वेब होस्टिंग तंत्रज्ञान

वेब होस्टिंग काय आहे? आणि होस्टिंगचे प्रकार

2 उत्तरे
2 answers

वेब होस्टिंग काय आहे? आणि होस्टिंगचे प्रकार

1
जर तुम्ही वेबसाईट तयार करत असाल तर तुम्हाला डोमेन नेम व वेब होस्टिंग बद्दल संपूर्ण माहिती असणे खूप गरजेचे असते. म्हणून आम्ही वेब होस्टिंग म्हणजे काय व होस्टिंग चे प्रकार या बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. 

       

वेब होस्टिंग म्हणजे काय? | What is Web Hosting Meaning in Marathi
वेबसाईट चा डेटा आणि फाईली साठवून ठेवण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या सर्व्हर स्पेस ला किंवा जागेला वेब होस्टिंग असे म्हणतात. तसेच वेबसाईट ला इंटरनेट वर प्रकाशित करण्यासाठी किंवा वेबसाईट होस्ट करण्यासाठी होस्टिंग सेवेची खूप आवश्यकता असते.
वेबसाईट तयार करण्यासाठी डोमेन नेम आणि वेब होस्टिंग ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या असतात. तसेच वेब होस्टिंग खरेदी करण्यासाठी विविध प्रकारच्या होस्टिंग कंपन्या सेवा प्रदान करतात.

होस्टिंग चे प्रकार | Type of Hosting in Marathi

वेब होस्टिंग चे विविध प्रकार आहेत तुम्हाला कोणती होस्टिंग घ्यायची आहे हे तुमच्या वर अवलंबून आहे. काही महत्वाच्या होस्टिंग प्रकारा बद्दल पुढील प्रमाणे माहिती पाहूया.

  1. शेयर्ड होस्टिंग | Shared Hosting

शेयर्ड होस्टिंग मध्ये खूप साऱ्या वेबसाईट ला एकाच वेब सर्व्हर वर साठवून ठेवल्या जाते. यामध्ये वेबसाईट ला होस्ट करणे खूप सोपे असते, म्हणूनच नवीन ब्लॉगर किंवा बिगिनर्स या होस्टिंग सर्व्हर चा मोठ्या प्रमाणात वापर करतात.

तसेच सामायिक होस्टिंग सर्व्हर ची किंमत कमी असते व कमी रहदारी असणाऱ्या वेबसाईट साठी खुप उपयुक्त होस्टिंग असते.

  2. व्हीपीएस होस्टिंग | VPS Hosting

व्हीपीएस होस्टिंग मध्ये एका मोठ्या सर्व्हर मधील थोडासा भाग एका वेबसाईट साठी सर्व्हर स्पेस म्हणून दिल्या जातो. त्या सर्व्हर स्पेस वर केवळ वेबसाईट मालकाचा च अधिकार असतो. या सर्व्हर स्पेस मध्ये वेबसाईट च्या सर्व फाईली शेअर्ड होस्टिंग च्या तुलनेत जास्त सुरक्षित साठवून ठेवल्या जातात.

तसेच या होस्टिंग मध्ये प्रत्येक वेबसाईट साठी एक वेगळे सर्व्हर स्पेस असल्यामुळे या प्रकारच्या होस्टिंग मध्ये जास्त ट्रॅफिक आले तरीही वेबसाईट स्पीड वर काहीही परिणाम होत नाही.

  3. डेडिकेटेड होस्टिंग | Dedicated Hosting

डेडिकेटेड होस्टिंग मध्ये एक मोठे आणि शक्तिशाली सर्व्हर प्रदान केले जाते. यामध्ये प्रत्येक वेबसाईट साठी एक वेगवेगळे सर्व्हर उपलब्ध असते. या प्रकारच्या होस्टिंग मध्ये रहदारी हाताळण्याची शक्ती असते. एक विशिष्ट प्रकारचे सर्व्हर वेबसाईट साठी अव्हेलेबल असल्यामुळे या प्रकारच्या साईट खूप सेक्युर असते.

तसेच या प्रकारच्या होस्टिंग सर्व्हर मध्ये तुम्ही स्वतः होस्टिंग नियंत्रित करू शकता आणि त्याची सेटिंग सुद्धा बदलू शकता. म्हणूनच हि वेब होस्टिंग खूप महाग असते, आणि या होस्टिंग चा व्यवस्थापन खर्च सुद्धा खूप जास्त असतो.

  4. क्लाउड होस्टिंग | Cloud Hosting

क्लाउड होस्टिंग मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हर एकत्र मिळून सर्वात मोठे आणि शक्तिशाली सर्व्हर आपल्या वेबसाईट ला होस्ट करीत असते. हे होस्टिंग सर्व्हर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक हाताळण्यास सक्षम असते. म्हणूनच हे होस्टिंग सर्व्हर खूप लोकप्रिय आहे.

