हुंडाबंदी
2
Answer link
हुंडा एक सामाजिक समस्या- Hunda Ek Samajik Samsya.
आज सकाळीच पेपर मध्ये बातमी छापून आली कीं एक उच्चशिक्षित सुशिक्षित मुलगी हुंडापद्धतीला बळी पडली. बातमी वाचली आणि काळजात धस्स झाले. एका सुशिक्षित आणि उच्चशिक्षित मुलीवर ही अशी वेळ यावीच का? चला विचार करूया.
हुंडा म्हणजेच नक्की काय?
हुंडा म्हणजेच एखाद्या मुलीच्या लग्नाच्यावेळी मुलीच्या घरच्या लोकांनी मुलगी सासरी जाताना तिच्या नवऱ्याला आणि त्याच्या घरच्या लोकांना दिलेल्या भेटवस्तू.
पूर्वीच्या काळी हुंडा सर्रास दिला आणि घेतला जात असे. आई वडील आपल्या मुलीला लग्नाच्या वेळी आंदण म्हणून गाय देत असत किंवा घरी लागणारी भांडी कुंडी त्याच बरोबर घरगुती वस्तू ही दिल्या जात असत. विशेष म्हणजेच सोने आणि दागदागिने ही आपापल्या ऐपतीनुसार दिले जात असे. हया ज्या गोष्टी मुली आपल्याबरोबर सासरी घेऊन येत असत त्यांना तिचे स्त्रीधन ही म्हंटले जात असे...
वरील निबंध संपूर्ण वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
6
Answer link
राज्यात १९६१ पासून हुंडा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आहे.
राज्यात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘हुंडाबंदी दिन’ म्हणून साजरा केला जात असून हुंडा देणे आणि घेणे हा कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला हुंडा प्रतिबंधक अधिकार्याची नियुक्ती, जिल्हा तसेच तालुकास्तरीय समित्यांची स्थापना या कायद्यांतर्गत करण्यात आली आहे. हे कायदे महिलांना माहित असायला पाहिजे. आणि पुढे येवून हुंडा मागणाऱ्या विरुद्ध तक्रार सबंधित यत्रनेकडे केली पाहिजे . हुंडा म्हणजे लग्नामध्ये मुलीला दिलेले सर्व वस्तू , चीजवस्तू , कपडे ,रोख पैसे ,सोने इत्यादी.

4
Answer link
ब्रिटिश सत्तेच्या मागोमाग हिंदुस्तानात अर्थव्यवहार करण्यासाठी बॅंका स्थापन होऊ लागल्या आणि त्यांच्या माध्यमातून एका स्थानावरून दुसरीकडे वा एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे पैसा पाठविण्यासाठी नवे साधन हिंदुस्तानात उपलब्ध झाले. तत्पूर्वी हिंदुस्तानातील दूरदूरच्या गावातील असे व्यवहार ’हुंडी’ ह्या गोष्टीच्या माध्यमातून होत असे.
हुंडीचे मूळ स्वरूप म्हणजे ’अ’ ह्या व्यक्तीने ’ब’ ह्या व्यक्तीला लिहिलेले पत्र, ज्यामध्ये ’क’ ह्या व्यक्तीला एक रक्कम देण्याचा आदेश असतो. हिंदुस्तानातील व्यापारी समाजाने निर्माण केलेली ही पद्धत कोठल्याहि कायद्यानुसार निर्माण झालेली नव्हती. बाजारपेठांमधील रीतिरिवाज आणि दूरदूरच्या व्यापारी पेढयांचा एकमेकांच्या पतीवरील विश्वास ह्यांवर हुंडीपद्धत अवलंबून होती. पुरेशा संख्येने बॅंकांच्या शाखा उपलब्ध नसल्याने १९व्या शतकाच्या अखेरीपर्यंत हिंदुस्तानी व्यापारीवर्ग पैशाच्या देवाणघेवाणीसाठी प्रामुख्याने हुंडीव्यवहारावर अवलंबून असे. तदनंतर तिचा संकोच होत जाऊन आता हा शब्द क्वचितच कानी पडतो. हुंडीचाच दुसरा प्रकार, ज्याला ’हवाला’ असे नाव आहे, तो मात्र जगभर पसरलेल्या भारतीय, पाकिस्तानी आणि अन्य आशियाई लोकांचा स्वदेशाकडे पैसे पाठविण्याचा आवडता मार्ग आहे. हवाल्याचा उपयोग काळा पैसा पांढरा करणे, अमली वस्तूंच्या विक्रीची किंमत चुकती करणे, दहशतवादी संघटनांना पैसा पुरविणे, विनिमय कायद्यांचे उल्लंघन करणे ह्यासाठीहि केला जाऊ शकत असल्याने जगभरच्या गुप्तहेर संघटना आणि पोलिस दले हवाल्याकडे संशयी नजरेने पाहतात आणि त्याचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करीत असतात. हुंडी पटवण्यासाठी म्हणजे ‘सकारण्या‘साठी पुढे आल्यावर लगेच द्यावयास हवेत. तसे न दिल्यास हुंडीधारकास त्या विलंबाचे व्याज मिळते. हुंडी शाहजोग आहे म्हणजे पेठेतील कोणी प्रतिष्ठित आणि पतदार व्यक्ति मध्यस्थ म्हणून उभे राहिल्यावरच तिचे पैसे धारकास मिळतात. हुंडी शाहजोग न करता धनीजोग (ज्याच्यापाशी हुंडी आहे अशा कोणासहि पैसे मिळतील), नामजोग (ज्याचे नाव हुंडीमध्ये आहे त्याला पैसे मिळतील), निशाजोग (ज्याच्या शरीरावर वर्णिलेल्या खुणा आहेत अशा व्यक्तीलाच पैसे मिळतील) अशा प्रकारची असू शकते. तसेच ती जोखमी हुंडी असू शकते. एक व्यापारी दुसर्याला काही माल पाठवतो आणि मालाच्या किंमतीच्या रकमेची हुंडी खरीददारावर लिहितो. माल कोठल्या वाहनाने येत आहे हेहि नोंदवतो. ही जोखमी हुंडी तो एका दलालाला विकतो आणि आणि दलाली वजा करून मालाची किंमत त्याला मिळून जाते. माल खरीददाराकडे पोहोचल्यावर दलाल त्याच्याकडे हुंडी पाठवून तिचे पैसे वसूल करतो. माल पोहोचेपर्यंत मालाचे पैसे चुकते करण्याची जबाबदारी खरीददारावर नाही. अशा रीतीने विकणारा आणि खरेदी करणारा ह्या दोघांचीहि मालवाहतुकीमधील जोखीम दलाल स्वीकारतो म्हणून ह्या हुंडीला जोखमी हुंडी म्हणतात. कधीकधी परक्या गावात गरजेप्रमाणे पैशाची उचल करता यावी म्हणून व्यापारी मूळ गावातून भलावणपत्र घेऊन येतो. ह्या पत्राच्या आधारे त्याला हवी ती रक्कम वेळोवेळी मिळते. भलावणपत्र लिहिणारा, ते जवळ बाळगणारा आणि पैसा देणारा आपल्याआपल्यामधील हिशेब नंतर पूर्ण करतात.
दर्शनीऐवजी हुंडी मुदती असू शकते म्हणजे तिचे पैसे हुंडी दाखविल्यानंतर विशिष्ट मुदतीनंतर मिळतात.