3 उत्तरे
3
answers
कीवर्ड म्हणजे काय?
0
Answer link
जर तुम्हाला तुमच्या ब्लॉग ला सर्च इंजिन वर रँकिंग मिळवायची असेल तर तुम्हाला किवर्ड व किवर्ड रिसर्च बद्दल संपूर्ण माहिती असायला हवी.
आर्टिकल सोर्स :- https://www.marathispirit.com/keyword-research-in-marathi/
कीवर्ड (Keywords) म्हणजे काय? तर सर्च इंजिन कोणतीही माहिती सर्च करण्यासाठी आपण सर्च बॉक्स मध्ये काही शब्द किंवा वाक्य टाईप करतो त्यालाच कीवर्ड असे म्हटल्या जाते.

ब्लॉग तयार करायच्या वेळी आपल्याला योग्य प्रकारे किवर्ड रिसर्च करून त्या ब्लॉग मध्ये योग्य किवर्ड ऑप्टिमाइझ करणे खुप महत्वाचे असते.
किवर्ड चे प्रकार | Keyword Type in Marathi
तर चला आता आपण कीवर्ड च्या काही प्रकाराबद्दल माहिती पाहूया. किवर्ड हे विविध प्रकारचे असतात पण आपण काही महत्वाच्या किवर्ड च्या प्रकाराबद्दल माहिती जाणून घेऊया.
- शॉर्ट टेल किवर्ड | Short Tail Keywords
शॉर्ट टेल या नावावरूनच समजते कि या प्रकारचे किवर्ड हे शॉर्ट म्हणजेच लहान आणि दोन ते तीन शब्दांचे असतात. शॉर्ट टेल या किवर्ड ला सर्च इंजिन मध्ये खूप महत्वाचे मानले जाते आणि मोठ्या प्रमाणात सर्च केल्या जाते. तसेच या किवर्ड मध्ये जास्त प्रमाणात स्पर्धा बघायला मिळते.
2. लॉन्ग टेल किवर्ड | Long Tail Keywords
लॉन्ग टेल किवर्ड म्हणजेच लांब असलेले किवर्ड होय. या प्रकारचे किवर्ड हे तीन किंवा त्यापेक्षा अधिक शब्दाचे असू शकतात. या किवर्ड ला सर्च इंजिन मध्ये जास्त महत्व दिल्या जात नाही. म्हणूनच या किवर्ड मध्ये स्पर्धा नसतेच. तसेच या किवर्ड ला सर्च इंजिन मध्ये लवकर रँकिंग मिळू शकते.
3. LSI Keywords
जेव्हा सर्च इंजिन मध्ये किवर्ड सर्च केल्या जातो तेव्हा सर्च इंजिन आपल्याला सर्च केलेल्या किवर्ड च्या रिलेटेड किवर्ड Suggest करते त्याच किवर्ड ला Latent Semantic Indexing Keywords असे म्हणतात.
कीवर्ड रिसर्च कसे करावे | What is Keyword Research in Marathi
किवर्ड रिसर्च करताना कीवर्ड च्या समोर Monthly Searches याचा Volume आणि High, Medium आणि कमी स्पर्धा असलेले कीवर्ड दिसतात. मोठ मोठ्या वेबसाईट किंवा ब्लॉगिंग कंपन्या हे High Competition असलेले कीवर्ड वापरतात.
आपण जर नवीन असाल तर आपण कमी स्पर्धेची कीवर्ड वापरायला हवे. तसेच कीवर्ड वापरताना Long Tail Keyword चा वापर करायला हवा. कारण या किवर्ड ला स्पर्धा खूप कमी असते त्यामुळे या किवर्ड आपण सहज रँकिंग मिळवू शकतो.
टॉप कीवर्ड रिसर्च टूल्स | Top Keyword Research Tools
- Google Keyword Planner
- Ahref
- Ubersuggest
- Semrush
- Keyword tool
- Kwfinder
या कीवर्ड रिसर्च टूल्स चा वापर करून आपण आपल्या ब्लॉग साठी योग्य कीवर्ड शोधू शकतो.
0
Answer link
कीवर्ड (Keyword) म्हणजे काय?
कीवर्ड म्हणजे एक शब्द किंवा अनेक शब्दांचा समूह असतो, जो एखाद्या वेबपेज, जाहिरात किंवा ऑनलाइन कंटेंटमध्ये वापरला जातो.
कीवर्ड्सचे मुख्य उद्देश:
- सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO): वेबसाईटला सर्च इंजिनमध्ये (Google, Bing) उच्च स्थान मिळवण्यासाठी कीवर्ड्स महत्त्वाचे असतात.
- जाहिरात (Advertising): ऑनलाइन जाहिरातींमध्ये, योग्य दर्शकांना आकर्षित करण्यासाठी कीवर्ड्सचा वापर केला जातो.
- विषय ओळख: कीवर्ड्स वापरून, तुमचा लेख किंवा वेबपेज कशाबद्दल आहे हे स्पष्ट होते.
उदाहरण:
जर तुम्ही 'मुंबईतील पर्यटन स्थळे' याबद्दल माहिती शोधत असाल, तर 'मुंबई', 'पर्यटन', 'स्थळे' हे कीवर्ड्स वापरले जातात.
थोडक्यात, कीवर्ड्स हे ऑनलाइन जगात माहिती शोधण्यासाठी आणि देण्यासाठी महत्त्वाचे साधन आहेत.