क्लाऊड होस्टिंग विकत घेण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो.

अश्या प्रकारे वेब होस्टिंग काय आहे? व होस्टिंग च्या प्रकार बाबत माहिती जाणून घेतली तुम्हाला नक्कीच हि माहिती समजली असेलच. तसेच वेब होस्टिंग व योग्य होस्टिंग पॅकेज कसे निवडावे याबद्दल माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

जर तुम्हाला अश्या च प्रकारची डिजिटल मार्केटिंग, इंटरनेट आणि नवनवीन टेकनॉलॉजि ची माहिती हवी असेल तर आमच्या मराठी स्पिरिट या वेबसाईट ला व्हिसिट करा.
उत्तर लिहिले · 16/4/2021
कर्म · 2195
0
मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी HTML मध्ये माहिती सादर करेन:

वेब होस्टिंग (Web Hosting) काय आहे?

वेब होस्टिंग म्हणजे तुमच्या वेबसाईटची (website) फाईल्स (files) आणि डेटा (data) एका खास संगणकावर (computer) साठवणे, जो इंटरनेटशी (internet) जोडलेला असतो. या संगणकाला वेब सर्व्हर (web server) म्हणतात. जेव्हा कोणी तुमच्या वेबसाईटला भेट देतो, तेव्हा त्यांचे ब्राउजर (browser) या वेब सर्व्हरकडून डेटा मागवते आणि त्यांना तुमची वेबसाईट दिसते.

वेब होस्टिंगचे प्रकार:

  1. शेअर्ड होस्टिंग (Shared Hosting):

    या प्रकारात, अनेक वेबसाईट एकाच सर्व्हरवर होस्ट केल्या जातात. त्यामुळे खर्च कमी असतो, पण सर्व्हरची संसाधने (resources) विभागली जातात.

  2. व्हीपीएस होस्टिंग (VPS Hosting):

    यामध्ये, एक फिजिकल सर्व्हर अनेक व्हर्च्युअल सर्व्हरमध्ये (virtual servers) विभागला जातो. प्रत्येक व्हर्च्युअल सर्व्हरला स्वतःचे समर्पित संसाधने मिळतात.

  3. डेडिकेटेड होस्टिंग (Dedicated Hosting):

    यामध्ये, संपूर्ण सर्व्हर फक्त तुमच्या वेबसाईटसाठी असतो. त्यामुळे तुम्हाला अधिक संसाधने आणि नियंत्रण मिळते, पण खर्च जास्त असतो.

  4. क्लाउड होस्टिंग (Cloud Hosting):

    यामध्ये, तुमची वेबसाईट अनेक सर्व्हरवर होस्ट केली जाते. त्यामुळे वेबसाईट डाउन होण्याची शक्यता कमी होते आणि मागणीनुसार संसाधने वाढवता येतात.

  5. वर्डप्रेस होस्टिंग (WordPress Hosting):

    हे खास वर्डप्रेस (WordPress) वेबसाईटसाठी तयार केलेले असते. यात वर्डप्रेससाठी अनुकूलित सर्व्हर्स आणि टूल्स (tools) असतात.

    अधिक माहितीसाठी हे पाहा

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 5120

Related Questions

डोमेन आणि होस्टिंग कोणत्या कंपनीकडून घ्यावी?
वेब होस्टिंग म्हणजे काय?
GoDaddy होस्टिंग पेक्षा Google Cloud होस्टिंग मॅनेज करण्यास सोपे आहे काय? ॲमेझॉन होस्टिंग कशी आहे? तुमच्या मते सर्वात चांगली होस्टिंग कोणती आहे? मला ब्लॉगरवरून वर्डप्रेसवर यायचं आहे.
ह्वाब्ज ने कोणत्या?
नमस्कार, ब्लॉगस्पॉटचा डेटा आपण वेबसाईटमध्ये मायग्रेट करू शकतो का? मला डोमेन आणि होस्टिंग खरेदी करावयाचे आहे, कृपया उचित मार्गदर्शन करावे ही विनंती.
वेबसाईटमध्ये होस्टिंग म्हणजे काय असते?
आपण वर्डप्रेस ब्लॉगसाठी एका वर्षासाठी डोमेन नाव आणि होस्टिंग सेवा विकत घेतली, परंतु एक वर्षानंतर त्यांनी आपल्या ब्लॉगला होस्टिंग सेवा पुरवली नाही, तर आपला ब्लॉग बंद होतो का?