2 उत्तरे
2
answers
डोपिंग म्हणजे काय?
2
Answer link
डोपिंग काय प्रकार आहे.

डोपिंग प्रकरणात खेळाडू दोषी आढळल्यास 'त्या' खेळाडूचे तात्पुरते निलंबन करण्यात येते. मात्र, त्या खेळाडूला आपली बाजू मांडण्याची यावेळी परवानगी देण्यात येते. काही वेळा खेळाडूला स्पर्धेतून कायमचे बाद ठरवण्यात येऊ शकते. तर काही वेळा दोन ते पाच वर्षासाठी किंवा आजीवन बंदीही लागू करण्यात येऊ शकते. तसेच खेळाडूने जिंकलेली पदके या चाचणीत दोषी आढळल्यास काढून घेतली जातात.
खेळाडू उत्तेजक पदार्थाचे सेवन करुन स्नायूंची आमि मज्जातंतूची कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न करतात. याचे दूरगामी परिमान खेळाडूच्या आरोग्यावरही होते. यामुळे डोपिंगची चाचणी घेतली जाते. ही चाचणी वाडा (वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी) आणि नाडा (नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी ) या एजन्सी मार्फत होते
कशी होते डोपिंग चाचणी -
महत्वपूर्ण बाब म्हणजे, कुठल्याही खेळाडूंची डोपिंग चाचणी घेण्यात येऊ शकते. ती कुठल्याही स्पर्धेपूर्वी किंवा प्रशिक्षणादरम्यान घेतली जाऊ शकते. ही चाचणी ‘वाडा’ किंवा ‘नाडा’ कडून घेतली जाते. ही चाचणी खेळाडूचे रक्त आणि मूत्राचे नमुने घेऊन केली जाते. महत्वाचे म्हणजे, हे नमुने खेळाडूंसमोरच घेतले जातात आणि ते सिलबंद केले जातात आणि ते नमुने नाडाच्या प्रयोगशाळेत तपासले जातात. तो खेळाडू ए चाचणीत दोषी आढळल्यास त्याचे तात्पुरते निलंबित केले जाते.त्यानंतर तो खेळाडू बी चाचणीसाठी अपील करू शकतो. यावर या नमुन्यांची पुन्हा तपासणी केली जाते. जर बी चाचणीतही खेळाडू दोषी आढळल्यास त्याला शिक्षा केली होते.
डोपिंग प्रकरणात कोणती कारवाई होते -
डोपिंग प्रकरणात खेळाडू दोषी आढळल्यास 'त्या' खेळाडूचे तात्पुरते निलंबन करण्यात येते. मात्र, त्या खेळाडूला आपली बाजू मांडण्याची यावेळी परवानगी देण्यात येते. काही वेळा खेळाडूला स्पर्धेतून कायमचे बाद ठरवण्यात येऊ शकते. तर काही वेळा दोन ते पाच वर्षासाठी किंवा आजीवन बंदीही लागू करण्यात येऊ शकते. तसेच खेळाडूने जिंकलेली पदके या चाचणीत दोषी आढळल्यास काढून घेतली जातात.
0
Answer link
डोपिंग म्हणजे खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेत वाढ करण्यासाठी वापरले जाणारे प्रतिबंधित पदार्थ किंवा पद्धती.
डोपिंगची व्याख्या:
- वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सी (WADA) च्या अनुसार, डोपिंग म्हणजे खेळाडूंच्या शरीरात प्रतिबंधित पदार्थ घेणे किंवा प्रतिबंधित पद्धतींचा वापर करणे.
डोपिंगचे प्रकार:
- स्टेरॉइड्स (Steroids): स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी.
- पेप्टाइड हार्मोन्स (Peptide Hormones): वाढ आणि पुनर्प्राप्तीसाठी.
- Stimulants ( उत्तेजक): सतर्कता आणि ऊर्जा वाढवण्यासाठी.
- रक्त डोपिंग (Blood Doping): ऑक्सिजन वहन क्षमता वाढवण्यासाठी.
डोपिंगचे दुष्परिणाम:
- हृदयविकार, उच्च रक्तदाब
- यकृत आणि मूत्रपिंडाचे नुकसान
- मानसिक समस्या
- महिलांमध्ये मासिक पाळीत अनियमितता आणि पुरुषांमध्ये नपुंसकत्व
डोपिंग विरोधी नियम:
- खेळात डोपिंगला आळा घालण्यासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था कार्यरत आहेत.
- नियम मोडल्यास खेळाडूंवर बंदी घातली जाऊ शकते.
अधिक माहितीसाठी:
- वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सी (WADA): WADA