इंग्रजी भाषा इंग्रजी वाक्यरचना संक्षिप्त रूप तंत्रज्ञान

इंग्रजीमध्ये १ हजाराचा उल्लेख 1k असा का करतात?

2 उत्तरे
2 answers

इंग्रजीमध्ये १ हजाराचा उल्लेख 1k असा का करतात?

1
आपण बरयाच वेळा पाहिले असेल की इंग्रजी मध्ये १००० ला one thousand (वन थाऊजंड) म्हणत असुन देखील लिहिताना १ हजाराचे संक्षिप्त रूप म्हणुन "1k" असा करतात.आपण मराठी मध्ये १००० ला एक हजारच म्हणतो, आपण मराठी माणस देखील बऱ्याच वेळा बोलण्याच्या किंवा लिहिण्याच्या ओघात 2k, 5k, 10k असा उल्लेख करतो.तर तुमच्याही मनात कधीना कधी हा प्रश्न आला असेलच की इंग्रजी मध्ये हजार म्हणजे Thousand म्हणजे ‘T’ हे अक्षर वापरायला हवे…मग ‘K’ हे अक्षर वापरण्याचे कारण ते काय?
*🌀काय आहे कारण? 🌀*
खरतरं K हे अक्षर आठ अक्षरी Thousand या शब्दाच्या बदल्यात वापरात आले. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे की हा बदल ग्रीक काळामध्ये घडला, म्हणजे अतिशय जुन्या काळात!आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,ग्रीकांच्या राज्यात हजाराला Thousand न म्हणता ‘chilioi’ म्हटले जायचे. Chilioi चा खरा अर्थ आहे- अनंत काळ, म्हणजेच पाहायला गेलं तर Chilioi चा शब्दश अर्थ ‘हजार’ असा होत नाही, पण त्या काळी ग्रीक हजार ही संख्या सर्वोच्च मानीत असतं, त्यामुळे त्यांनी अनंत काळा प्रमाणे अनंत संख्या या अनुषंगाने Chilioi हा शब्द Thousand साठी वापरण्यास सुरुवात केली.कालांतराने हा Chilioi शब्द फ्रेंचांनी घेतला आणि त्याचे संक्षिप्त रूप ‘Kilo’ असे केले. फ्रेंचांनी पुढे मेट्रिक सिस्टम सुरु केल्यावर त्यांनी kilo (किलो) म्हणजे १००० अशी नवीन संकल्पना अमलात आणली. या Kilo चा फ्रेंच्यांच्या दृष्टीने अर्थ होता हजारामधील वाढ! उदा. 10k म्हणजे – 10*1000 = 10,000. व्यापाराच्या निमित्ताने जगभर पसरलेल्या फ्रेंच व्यापाऱ्यांमुळे ही संकल्पना हळूहळू सगळीकडे पसरत गेली. त्यानंतर किलोलीटर, किलोग्राम आणि किलोटन सारख्या संज्ञा अस्तित्वात आल्या. याच कारणामुळे हजारसाठी संक्षिप्त शब्द म्हणून Kilo मधील K हा शब्द वापरण्याची प्रथा सुरु झाली.आधुनिक युगाच्या अर्थशास्त्रामध्ये देखील K चा वापर असाच सुरु ठेवण्यात आला.या बदलाचा लवकर अर्थबोध होत नसला तरी याचा इतिहास हा असा आहे.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498

0

इंग्रजीमध्ये 1 हजाराचा उल्लेख 1k असा करण्याचे कारण खालीलप्रमाणे आहे:

k म्हणजे किलो (Kilo):

  • 'किलो' हा शब्द ग्रीक शब्द 'khilioi' पासून आला आहे, ज्याचा अर्थ 'हजार' असा होतो.
  • SI युनिट्समध्ये (System International d'Unites), किलो हे एक उपसर्ग (prefix) आहे जे 1000 च्या गुणकाने दर्शवते.

संक्षेप (Abbreviation):

  • 'किलो' शब्दाचा संक्षेप 'k' असा वापरला जातो. त्यामुळे, 1000 दर्शवण्यासाठी 1k वापरणे हे सोपे आणि संक्षिप्त ठरते.
  • गणनेत आणि विज्ञानात 'k' चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

उदाहरणे:

  • 1 किलोग्राम (kilogram) = 1000 ग्रॅम
  • 1 किलोमीटर (kilometer) = 1000 मीटर
  • त्याचप्रमाणे, 1k म्हणजे 1000.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980

Related Questions

राम या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे?
ट्रेनचा फुल फॉर्म काय आहे?
A.F.S.P.A. याचे पूर्ण रूप कोणते आहे?
W.H.R. चे पूर्ण रूप लिहा?
बी. एम. सी. चा फुल फॉर्म काय आहे?
सार्कचे विस्तारित नाव लिहा?
फोमचा फुल फॉर्म काय आहे?