कायदा हुंडाबंदी

हुंडा म्हणजे काय?

4 उत्तरे
4 answers

हुंडा म्हणजे काय?

2
हुंडा एक सामाजिक समस्या- Hunda Ek Samajik Samsya.


आज सकाळीच पेपर मध्ये बातमी छापून आली कीं एक उच्चशिक्षित सुशिक्षित मुलगी हुंडापद्धतीला बळी पडली. बातमी वाचली आणि काळजात धस्स झाले. एका सुशिक्षित आणि उच्चशिक्षित मुलीवर ही अशी वेळ यावीच का? चला विचार करूया.

हुंडा म्हणजेच नक्की काय?

हुंडा म्हणजेच एखाद्या मुलीच्या लग्नाच्यावेळी मुलीच्या घरच्या लोकांनी मुलगी सासरी जाताना तिच्या नवऱ्याला आणि त्याच्या घरच्या लोकांना दिलेल्या भेटवस्तू.

पूर्वीच्या काळी हुंडा सर्रास दिला आणि घेतला जात असे. आई वडील आपल्या मुलीला लग्नाच्या वेळी आंदण म्हणून गाय देत असत किंवा घरी लागणारी भांडी कुंडी त्याच बरोबर घरगुती वस्तू ही दिल्या जात असत. विशेष म्हणजेच सोने आणि दागदागिने ही आपापल्या ऐपतीनुसार दिले जात असे. हया ज्या गोष्टी मुली आपल्याबरोबर सासरी घेऊन येत असत त्यांना तिचे स्त्रीधन ही म्हंटले जात असे...


वरील निबंध संपूर्ण वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
उत्तर लिहिले · 17/4/2021
कर्म · 1100
0
  1. हुंडा म्हणजे  हुंडा ही लग्नाच्या वेळी मुलाकडून किंवा मुलीकडून विरुद्ध बाजूच्या कुटुंबाला देण्यात येणारी भेट आहे. ही भेट पैसे, मालमत्ता किंवा वस्तू सोने स्वरूपात घेतली जाते.
  2. हुंडा चा अर्थ आहे जी सम्पत्ति, लग्नाच्या वेळी वधूच्या कुटुंबा तर्फे वर ला दिली जाते. हुंडा ला उर्दू मध्ये जहेज़ म्हणतात
  3. १९६१ साली हुंडा प्रतिबंधक कायदा भारतात पारित करण्यात आला.
1-हुंडा म्हणजे लग्नात एका पक्षाकडून दुसर्या पक्षाला थेट अथवा अप्रत्यक्ष चीजवस्तू , स्थावर, जंगम मालमत्ता देणे अगर कबूल करणे.

2-लग्नात,लग्नापूर्वी अगर लग्नानंतर चीजवस्तू, स्थावर, जंगम मालमत्ता देण्याचे कबूल करणे म्हणजे हुंडा.

3- यामध्ये शरियत कायद्याअंतर्गत येणाऱ्या मेहेरचा समावेश नाही.

4- सदर कायद्याच्या कलम ३ नुसार हुंडा घेणाऱ्यास ५ वर्षें सक्त मजुरी आणि रु. १५०००/- पर्यंत दंडाची शिक्षा आहे.

5- हुंडा मागणे हा देखील गुन्हा असून त्यासाठी ६ महिने पर्यंतची कैद आणि रु. १००००/- दंडाची शिक्षा आहे. जर एकाद्या मुलीच्या लग्नाच्या सात वर्षाच्या आत असामान्य परिस्थिति मध्ये ती मरण पावली तर हे सिद्ध केले जाते की मरणा अगोदर तिला हुंड्यासाठी तिला प्रताड़ित केले जात होते. यात भारतीय दंड संहिता च्या कलम 304-बी च्या अन्तर्गत मुलीचा पती आणि नातेवाईक यांना कमीत कमी सात वर्ष ते आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते.
उत्तर लिहिले · 11/4/2021
कर्म · 110
0

हुंडा म्हणजे लग्नाच्या वेळी वधू पक्षाने वर पक्षाला दिलेली संपत्ती, पैसे किंवा वस्तू. ही प्रथा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे आणि आजही काही ठिकाणी ती अस्तित्वात आहे.

हुंडा मागणी करणे आणि देणे हे दोन्ही कायदेशीररित्या गुन्हा आहे. हुंडाबंदी कायदा 1961 नुसार हुंडा घेणे किंवा देणे हे दोन्ही कायदेशीर अपराध आहेत.

हुंड्याचे दुष्परिणाम:

  • स्त्रियांचा अपमान: हुंडा मागणी हे स्त्रियांचा अपमान आहे, कारण त्यांना वस्तू म्हणून गणले जाते.
  • आर्थिक भार: हुंडामुळे वधू पक्षावर मोठा आर्थिक भार येतो, ज्यामुळे ते कर्जबाजारी होऊ शकतात.
  • लैंगिक हिंसा: हुंडा न मिळाल्यास नववधूचा शारीरिक व मानसिक छळ केला जातो, काहीवेळा तिचा जीवही घेतला जातो.

हुंडा एक सामाजिक समस्या आहे, ज्याला विरोध करणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1080

Related Questions

भारतामध्ये हुंडा बंदी सुधारणा कायदा केव्हा अस्तित्वात आला?
भारतामध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा केव्हा अस्तित्वात आला?
हुंड्या वटवणे म्हणजे काय?