच कळेना हा कोणता प्रकार आहे. तरी मला काय झाले असेल हे समजेल?
माझ्या मोबाईलवर काही आरोग्य विषयक कंपन्यांची जाहिरात टेक्स्ट मेसेज मध्ये येत आहे, ती कशी बंद करता येतील?
माझा फोन हरवला आहे. आधार कार्डसाठी नवीन नंबर देण्यासाठी काय करू? कारण पीएफचा ओटीपी हरवलेल्या फोनवर जाईल, तर काय करू?
एखाद्या मोबाईलला असलेला टेक्स्ट मेसेज बॉक्समधील मेसेज दुसऱ्या मोबाईलला दिसतात का? दिसत असतील तर ते बंद कसे करावे?